संतापजनक! कॅथॉलिक पादरींकडून साडे तीन लाख लेकरांचं लैंगिक शोषण, देवाच्या दरबारात काळं कृत्य
फ्रान्सच्या चर्चमध्ये अशा प्रकारच्या अश्लील आणि घाणेरड्या कृत्यांची पोलखोल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा अहवाल प्रसिद्ध करणाऱ्या आयोगाचे अध्यक्ष जीन-मार्क सॉवे म्हणाले की, "हे अंदाज वैज्ञानिक संशोधनावर आधारित आहेत.
फ्रान्सच्या कॅथोलिक चर्चमध्ये, गेल्या 70 वर्षांमध्ये तब्बल 330,000 मुलं लैंगिक अत्याचाराला बळी पडली आहेत. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या फ्रेंच अहवालात ही माहिती देण्यात आली. फ्रान्सच्या चर्चमध्ये अशा प्रकारच्या अश्लील आणि घाणेरड्या कृत्यांची पोलखोल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा अहवाल प्रसिद्ध करणाऱ्या आयोगाचे अध्यक्ष जीन-मार्क सॉवे म्हणाले की, “हे अंदाज वैज्ञानिक संशोधनावर आधारित आहेत. हे गुन्हे पाद्री आणि इतर धार्मिक व्यक्तींनी तसेच चर्चशी संबंधित असणारे धार्मिक नसलेले लोकांनी केले आहेत. ते म्हणाले की, 80 टक्के बळी पुरुष होते.” ( french-report-says-330000-children-victims-of-church-sex-abuse-during-1950-to-till-date-by-priest )
जीन मार्क सॉवे म्हणाले, “त्याचे परिणाम खूप गंभीर झाले. लैंगिक हिंसाचाराला बळी पडलेले 60% पुरुष आणि स्त्रिया म्हणतात की, त्यांना त्यांच्या लैंगिक जीवनात मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागलं.” 2500 पानांचा हा अहवाल एका स्वतंत्र आयोगाने तयार केला आहे. हे अशा वेळी समोर आलं आहे जेव्हा, जगातील इतर देशांप्रमाणे, फ्रान्सच्या कॅथोलिक चर्चचे काळे धंदेही जगासमोर येत आहे. ही अशी प्रकरणं बऱ्याच काळापासून लपलेली होती. या काळात लैंगिक गुन्हे केलेल्या 3,000 लोकांनी चर्चसोबत काम केल्याचे अहवालात म्हटलं आहे. या लैंगिक गुन्हेगारांमध्ये दोन तृतीयांश चर्चचे पाद्री होते.
अडीच वर्षांच्या मेहनतीनंतर तयार केला अहवाल
सौवे म्हणाले की, “एकूण बळींच्या संख्येत अंदाजे 2,16,000 लोक समाविष्ट आहेत, जे पाद्री आणि इतर धार्मिक लोकांद्वारे लैंगिक हिंसाचाराला बळी पडले.” हा अहवाल तयार करण्यासाठी पार्लर एट रिविवर’(स्पीक आउट एंड लिव अगेन) चे प्रमुख ओलिवियर सैविग्नैक यांनी मदत केली. त्यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की, “फ्रान्सच्या चर्चमध्ये मोठ्या प्रमाणावर लैंगिक अत्याचार झाले, जे कधीही बाहेर आले नाही”. या आयोगाने अडीच वर्षे काम केले. 1950 पासून पीडित आणि साक्षीदारांचे जबाब घेतले गेले. चर्च, कोर्ट, पोलीस आणि प्रेस आर्काइव्हचा अभ्यास करण्यात आला.
पीडितांनाच अनेक वेळा गुन्हेगारीसाठी जबाबदार धरले जाते
तपासाच्या सुरुवातीला एक हॉटलाईन सुरू करण्यात आली. या हॉटलाइनवर तब्बल 6500 लोकांचे फोन आले, जे एकतर कथितरित्या बळी पडले होते किंवा पीडित व्यक्तीला ओळखत होते. सौवेन खेद व्यक्त करत म्हणाले, “पीडितांवर विश्वास ठेवण्यात आला नाही किंवा त्यांचे ऐकले गेले नाही. काही वेळा तो स्वतः त्या गुन्ह्याला जबाबदार धरला गेला.” सौवे म्हणाले की, “असे 22 कथित गुन्हे आहेत ज्यांचा कधीही तपास झाला नाही.
हेही वाचा: