India-China Relation | जयशंकर यांनी चीनला चांगलच झापलं, गलवानचा उल्लेख करुन काय म्हणाले?

India-China Relation | जापानला गेलेले परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनला चांगलाच सुनावलय. परराष्ट्र संबंधांबद्दल विश्लेषण करताना त्यांनी काही मुद्दे मांडले.

India-China Relation | जयशंकर यांनी चीनला चांगलच झापलं, गलवानचा उल्लेख करुन काय म्हणाले?
s jaishankar
Follow us
| Updated on: Mar 08, 2024 | 9:22 AM

India-China Relation | परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सध्या जापान दौऱ्यावर आहेत. ते टोक्यो येथे एक थिंक टँक कार्यक्रम रायसीना गोलमेज सम्मेलनात सहभागी झाले होते. त्यावेळी जयशंकर यांनी चीनच्या नापाक कृत्यांचा उल्लेख केला. चीनने भारतासोबतच्या लिखित कराराच उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला. परराष्ट्र मंत्र्यांनी 2020 मध्ये सीमारेषेवर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षासाठी चीनला जबाबदार धरलं.

बदलत्या जागतिक व्यवस्थेवर जयशंकर यांनी विस्ताराने चर्चा केली. “हिंद-प्रशांत क्षेत्रात शक्ती परिवर्तन हे एक मोठ वास्तव आहे. जशी तुमची क्षमता आणि प्रभाव बदलतो, तसा महत्वाकांक्षांमध्ये सुद्धा बदल होतो. तुम्हाला काय आवडत? आणि काय नाही? हा मुद्दाच नाहीय. प्रत्येकाला वस्तुस्थितीचा सामना करावा लागेल” असं जयशंकर म्हणाले.

अनेक गोष्टींवर तुमची असहमती असू शकते, पण….

भारत-चीन संबंधांबद्दल बोलताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, “1975 ते 2020 पर्यंत 45 वर्षात सीमारेषेवर कुठलाही हिंसाचार झाला नाही. पण 2020 मध्ये सगळच बदललं” “अनेक गोष्टींवर तुमची असहमती असू शकते, पण जेव्हा कुठला देश शेजारी देशाबरोबरच्या लिखित कराराच पालन करत नाही, तेव्हा दोन्ही देशांचे संबंध, स्थिरतेबद्दल प्रश्न निर्माण होण स्वाभाविक आहे. प्रामाणिकपणे सांगायच झाल्यास हेतूबद्दल प्रश्न निर्माण होतो” असं जयशंकर म्हणाले.

भारताच चीनला जशास तस उत्तर

5 मे 2020 रोजी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये पँगॉग तळ्याजवळच्या क्षेत्रात हिंसक झडप झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये पूर्व लडाख सीमेवर तणाव निर्माण झाला. भारताने चीनला जशास तस उत्तर दिलं. त्यानंतर जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात भीषण संघर्ष झाला. दोन्ही देशांमधील संबंध बिघडले. अनेक दशकानंतर भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये असा हिंसक संघर्ष झाला होता. ड्रॅगच्या या कृतीवर भारताने स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की, “सीमावर्ती भागात शांतता स्थापित होणार नाही, तो पर्यंत दोन्ही देशांचे संबंध सामान्य होऊ शकत नाही”

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.