VIDEO: पाच दिवसाीय परदेश दौऱ्यानंतर आज मोदी भारतात परतले; जल्लोषात केला भारतीयांनी समारोप
भारताकडे रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ग्लासगो येथे भारतीय लोकांशी संवाद साधला. जयजयकार आणि 'भारत माता की जय' च्या घोषणां देत, भारतीय पोशाखात सजलेल्या लोकांच्या मोठ्या जल्लोषात पंतप्रधान ज्या हॉटेलमध्ये मुक्कामाका होते त्या हॉटेलच्या आवारात हात जोडून पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या रोम, इटली आणि ग्लासगो, यूके या पाच दिवसांच्या परदेश दौऱ्यानंतर आज भारतात परतले. जागतिक मुद्द्यांवरच्या G20 शिखर परिषदे आणि COP26 UN हवामान बदल परिषदेत पंतप्रधान सहभागी झाले होते. मंगळवारी या पिषदेचा समारोप झाला. (G20 Summit COP26 PM Modi reaches India bid goodbye by Indians in UK)
भारताकडे रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ग्लासगो येथे भारतीय लोकांशी संवाद साधला. जयजयकार आणि ‘भारत माता की जय’ च्या घोषणां देत, भारतीय पोशाखात सजलेल्या लोकांच्या मोठ्या जल्लोषात पंतप्रधान ज्या हॉटेलमध्ये मुक्कामाका होते त्या हॉटेलच्या आवारात हात जोडून पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. या गर्दीत अनेक मुले होती आणि पंतप्रधान मोदी त्यांच्याशी संवाद साधला आणि काही मोठ्या मुलांना हाय-फाइव्ह दिले.
#WATCH PM Modi plays the drums along with members of the Indian community gathered to bid him goodbye before his departure for India from Glasgow, Scotland
(Source: Doordarshan) pic.twitter.com/J1zyqnJzBW
— ANI (@ANI) November 2, 2021
मोदींनी ग्लासगो येथील कॉन्फरन्स ऑफ पार्टीज (COP26) च्या 26 व्या सत्रात भारताने हवामान बदलाबाबत केलेल्या विविध हवामान प्रकल्पांवर आणि देशाने स्वतःसाठी ठरवलेल्या भविष्यातील उद्दिष्टांवर भर देणारे विधान केले.
सोमवारी COP26 संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी 2070 पर्यंत निव्वळ-शून्य उत्सर्जन साध्य करण्याच्या लक्ष्यासह पाच “अमृत तत्व” जाहीर केले. त्यांनी घोषित केले की भारत आपली गैर-जीवाश्म ऊर्जा क्षमता 500 GW पर्यंत वाढवेल आणि 2030 पर्यंत अक्षय ऊर्जेद्वारे, ऊर्जा आवश्यकता 50 टक्के पूर्ण करेल.
Departing from Glasgow after two days of intense discussions about the future of our planet. India has not only exceeded the Paris commitments but has now also set an ambitious agenda for the next 50 years.
— Narendra Modi (@narendramodi) November 2, 2021
Other News
अमरिंदर सिंग यांनी केली नव्या पक्षाची घोषणा; सोनिया गांधींना पत्र लिहून दिला पक्षाचा राजीनामा
हिमाचलमध्ये काँग्रेसची जादू, तीन विधानसभा आणि एक लोकसभेची जागा जिंकली; भाजपला जनआक्रोश भोवला?
G20 Summit COP26 PM Modi reaches India bid goodbye by Indians in UK