G20 Summit: पंतप्रधान मोदी आज ब्रिटनला रवाना होणार; काय आहे परिषदेचा अजेंडा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी G20 शिखर परिषदेच्या दुसऱ्या सत्रात सहभागी होण्यासाठी ग्लासगो, स्कॉटलंड येथे रवाना होणार आहेत. ही COP26 (Conference of Parties) परिषद हवामान बदल आणि पर्यावरण (Global Climate Change) या विषयावर होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी G20 शिखर परिषदेच्या दुसऱ्या सत्रात सहभागी होण्यासाठी ग्लासगो, स्कॉटलंड येथे रवाना होणार आहेत. ही COP26 (Conference of Parties) परिषद हवामान बदल आणि पर्यावरण (Global Climate Change) या विषयावर होणार आहे. जवळजवळ 200 देशांचे (United Nations) प्रमुख या परिषदेत उपस्थित असतील. ही हवामान परिषदे G20 शिखर परिषदेचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिले जात आहे. (G20 Summit PM Modi to visit UK for Climate Change Conference)
G20 ब्लॉक मध्ये जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनाचा (Greenhouse gases emissions) अंदाजे 80 टक्के वाटा हा ब्राझील, चीन, भारत, जर्मनी आणि युनायटेड स्टेट्स यांचा आहे. जो शास्त्रज्ञांच्या मते हवामान आपत्ती टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात कमी करणे आवश्यक आहे. चीन आणि युनायटेड स्टेट्स नंतर भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा हरितगृह वायू उत्सर्जित करणारा देश आहे. त्यामुळे, 31 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या COP26 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींचा सहभाग फार महत्त्वाचा आहे. मोदी या परिषदेत 1 आणि 2 नोव्हेंबरला उपस्थित राहतील, अशी माहिती मिळतेय.
NDCs Net Zero Nature-Based Solutions
Climate conversations can be full of specialized terms and acronyms.
Ahead of #COP26, this guide can help you make sense of some of the #ClimateAction buzz words you might have heard in recent weeks.https://t.co/pqougqfrC2 pic.twitter.com/OGwMPNtEWd
— United Nations (@UN) October 30, 2021
पंतप्रधान मोदी सध्या G20 शिखर परिषदेच्या पहिल्या सत्रासाठी रोममध्ये आहेत. शनिवारी त्यांनी जागतिक नेत्यांसह जागतिक अर्थव्यवस्था आणि आरोग्यावर चर्चा केली. ट्विटरवरील त्यांच्या अधिकृत हँडलवर, पीएम मोदी म्हणाले की जी -20 शिखर परिषदेच्या भेटी “विस्तृत आणि फलदायी” होत्या.
Today’s proceedings at the @g20org were extensive and productive. I took part in the various sessions, participated in bilateral meetings and also met several leaders on the sidelines of the summit deliberations. It is important nations work together to further global good. pic.twitter.com/Ww2bkEjpyR
— Narendra Modi (@narendramodi) October 30, 2021
इटालिच्या प्रमुख मारियो द्राघी यांच्या निमंत्रणावरून सध्या पंतप्रधान मोदी रोममध्ये आहेत. त्यांच्या दोन दिवसांच्या या दौऱ्याचा समारोप करून आज ते युनायटेड किंगडममधील ग्लासगो येथे जाणार आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी पंतप्रधान मोदींना आमंत्रण दिले आहे. युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (UNFCCC) च्या अधिकृत वेळापत्रकानुसार COP26 परिषद 31 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि 12 नोव्हेंबर चालेल.
Related News
Modi Invites Pope Francis: पोपचं भारतात 22 वर्षांनी आगमन होणार?
VIDEO: नाव काय तुमचं?, इथे काय करता?, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इटलीत भर गर्दीत साधला चक्क मराठी माणसाशी संवाद
इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार, पुढील वर्षी भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता
Pm Narendra Modi | G20 शिखर संमेलनासाठी नरेंद्र मोदी रोमला रवाना, 12 वर्षांत पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानांचा दौराhttps://t.co/X1PdYeOsGj#narendramodi #G20RomeSummit #G20 #G20Summit
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 29, 2021
G20 Summit PM Modi to visit UK for Climate Change Conference