काबुल हल्ल्यात 110 जणांचा मृत्यू, जर्मनी, स्पेन आणि स्वीडनने बचाव मोहीम थांबवली

अफगाणिस्तानवर तालिबानने नियंत्रण मिळवल्यावर हजारो लोक आपला जीव वाचवत अफगाणिस्तान सोडण्यासाठी संघर्ष करत आहेत. यासाठी काबुल विमानतळावर मोठ्या प्रमाणात गर्दी होतेय.

काबुल हल्ल्यात 110 जणांचा मृत्यू, जर्मनी, स्पेन आणि स्वीडनने बचाव मोहीम थांबवली
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 7:40 AM

Afghanistan Kabul Evacuation Mission काबुल : अफगाणिस्तानवर तालिबानने नियंत्रण मिळवल्यावर हजारो लोक आपला जीव वाचवत अफगाणिस्तान सोडण्यासाठी संघर्ष करत आहेत. यासाठी काबुल विमानतळावर मोठ्या प्रमाणात गर्दी होतेय. याच गर्दीचा फायदा घेत आयसिसने काबुल विमानतळावर आत्मघातकी हल्ला केला आणि यात अमेरिकन सैन्यासह एकूण 110 जणांचा मृत्यू झाला. यानंतर आता जर्मनी, स्पेन आणि स्वीडनने अफगाणमधील आपली बचाव मोहिम (Evacuation Mission in Kabul) थांबवलीय. असं असलं तरी अमेरिका, ब्रिटनसह इतर नाटो देश 31 ऑगस्टपर्यंत बचाव मोहिम सुरूच ठेवणार आहेत.

तालिबान्यांनी बचाव मोहिमेसाठी 31 ऑगस्टपर्यंतचा वेळ दिलाय. त्यामुळे त्यानंतर काय परिस्थिती होणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दुसरीकडे 31 ऑगस्टपर्यंत हल्लेखोरांकडून नागरिक आणि सैन्याला पुन्हा लक्ष्य केलं जाऊ शकतं. या पार्श्वभूमीवरच जर्मनी, स्पेन आणि स्वीडनने आपलं अभियान पूर्ण झाल्याचा दावा केलाय. मात्र,अजूनही अनेक लोक अफगाणमध्य अडकलेले आहेत. हजारो लोक काबुल विमानतळाच्या परिसरात वाट पाहत आहेत. अफगाणमधून बाहेर पडण्यासाठी अनेकजण काबुल विमानतळावर जमा होत आहेत.

जर्मनीचे संरक्षण मंत्री एनीग्रेट क्रेंप-कॅरेनबाउर म्हणाले, “जर्मनीने अफगाणिस्तानमधील लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची मोहिम थांबवली आहे. जर्मनीने एकूण 45 देशांच्या 5,347 लोकांना बाहेर काढलं. यात 4,000 पेक्षा जास्त नागरिक अफगाणिस्तानचे आहेत.”

स्पेनकडूनही मदत मोहिम थांबवण्याचा निर्णय

स्पेनने आतापर्यंत 1900 अफगाण नागरिकांना मदत केलीय. याशिवाय स्पेनिश मदत कर्मचारी, अफगाण मित्र देशांचे सैनिक आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासह 81 सैनिक आणि दूतावास अधिकारी यांनाही मदत करण्यात आली. स्पनने अमेरिका, पुर्तगाल, यूरोपीय संघ, नाटोसोबत हे मदत कार्य केलं.

स्वीडनची मदत मोहिम अपूर्णच

स्वीडनने (Sweden) काबुल विमानतळावरील बचाव मोहिम थांबवलीय. स्वीडनने त्यांची मोहिम पूर्ण झाल्याचा दावा केला असला तरी अद्याप अनेकजण अफगाणमध्ये अकडलेले आहेत. स्वीडनचे परराष्ट्र मंत्री ऐन लिंडे यांनी त्यांच्या मोहिमेचं लक्ष्य पूर्ण झाल्याचं नमूद केलंय. यामागे तालिबान्यांनी अफगाणी नागरिकांना अडवल्याचं कारण त्यांनी सांगितलं.

स्वीडनने 500 हून अधिक स्वीडिश लोकांना बाहेर काढलं. याशिवाय स्थानिक कर्मचारी, काही महिला कार्यकर्त्या आणि पत्रकारांसह इतर 1,100 लोकांनाही स्वीडनने अफगाणमधून बाहेर पडण्यास मदत केली.

अमेरिकेकडून 1 लाखपेक्षा अधिक लोकांना मदत

अमेरिकेने गुरुवारी (26 ऑगस्ट) दिलेल्या माहितीनुसार त्यांनी काबुलमधून 1,00,000 पेक्षा अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढलंय. दुसरीकडे अजूनही 1,000 अमेरिकी नागरिक आणि हजारो अफगाण नागरिक बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या मदत अभियानावर (US Mission in Kabul) देखरेख करणाऱ्या अमेरिकेच्या जनरल फ्रँक मेकेन्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्यापही काबुल विमानतळावर 5,000 लोक बाहेर पडण्यासाठी वाट पाहत आहेत. ही संख्या वाढतच आहे.

हेही वाचा :

Kabul Airport Attack: ‘बदला घेणार, हल्ल्याचं ठिकाण आणि वेळ आमचंच असणार’, जो बायडन यांचं आयसीसला आव्हान

काबूल विमानतळावर दहशतवादी हल्ल्याची धमकी; ब्रिटन-अमेरिकेचा नागरिकांना इशारा

Afghanistan Crisis : अमेरिकेने आतापर्यंत 88 हजार लोकांना काबुलमधून बाहेर काढलं, 31 ऑगस्टपर्यंतचा प्लॅन काय?

व्हिडीओ पाहा :

Germany Spain Sweden stop Afghan Kabul evacuation mission after ISIS attack

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.