Gold Pakistan : आपल्याकडे सोन्याने सर्व रेकॉर्ड तोडले, पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब, एक तोळा सोन्याचा भाव आहे तरी किती?

Gold Pakistan : देशात सोन्याच्या किंमतींनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पण सध्या महागाईचा आगडोंब उसळलेल्या पाकिस्तानमध्ये एका तोळा सोन्याचा भाव किती आहे, माहिती आहे का?

Gold Pakistan : आपल्याकडे सोन्याने सर्व रेकॉर्ड तोडले, पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब, एक तोळा सोन्याचा भाव आहे तरी किती?
पाकिस्तानमधील सोन्याचा भाव काय
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 11:24 AM

नवी दिल्ली : देशात सोन्याच्या किंमतींनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सोन्याची किंमत (Gold Price) गगनाला भिडली आहे. गेल्या 11 वर्षांत सोने दुप्पट झाले आहे. तर चांदीने अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. गेल्या दिवाळीनंतर सोन्याने पुन्हा जोरदार चढाई केली. या तीन महिन्यात सोन्याने दोनदा विक्रम केला आहे. 2 फेब्रुवारी 2023 आणि 5 एप्रिल 2023 या दिवशी सोन्याने नवीन रेकॉर्ड (Gold New Record) गाठले. भारतीय सर्वसामान्य खरेदीदार त्यामुळे हिरमुसले आहे. पण सध्या महागाईचा (Inflation) आगडोंब उसळलेल्या पाकिस्तानमध्ये एक तोळा सोन्याचा भाव (Gold Price Pakistan) किती आहे, माहिती आहे का? या शेजारी देशात भरड गव्हाचे पीठच इतके महागले असताना सोन्याच्या किंमती काय असतील नाही?

आज काय भाव गुडरिटर्न्सनुसार, 27 एप्रिल रोजी, सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 10 रुपयांची दरवाढ झाली. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,110 रुपये तर 24 कॅरेटचा भाव 10 रुपयांनी वधारुन 61,200 रुपये प्रति तोळ्यावर आला. सोन्याचा भाव कालपेक्षा जवळपास 100 रुपयांनी वधारला आहे.

चांदीची रॉकेट भरारी यावर्षी चांदी आणि सोन्याच्या किंमतींनी जवळपास 11 टक्क्यांची उसळी घेतली. पण सोन्याच्या वाढत्या भावामुळे ग्राहक, खरेदीदारांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे त्यांनी चांदीकडे मोर्चा वळविला आहे. चांदीत येत्या काही दिवसांत मोठी तेजी दिसू शकते. चांदीची मागणी वाढली आहे. चांदीच्या किंमती 9-12 महिन्यात वाढून 85,000 ते 90,000 रुपये प्रति किलोवर पोहचतील, असा अंदाज आहे. त्यामुळे चांदीच्या किंमतीत 20 टक्क्यांची तेजी दिसून येईल.

हे सुद्धा वाचा

11 वर्षांत भाव डबल

  1. गेल्या 11 वर्षांतील भावांवर नजर टाकल्यास किती फायदा झाला हे स्पष्ट होईल. सोन्याचा भाव डबल झाला आहे.
  2. 24 एप्रिल 2012 रोजी अक्षय तृत्तीयेला सोन्याचा भाव 29,030 रुपये प्रति 10 ग्रॅम होता
  3. 13 मे 2013 रोजी अक्षय तृत्तीयेला एक तोळा सोन्याचा भाव 29,865 रुपये होता
  4. एका वर्षांत ग्राहकांना केवळ 2.88 टक्क्यांचा परतावा मिळाला
  5. चांदीने या काळात ग्राहकांना फटका दिला. चांदी जवळपास 19 टक्क्यांनी स्वस्त झाली
  6. चांदी 56,697 रुपयांहून 45,118 रुपये किलो झाली. 10,579 रुपये प्रति किलोने चांदी स्वस्त झाली

पाकिस्तानमध्ये सोन्याचा भाव काय डेली पाकिस्तानने पाकिस्तानमधील सोन्याच्या भावाची माहिती दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी पाकिस्तानमध्ये 24 कॅरेट एक तोळ्याचा भाव 2,19,000 पाकिस्तानी रुपये आहे. तर 22 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव 2,00,199 पाकिस्तानी रुपये आहे. पाकिस्तानमधील लाहोर, कराची, इस्लामाबाद, पेशावर, क्वेटा, सियालकोट, अटक, गुजरणवाला, मुल्तान, गुजरात, चकवाल यासह अनेक शहरात हाच भाव आहे.

पाकिस्तानी चलनाचे मूल्य काय एका डेटानुसार, भारतीय 100 रुपयांचे पाकिस्तानी रुपयातील मूल्य 345 रुपयांच्या आसपास आहे. तर एका डॉलरसाठी 283.48 पाकिस्तानी रुपये मोजावे लागतात. तर एक डॉलरसाठी भारतीयांना 82 रुपये मोजावे लागतात. यावरुन पाकिस्तानमधील सोन्याचे मूल्य, किंमत लक्षात येईल.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.