Pakistan Crisis: पाकिस्तानला दिवाळखोरीतून बाहेर काढण्यासाठी फक्त हवा हा निर्णय, एका झटक्यात कर्ज फिटणार

Pakistan Reko Diq Gold Mine: पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती बदलणारा खजिना त्या देशाकडे आहे. पाकिस्तानकडे सोन्याच्या खाणी आहेत. पाकिस्तानच्या बलुचिस्थान प्रांतात या खाणी आहेत. या खाणींमध्ये असणारा सुवर्ण भंडार पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सुधारु शकतो.

Pakistan Crisis: पाकिस्तानला दिवाळखोरीतून बाहेर काढण्यासाठी फक्त हवा हा निर्णय, एका झटक्यात कर्ज फिटणार
शहबाज शरीफ
Follow us
| Updated on: May 19, 2024 | 10:09 AM

पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. पाकिस्तानमध्ये मोठे आर्थिक संकट सुरु आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि इतर देशांकडून कर्ज घेतल्यानंतरही पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या शहबाज शरीफ सरकारला पाकिस्तानमधील जवळपास सर्वच सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करावे लागत आहे. त्यात पाकिस्तानची पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (PIA) आणि वीज कंपन्यांचा समावेश आहे. परंतु दिवाळखोर पाकिस्तानला समुद्ध करण्याचा एक मार्ग त्यांच्याकडे आहे. हा मार्ग पाकिस्तानला केवळ दिवाळखोरीतून बाहेर काढणार नाही तर आर्थिक संपन्नही बनवणार आहे.

शहबाज शरीफकडून रोडमॅप

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी नुकतीच देशातील जवळपास सर्व कंपन्यांचे खासगीकरण करण्याची घोषणा केली. त्यासाठी 2024-29 या काळासाठी रोडमॅप तयार केला. कारण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत मिळाल्यावरही पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सुधारलेली नाही.

पाकिस्तानची गरीबी दूर होणार

पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती बदलणारा खजिना त्या देशाकडे आहे. पाकिस्तानकडे सोन्याच्या खाणी आहेत. पाकिस्तानच्या बलुचिस्थान प्रांतात या खाणी आहेत. या खाणींमध्ये असणारा सुवर्ण भंडार पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सुधारु शकतो. पाकिस्तानमधील या खाणी जगातील सर्वात मोठ्या सोने आणि तांब्यांच्या खाणींपैकी एक आहे. जगप्रसिद्ध वृत्तसंस्था रायटर्सच्या एका अहवालानुसार, पाकिस्तान सरकारकडे खाणींच्या माध्यमातून महत्वाचा एसेट आहे. त्यात कोट्यवधी टन सोने आणि तांबे आहे. बलुचिस्थानमधील चगाई जिल्ह्यात रेको दिक भागात या खाणी आहेत. यामुळे पाकिस्तानची गरीब दूर होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

खाणींमध्ये 590 कोटी टन

पाकिस्तामधील Reko Diq Mine खाण सोने आणि तांब्याची सर्वात मोठे भंडार आहे. एका अंदाजानुसार त्यात 590 कोटी टन खनिज आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, या खनिज भंडारात प्रति टन 0.22 ग्रॅम सोने आणि जवळपास 0.41 टन तांबे आहे. ही खाण इराण आणि अफगाणिस्थान सीमेजवळ आहे. पाकिस्तान या खाणींच्या माध्यमातून समुद्ध होऊ शकतो. 1995 मध्ये प्रथम या खाणीत खोदकाम करण्यात आले होते.

युएईशी करणार करार?

ARY News नुसार, पाकिस्तान बलूचिस्तानमधील या भागातील सोने आणि तांबे सौदी अरेबियाला (UAE) विकण्याचा निर्णयापर्यंत आला आहे. यूएई रेको दिकमध्ये बॅरिक गोल्ड कॉर्पोरेशनच्या नियंत्रणाखाली या खाणींमध्ये हिस्सेदारी मिळवणार आहे. सौदी अरेबिया या खाणींमध्ये1 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची तयारी करत आहे. यासंदर्भात लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.

धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.