महाराष्ट्राचा गूळ, पंजाबचे तूप, उत्तराखंडचे तांदूळ आणि हिरा… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बायडेन यांना दिले 10 गिफ्ट्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भारतातील काही खास भेट वस्तू अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना गिफ्ट्स म्हणून दिल्या आहेत.

महाराष्ट्राचा गूळ, पंजाबचे तूप, उत्तराखंडचे तांदूळ आणि हिरा... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बायडेन यांना दिले 10 गिफ्ट्स
PM Narendra Modi giftsImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 22, 2023 | 8:51 AM

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्या वॉशिंग्टन येथील एका कार्यक्रमात भाग घेतला. त्यानंतर मोदी व्हाईट हाऊसमध्ये गेले. तिथे राष्ट्रपती जो बायडेन यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन आणि जिल बायडेन यांना खास भेट वस्तू दिल्या. भारतातील महाराष्ट्रासहीत दहा राज्यातील महत्त्वाच्या वस्तू मोदी यांनी राष्ट्रपतींना भेट दिल्या. तसेच जिल बायडेन यांना एक हिराही भेट म्हणून दिला.

हे सुद्धा वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना 7.5 कॅरेटचा हिरवा हिरा गिफ्ट दिला. हा हिरा पृथ्वीवरील ऑप्टिकल आणि रासायनिक गुण दर्शवतो. हा हिरा पर्यावरण अनुकूलही आहे. कारण या हिऱ्याच्या निर्मितीसाठी पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेचा वापर करण्यात आला आहे.

मोदींकडून आभार

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्हाईट हाऊसमध्ये प्रचंड जल्लोषात स्वागत करण्यात आलं. फर्स्ट लेडीने केलेल्या या आदरतिथ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून हे आभार मानले आहेत. जो बायडेन आणि जिल बायडेन यांनी जा व्हाईट हाऊसमध्ये माझा जो आदर सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद. आमच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली, असं ट्विट मोदी यांनी केलं आहे.

या भेटवस्तू दिल्या

पंजाबचे तूप

राजस्थानमधील हाताने बनवलेलं 24 कॅरेट हॉलमार्कचं सोन्याचं नाणं, तसेच 99.5 टक्के कॅरेट चांदीचे नाणे

महाराष्ट्राचा गुळ

उत्तराखंडचे तांदूळ

तामिळनाडूचे तिळ

कर्नाटकातील मैसूरमधील चंदनाचा तुकडा

पश्चि बंगालच्या कुशल कारागिरांनी तयार केलेले चांदीचे नारळ

गुजरातचे मीठ, श्रीगणेशाची मूर्ती तसेच दिवा

मोदींसाठी स्टेट डिनर

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी स्टेट डिनरचं आयोजन करण्यात आलं आहे. मोदींच्या डिनरमध्ये बाजऱ्याचा केक आणि मशरुमचा समावेश करण्यात आला आहे. संपूर्ण शाकाहारी डिनर असणार आहे. फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी गेस्ट शेफ नीना कर्टिस, व्हाईट हाऊस एक्झ्युक्युटिव्ह शेफ क्रिस कोमरफोर्ड आणि व्हाईट हाऊस एक्झिक्युटिव्ह पेस्ट्री शेफ सूजी मॉरिशन यांच्यासोबत स्टेट डिनर मेन्यू तयार केला आहे.

या स्टेट डिनरमध्ये फर्स्ट कोर्समध्ये मॅरिनेटेड मिलेट, ग्रिल्ड कोर्न कर्नेल सॅलेड, कॉम्प्रेस्ड वॉटरमेलन आणि टॅगी अॅवेकैडो सॉसचा समावेश आहे. तर मेन कोर्समध्ये स्टफ्ड पोर्टोबेलो मशरूम, क्रीमी सॅफरन इन्फ्यूज रिसोटोचा समावेश आहे. त्याशिवाय सुमैक रोस्टेड सी-बास, लेमन योगर्ट सॉस, क्रिस्प्ड मिलेट आणि समर स्क्वॅशचा समावेश आहे. रात्री व्हाईट हाऊसच्या साऊथ लॉनवर हे डिनर दिलं जाणार आहे. तिरंग्याच्या थीमवर साऊथ लॉन पव्हेलियन सजवलं गेलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.