Hafiz Saeed: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हत्यांमुळे ISI हादरली, भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूची सुरक्षा वाढवली
Hafiz Saeed Security increased: हाफिज सईद याच्यावर अनेकवेळा जीवघेणे हल्ले झाले आहेत. परंतु तो प्रत्येक वेळी वाचला आहे. त्याला असलेला धोका लक्षात घेऊन त्याच्या घराजवळ सुरक्षा आणखी वाढवली आहे.

Hafiz Saeed Attacked: पाकिस्तानात भारताच्या एका एका शत्रूचा खात्मा होत आहे. पाकिस्तानने पोसलेले दहशतवादी यमसदनी जावू लागले आहे. यामुळे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय चांगलीच हादरली आहे. शनिवारी मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याचा जवळचा सहकारी नदीम ऊर्फ अबू कताल मारला गेला. तो हाफिज सईद याचा भाचाही आहे. त्याच्या हत्येबरोबर हाफिज सईदसुद्धा जखमी झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु हाफिज सईद सुरक्षित आहे. त्याला असलेला धोका लक्षात घेऊन त्याची सुरक्षा अधिक कठोर करण्यात आली आहे. सईद याच्या घराचे रुपातंर सबजेलमध्ये करण्यात आले आहे. पाकिस्तानी पत्रकार अजाज सईद यांनी याबाबत माहिती दिली.
घराजवळ सुरक्षा आणखी वाढवली
हाफिज सईद याच्यावर अनेकवेळा जीवघेणे हल्ले झाले आहेत. परंतु तो प्रत्येक वेळी वाचला आहे. त्याला असलेला धोका लक्षात घेऊन त्याच्या घराजवळ सुरक्षा आणखी वाढवली आहे. घराचे रुपातंर एका सबजेलमध्ये करण्यात आले आहे. हाफिज सईद टेरर फंडिगच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. परंतु प्रत्यक्षात तो लाहोरमध्ये नजरकैदेत आहे. त्या ठिकाणी त्याला मर्यादीत स्वातंत्र दिले आहे.
हाफिज सईद आंतरराष्ट्रीय दहशतवादी
हाफिज सईद हा मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. मुंबई हल्ल्यात 160 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी 2006 मध्ये झालेल्या मुंबईतील लोकल बॉम्बस्फोटात सुद्धा हाफिज सईदचा हात असल्याचा भारताचा आरोप आहे. तसेच 2001 साली भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्यात सुद्धा सईदचे नाव समोर आले होते. तो संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेच्या जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत आहे. त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आली आहे.




अबू कताल याची शनिवारी हत्या झाल्यानंतर पाकिस्तान हादरला आहे. अबू कताल हा हाफिज सईद याचा नातेवाईक आहे तसेच तो जमात उद-दावाचा टॉप कमांडर होता. त्याने जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले होते. त्यामुळे हाफिज सईद याने त्याला लश्करचा चीफ ऑपरेशनल कमांडर बनवले होते.