AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hafiz Saeed Son : मुंबई हल्ल्याचा मास्टरमांईड हाफिज सईदच्या मुलाची हत्या, वृत्ताने एकच खळबळ

Hafiz Saeed Son : 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या मुलाची हत्या झाल्याचे वृत्त समोर येत आहे. मुंबई हल्ल्यात अनेक निरपराध नागरिकांची हत्या घडवून आणणाऱ्या दहशतवादी हाफिजला त्याच्या कर्माची फळं मिळाली आहे. त्याचा मुलगा कमालुद्दीन सईद याच्या हत्येचे वृत्त समोर येत आहे. नेमकं काय आहे प्रकरण

Hafiz Saeed Son : मुंबई हल्ल्याचा मास्टरमांईड हाफिज सईदच्या मुलाची हत्या, वृत्ताने एकच खळबळ
Follow us
| Updated on: Oct 01, 2023 | 10:28 AM

नवी दिल्ली | 1 ऑक्टोबर 2023 : 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद (Hafiz Saeed) याच्या मुलाची हत्या झाल्याचे वृत्त समोर येत आहे. मुंबई हल्ल्यानंतर तो अनेक वर्ष उजळ माथ्याने फिरत होता. या हल्ल्यात त्याच्या सहभागाचे पुरावे सादर केल्यानंतर त्याच्यावर थातूरमातूर बंधन घालण्यात आली होती. या 26 ऑक्टोबर रोजी हाफिजचा मुलगा कमालुद्दीन सईद हा बेपत्ता झाल्याची बातमी आली होती. नंतर त्याचे अपहरण केल्याचे समोर आले होते. पेशावरमध्ये एका कारमधून आलेल्या काही जणांनी त्याचे अपहरण केले. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना कमालुद्दीनचा (Kamaluddin Saeed killed ) शोध घेत होती. पण त्याच्या हत्येचे वृत्त समोर येत आहे. हाफिज सईद हा दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयब्बाचा (LET) सहसंस्थापक आहे.

मृतदेह सापडल्याचे वृत्त

हाफिज सईदचा अनेक देशातील दहशतवादी कारवायात हात असल्याचे उघड झाले. अमेरिका, युरोपीय संघ, ऑस्ट्रेलिया, रशिया, भारतात त्याने हल्ले घडवून आणले होते. अमेरिकेने मुस्काटदाबी केल्यानंतर त्याच्याविरोधात थातूरमातूर कारवाई करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्र परिषद लष्कर-ए-तैयब्बाला दहशतवादी संघटना मानते. हाफिज सईदच्या मुलाचा मृतदेह पेशावर जवळील जब्बा घाटीत सापडल्याचा दावा सोशल मीडियातून करण्यात येत आहे. याविषयीचे अधिकृत अद्याप समोर आलेले नाही.

हे सुद्धा वाचा

मुंबई हल्ल्यातील सूत्रधार

हाफिज सईद हा मुंबईत हल्ल्याचा सूत्रधार होता. 26 नोव्हेंबर 2008 रोजी या हल्ल्यात 18 पोलीस आणि 166 नागरिकांना जीव गमवावा लागला होता. तर 300 अधिक जण या घटनेत जखमी झाले होते. मरणाऱ्यांमध्ये परदेशी नागरिकांचा पण समावेश होता. हा हल्ला हाफिजने घडवून आणल्याचे पुरावे भारताने सादर केले होते. हाफिजवर अमेरिकेने 10 दशलक्ष अमेरिकन डॉलरचे बक्षिस ठेवले आहे.

दहशतवाद्यांची फॅक्टरी

हाफिज हा जमात-उद-दावा या संघटनेच्या आडून दहशतवाद्यांची फॅक्टरी चालवत होता. लाहोरजवळ 50 किलोमीटर अंतरावर मुरीदके हे शहर आहे. हे शहर 1910 मध्ये इंग्रजांनी वसवले आहे. येथेच हाफिजची दहशतवाद्यांची फॅक्टरी आहे. याठिकाणी दहशतवादी कारवायांसाठी दहशतवाद्यांची भरती करण्यात येते. त्यांचा वापर अनेक देशात निरपराध नागरिकांचा जीव घेण्यासाठी करण्यात येतो. मुरीदके हे हाफिजची संघटना जमात-उद-दावाचे मुख्यालय आहे. या ठिकाणी हाफिज मोठा मदरसा चालवितो. याठिकाणीच दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येते.

पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?.