Ismail Haniyeh Killed : इराणनेच हमास चीफचा घात केला का? असे प्रश्न निर्माण होतायत, कारण…
Ismail Haniyeh Killed : इराणची राजधानी तेहरानमध्ये हमासचा प्रमुख इस्माइल हानिया मारला गेला. या हत्येमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. इराणनेच हमास नेत्याला धोका दिला का? अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यामागे कारणं सुद्धा तशीच आहेत. ईरानी रिवोल्यूशनरी गार्ड्सच्या एका गेस्ट हाऊसमध्ये हानिया मुक्कामाला होता.
हमास चीफ इस्माइल हानिया इराणची राजधानी तेहरानमध्ये एका हल्ल्यात मारला गेला. हानिया इराणच्या नव्या राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्यासाठी तेहरानमध्ये होता. हानियाच्या हत्येनंतर आम्ही बदला घेणार, असं हमासने म्हटलय. पण खरच ती ताकद त्यांच्यात आहे का?. हमास चीफच्या हत्येमागे इस्रायल असल्याच बोलल जातय. त्याशिवाय काही अन्य प्रश्न सुद्धा उपस्थित होतायत. हमास चीफच्या मृत्यूला जवळचाच माणूस कारणीभूत आहे का?. हा प्रश्न यासाठी निर्माण होतोय, कारण हानिया जिथे मारला गेला, तो इराणमधील सर्वात सुरक्षित भाग समजला जातो. राष्ट्रपतीच्या घरापासून ते ठिकाण फक्त 150 मीटर अंतरावर होतं. मग, अशा सुरक्षित भागात मिसाइल हल्ला कसा झाला?.
इस्माइल हानिया आणि त्याच्यासोबत आलेलं प्रतिनिधीमंडळ तेहरानच्या उत्तरेला ईरानी रिवोल्यूशनरी गार्ड्सच्या एका गेस्ट हाऊसमध्ये उतरलं होतं. हल्ला झाला, त्यावेळी इस्लामिक जिहाद सरचिटणीस जियाद अल-नखलाह आणि त्यांच्यासोबत आलेलं प्रतिनिधीमंडळ इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर होतं.
‘रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब होईल’
इराणी मीडियानुसार, हानियाच्या निवास स्थानावर एयरबॉर्न प्रोजेक्टाइलने हल्ला झाला. बुधवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास उत्तर तेहरामध्ये इस्माइल हानियाच्या घरावर हवाई दिशादर्शन करणाऱ्या प्रोजेक्टाइलने हल्ला केला. या घटनेची चौकशी सुरु आहे. हानियाच्या हत्येवर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, असं म्हटलं आहे. हानियाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब होईल, असं इराणने म्हटलय.
दोन एजन्सीचा महत्त्वाचा रोल
पाश्चिमात्य मीडियानुसार, हानियाला मारण्यात दोन एजन्सीचा हात आहे. मोसाद आणि CIA. त्यांनी हानियाची लोकेशन कळवली. योग्य लोकेशन समजल्यानंतर मिसाइलने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर इस्रायल मौन बाळगून आहे. इराणने इस्रायलला परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली आहे. रशिया आणि टर्कीने सुद्धा इस्रायल विरोधात मोर्चा उघडला आहे.
24 तासांसाठी इस्रायली एअरस्पेस बंद
हानियाच्या हत्येमागे इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादचा हात आहे. मोसाद मागच्या 15 वर्षांपासून हानियाला ट्रॅक करत होतं. इस्माइल हानिया 3 महिन्यापूर्वी टर्कीला शिफ्ट झाला होता. अचानक मोसादला हानिया इराणला जात असल्याची बातमी मिळाली. त्यानंतर तेहरानमधील मोसादच नेटवर्क एक्टिव झालं. तेहरानने हानियाला कडेकोट सुरक्षा बंदोबस्तामध्ये ठेवलं होतं. मोसादच्या डबल एजंटमुळे हानिया मारला गेला. हानियाच्या मृत्यूनंतर इस्रायल अलर्टवर आहे. त्यांनी 24 तासांसाठी इस्रायली एअरस्पेस बंद केला आहे.
हानियाची हत्या हे इराणच कारस्थान का?
तेहरान येथे हाय सिक्योरिटी जोनमध्ये झाली हत्या.
राष्ट्रपतीच्या घरापासून अवघ्या 150 मीटर अंतरावर हत्या.
इस्माइल हानियाच्या हत्येमध्ये इराणमधून कोण सहभागी ?
हानियाची हत्या होण्याआधी गोपनीय माहिती कशी नाही मिळाली?
ते मिसाइल पाडणं शक्य होतं का?
इराणचे नवीन राष्ट्रपती पेजेश्कियान पश्चिमेचे समर्थक
अमेरिका-इस्रायल बरोबर इराणने कुठली डील केलीय का?