हिज्बुल्लाह चीफच्या मृत्यूनंतर या मुस्लिम राष्ट्रात जल्लोष… मुसलमानांचा हिरो असणाऱ्या हसनवर का होती त्या राष्ट्राची नाराजी

Hassan Nasrallah Killed: जून 2013 मध्ये हिजबुल्लाहने अल कुसेर शहरातून पळून जाणाऱ्या सीरियन नागरिकांची हत्या केली. ऑक्टोबर 2013 मध्ये हिजबुल्लाहने अल-हिस्नियाहमधील नागरिकांवर क्रूरपणे हल्ले केले. अल झबदानीमध्ये शेकडो नागरिक मारले गेले. यामुळे हसन नसराल्लाहच्या मृत्यूची बातमी आल्यावर सीरियामध्ये आनंद साजरा करण्यात आला.

हिज्बुल्लाह चीफच्या मृत्यूनंतर या मुस्लिम राष्ट्रात जल्लोष... मुसलमानांचा हिरो असणाऱ्या हसनवर का होती त्या राष्ट्राची नाराजी
Hassan Nasrallah Killed
Follow us
| Updated on: Sep 29, 2024 | 3:03 PM

Hassan Nasrallah Killed : इस्त्रायल अन् हिज्बुल्लाह यांच्यातील युद्ध गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. या युद्धात इस्रायलला मोठे यश मिळाले आहे. इस्रायलने लेबनानकडे मोर्चा वळवल्यावर हिज्बुल्लाह चीफ हसन नसरल्लाहचा खात्मा केला आहे. 27 सप्टेंबर रोजी हसन नसरलल्लाह इस्त्रायलचा हल्लात मारला गेला. अनेक मुस्लिम राष्ट्रात हसन याचा मृत्यूवर दु:ख व्यक्त केले जात आहे. परंतु सीरियामधील सुन्नी मुसलमानांनी त्याचा मृत्यूनंतर जल्लोष केला आहे. नसरल्लाह संदर्भात या मुस्लिम देशांमध्ये दोन मते का निर्माण झाली?

हसन नसरल्ला याने 2006 मध्ये 33 दिवस इस्रायली सैन्याचा धैर्याने सामना केला. हिजबुल्लाहच्या सैनिकांनी इस्रायलच्या सीमेत घुसून त्यांच्या दोन सैनिकांचे अपहरण केल्याची घटना घडल्यानंतर हे युद्ध सुरू झाले. युद्ध संपल्यानंतर, हसन नसराल्लाह याला अरब जगता गौरवण्यात आले. कारण मुस्लिम राष्ट्रांत इस्त्रायलसमोर उभा राहणार तो एकमेव होता.

शिया अन् सुन्नी वाद

हसन नसरल्लाह याने अनेक वेळा इराणच्या इशाऱ्यावर काम केले. इराण हा शिया मुस्लिमांचे राष्ट्र आहे. अरब सुन्नी मुसलमांनाचा भाग आहे. हिज्बुल्लाहसुद्धा लेबनानमधील एक इस्लामी राजकीय पक्ष आहे. भूतकाळात अनेक वेळा जेव्हा शिया अन् सुन्नी वाद झाला तेव्हा, तेव्हा हसन नसरल्ला याने शियांची बाजू घेतली होती. 2008 मध्ये हिज्बुल्लाहच्या अतिरेक्यांनी बेरूतमधील सुन्नी भागावर ताबा मिळवला. त्यानंतर लेबनानमध्ये नवीन सरकार आल्यावर त्यांचे अतिरेकी माघारी फिरले. या नवीन सरकारमध्ये शिया मुस्लिमांचे वर्चस्व होते.

हे सुद्धा वाचा

सीरियामध्ये हसन याला यामुळे विरोध

सीरियामध्ये 2011 मध्ये हुकुमशाहाविरोधात उठाव झाला. सीरिया हे सुन्नी मुस्लिम बाहुल्य असलेला देश आहे. त्या ठिकाणी शिया अल्पसंख्याक आहे. त्यामुळे सीरियामध्ये गृहयुद्ध सुरु झाले. बशर अल-असद 2000 सीरिया राष्ट्रपती झाले. ते स्वत: शिया मुस्लिम आहे. जवळपास एक दशकानंतर, सीरियातील सुन्नींनी बशर सरकारवर पक्षपाताचा आरोप करत त्यांचा विरोध सुरु केली. हसन नसराल्लाहने बशर अल-असदची राजवट वाचवण्यासाठी हजारो हिजबुल्लाह सैनिकांना सीरियात पाठवले. त्यामुळे सीरियामधील हजारो सुन्नी मुस्लिमांना त्या सैनिकांनी मारुन टाकले.

जून 2013 मध्ये हिजबुल्लाहने अल कुसेर शहरातून पळून जाणाऱ्या सीरियन नागरिकांची हत्या केली. ऑक्टोबर 2013 मध्ये हिजबुल्लाहने अल-हिस्नियाहमधील नागरिकांवर क्रूरपणे हल्ले केले. अल झबदानीमध्ये शेकडो नागरिक मारले गेले. यामुळे हसन नसराल्लाहच्या मृत्यूची बातमी आल्यावर सीरियामध्ये आनंद साजरा करण्यात आला. सीरियन नागरिक त्याला सुन्नी मुस्लिमांचा खुनी मानतात.

'तेव्हा राणे आणि राज यांना जीवे मारण्याच्या धमक्या ठाकरेंनी दिलेल्या'
'तेव्हा राणे आणि राज यांना जीवे मारण्याच्या धमक्या ठाकरेंनी दिलेल्या'.
उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? शिवाजी पार्कवर कोणाची तोफ धडाडणार?
उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? शिवाजी पार्कवर कोणाची तोफ धडाडणार?.
'रोहित पवारांच्या मेंदूची तपासणी केली तर 50 % शेण...', मिटकरींची टीका
'रोहित पवारांच्या मेंदूची तपासणी केली तर 50 % शेण...', मिटकरींची टीका.
जरांगे पाटील अमित शहांवर संतापले, मराठ्यांच्या नादी लागू नका नाहीतर..
जरांगे पाटील अमित शहांवर संतापले, मराठ्यांच्या नादी लागू नका नाहीतर...
तर शाळांवर कडक कारवाई होणार, शिक्षण विभागाकडून मोठा शासन निर्णय जारी
तर शाळांवर कडक कारवाई होणार, शिक्षण विभागाकडून मोठा शासन निर्णय जारी.
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाही? 'लाडकी बहीण'वरून राऊतांची टीका
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाही? 'लाडकी बहीण'वरून राऊतांची टीका.
'दादा गुलाबी झाले तरी...', अजित पवार यांच्यावर कोणाचा निशाणा?
'दादा गुलाबी झाले तरी...', अजित पवार यांच्यावर कोणाचा निशाणा?.
म्हणून ABVPचा सुपडासाफ, सिनेट निवडणुकीवरुन राऊतांकडून सरकारला लक्ष्य
म्हणून ABVPचा सुपडासाफ, सिनेट निवडणुकीवरुन राऊतांकडून सरकारला लक्ष्य.
अक्षय शिंदेचा एन्काऊंटर खरा की खोटा? जितेंद्र आव्हाडांकडून ऑडिओ ट्विट
अक्षय शिंदेचा एन्काऊंटर खरा की खोटा? जितेंद्र आव्हाडांकडून ऑडिओ ट्विट.
आनंद दिघेंच्या मृत्यूवरून पुन्हा सवाल, शिरसाटांचा मोठा दावा अन नवा वाद
आनंद दिघेंच्या मृत्यूवरून पुन्हा सवाल, शिरसाटांचा मोठा दावा अन नवा वाद.