Syria War : पुतिन यांच्यासाठी नामुष्की, युक्रेन नाही, या देशात रशियन सैन्याची मोठी पिछेहाट
Syria War : रशिया युक्रेनमध्ये जिंकत आहे. पण दुसऱ्या एका देशात रशियन सैन्याची मोठी पिछेहाट झाली आहे. रशियाची मिग-23 फायटर विमान बंडखोरांच्या हाती गेली आहेत. असद आणि पुतिन यांच्या हातातून हा देश जाण्याची शक्यता आहे. महत्त्वाच म्हणजे अमेरिका बंदी घालून या दहशतवादी गटाला मदत करत आहे.
सीरियामध्ये फक्त असद सरकारलाच धोका नाहीय, तर सीरियात रशियन सैन्याच वर्चस्व धोक्यात आलय. हमा शहर ताब्यात घेतल्यानंतर हयातचे योद्धे रशियाचा गड असलेल्या होम्स शहराच्या बॉर्डरवर पोहोचले आहेत. अलेप्पो आणि हमामध्ये जे झालं, पुढच्या काही तासात होम्सची सुद्धा तशीच हालत होण्याची भिती आहे. हयात तहरीर अल शामचे फायटर पुढच्या काही तासात त्या शहरांचा ताबा घेतील. रशियन सैन्याचे तीन एअर बेस आणि नेवल बेस होम्समध्ये आहे. सीरियाचा गड पडणार का? असद आणि पुतिन यांच्या हातातून हा देश जाण्याची शक्यता आहे.
सीरियन सैन्य युद्ध क्षेत्र सोडून दमिश्कच्या दिशेने जात आहे. असद सरकारचं सैन्य मागे हटत असल्याने बंडखोर, सैन्य तळांवर ताबा मिळवत आहेत. बंडखोरांनी हल्ले करुन सीरियाई हवाई दलाची अनेक मिग-23 फायटर विमान ताब्यात घेतल्याची माहिती आहे. सीरियन सैन्याची उपकरण मिळवली आहेत. हयात तहरीर अल शामच्या फायटर्सनी अलेप्पोच्या नेयराब एअरबेसवरुन अनेक मिग-23 फायटर विमानं जप्त केली आहेत. सोशल मीडियावर बंडखोरांनी एअरबेस ताब्यात घेतल्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. एका व्हिडिओमध्ये बंडखोर विमानावर उभा असल्याच दिसत आहेत. हे विमान उड्डाण करण्याच्या स्थितीत दिसत नाहीय.
मिग-23 फायटर जेट्स बंडखोरांच्या हाती
युद्ध-ट्रॅकिंग आणि ओपन सोर्स इंटेलिजेंस अकाऊंट्सनुसार, कमीत कमी चार विमानांसह अज्ञात संख्येने L-39 आणि Mi-8 हेलीकॉप्टर्स जप्त केली आहेत. अन्य स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बंडखोरांनी अनेक विमान तळांवरुन जवळपास सात मिग-23 विमान जप्त केली आहेत.
कधीपासून सुरु झाली लढाई?
27 नोव्हेंबरपासून बंडखोरांनी असद सरकार विरोधात लढाई सुरु केली आहे. त्यांनी आतापर्यंत अलेप्पो, हामा आणि दर्रा ही शहरं ताब्यात घेतली आहेत. अल-कायदाशी संबंधित हयात तहरीर अल शामचे फायटर्स अन्य छोट्या-छोट्या कट्टरपंथीय गटांसोबत मिळून असद सरकार विरोधात लढत आहेत.
लढणाऱ्या गटांची विचारधारा वेगवेगळी
हयात तहरीर अल शाम गटावर संयुक्त राष्ट्र, अमेरिका आणि अन्य पाश्चिमात्य देशांनी बंदी घातली आहे. मात्र, असं असूनही या गटाला अमेरिका आणि टर्कीकडून समर्थन मिळतय. हयात तहरीर अल शाम सोबत लढणाऱ्या गटांची विचारधारा वेगवेगळी आहे. पण असद यांना सत्तेवरुन हटवण्याच्या या एकाच उद्देशाने हे सर्व गट एकत्र आले आहेत.