Israel-Hamas War | इस्त्राईल-हमास युद्धात चीनची एंट्री? मग ड्रॅगन, मध्य-पूर्वेत करतोय तरी काय

Israel-Hamas War | इस्त्राईल-हमास युद्धामुळे अमेरिकेने मध्य-पूर्वेत आपली ताकद वाढवली आहे. अमेरिकेने खास कंमाडो या भागात उतरवले आहेत. पण चीनच्या या भागातील एंट्रीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. चीने या भागात सुरु केलेली लुबबूड सर्वांनाच धक्का देणारी आहे. असे काय केले ड्रॅगनने

Israel-Hamas War | इस्त्राईल-हमास युद्धात चीनची एंट्री? मग ड्रॅगन, मध्य-पूर्वेत करतोय तरी काय
Follow us
| Updated on: Oct 22, 2023 | 4:28 PM

नवी दिल्ली | 22 ऑक्टोबर 2023 : इस्त्राईल आणि हमास युद्धात जगातील शक्तीशाली देशांना पण युद्धज्वराने पछाडले आहे. अमेरिका, त्याची मित्र राष्ट्रे, रशिया, चीन, उत्तर कोरिया या देशांना कधी एकदा या युद्धात उडी घेतो असे झाल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेने मध्य-पूर्वेतील त्यांची ताकद वाढवली आहे. खास कंमाडो इस्त्राईलच्या मदतीला तैनात केले आहे. तर चीन सुद्धा मागे नाही. चीनने या भागात त्यांची लुडबूड वाढवली आहे. रशियाच्या अगोदरच चीनच्या एंट्रीने जगाला हादरा दिला आहे. चीनच्या प्रवेशामुळे आपण तिसऱ्या महायुद्धाकडे तर खेचले जात नाही ना, अशी शंका संरक्षण तज्ज्ञांना येत आहे.

काय केले चीनने

अमेरिकेने या क्षेत्रात प्रभाव वाढवला आहे. तर चीनचा पण मध्यपूर्वेत वावर वाढला आहे. एवढेच नाही तर चीन अमेरिकेला टशन देत आहे. चीनने सहा युद्धनौका मध्यपूर्वेत तैनात केल्या आहेत. चीनची 44 वी नौदलाची एस्कॉर्ट टास्क फोर्स या क्षेत्रात नियमीत युद्ध अभ्यास करत आहे. गेल्या आठवड्यात ही तुकडी ओमान देशात तळ ठोकून होती. पीपल्स लिबरेशन आर्मीने इस्टर्न थिएटर टास्क फोर्सने ओमानच्या नौसेने सोबत युद्ध अभ्यास केला. शनिवारी मस्कद येथील एका गुप्त ठिकाणी ही तुकडी पोहचल्याचे वृत्त समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे युद्धनौकेवर

चीनच्या सहा युद्ध नौका या परिसरात गस्त घालत असल्याचे दिसून आले. या युद्धनौकांवर टाइप 052डी गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर, फ्रिगेट जिंगझोऊ आणि इतर जहाजांचा ताफा आहे. यादरम्यान चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी या भागाची, परिसराची पाहणी केली. त्यांनी ओमानच्या लष्करी अधिकाऱ्यांची भेट घेतली. दोन्ही देशातील लष्कराने बॉस्केटबॉलचा सामना खेळला.

चीनची भूमिका काय

हमास-इस्त्राईल युद्धाविषयी चीनने भूमिका जाहीर केली आहे. राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी गुरुवारी स्वतंत्र पॅलेस्टाईन आणि दोन राष्ट्र थेअरीवर भर दिला. या भागात हीच थेअरी लागू पडेल, असे जिनपिंग यांनी स्पष्ट केले. चीनने या भागात युद्धविरामाला प्राधान्य दिले आहे. दोन्ही बाजूने तातडीने युद्ध थांबविण्यात यावे असे आवाहन चीनने केले आहे.

अमेरिकावर चीनचा राग

अमेरिकेने दोन एअरक्राफ्ट कॅरिअर इस्त्राईलमध्ये उतरवल्यावर चीनने या भागात सहा युद्धनौका तैनात केल्या आहेत. इराणची दहशतवादी संघटना हिजबुला या युद्धात इस्त्राईलच्या विरोधात उतरण्याची शक्यता लक्षात घेत अमेरिका या भागात सक्रिय झाली आहे. अमेरिकेची ही वाढती ताकद बघून चीन पण या भागात उतरला आहे. अनेक लढाऊ विमानं या क्षेत्रात घिरट्या घालत आहेत. अमेरिकेने गेल्या 24 तासांत या भागात खास प्रशिक्षित 2000 सैनिक उतरवले आहेत. त्यामुळे चीनचा अमेरिकेवर राग आहे.

Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.