Hezbollah : मृत्यूनंतर पाच दिवसांत इराकमध्ये 100 हून अधिक नसरल्लाह पैदा; रोज वाढत आहे संख्या

Hezbollah- Israel War : हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाह हा इस्त्रायलच्या हल्ल्यात 27 सप्टेंबर रोजी मारल्या गेला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे नाव मुलांना देण्याची एकच लाट मुस्लिम देशात आली आहे. त्यातच इराकमध्ये अनेक नवजात मुलांचं नाव नसरल्लाह ठेवण्यात आले आहे.

Hezbollah : मृत्यूनंतर पाच दिवसांत इराकमध्ये 100 हून अधिक नसरल्लाह पैदा; रोज वाढत आहे संख्या
नसरल्लाहची आली लाट
Follow us
| Updated on: Oct 03, 2024 | 9:19 AM

हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाह क्षेपणास्त्र माऱ्यात मारल्या गेला. त्यानंतर मध्य-पूर्वेतील मुस्लिम देशात त्याचे नाव लहान मुलांना देण्याचे प्रमाण वाढले आहे. इराकमधील नवजातांचे नाव नसरल्लाह ठेवण्याची लाटच आली आहे. नसरल्लाह याच्या मृत्यूनंतर मध्यपूर्वेत एकच खळबळ उडाली. त्याच्या नावाची लोकप्रियता वाढली. इस्त्रायलविरोधात नसरल्लाह हा विरोधाचे प्रतिक मानण्यात येत आहे. मृत्यूनंतरही त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. त्यामुळे एक युद्ध हे पुढील युद्ध जन्माला घालतं हे भारतीय तत्त्वज्ञान अधोरेखित झाले आहे.

इस्त्रायलचा अचूक वार, हिजबुल्लाहचे मोठे नुकसान

हमास-इस्त्रायल युद्ध सुरू असतानाच हिजबुल्लाहने इस्त्रायलविरोधात मोर्चा उघडला होता. त्यानंतर इस्त्रायलने हिजबुल्लाह संघटनेला धडा शिकवण्याचे जाहीर केले. 27 सप्टेंबर 2024 रोजी एका हवाई हल्ल्यात हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाह मारल्या गेला. बेरूत येथील दहियेह या भागात हा हल्ला झाला. हा हिजबुल्लाहचा गड मानण्यात येतो. हल्ल्यावेळी नसरल्लाह हा 6 मजली इमारतीच्या बंकरमध्ये होता. या हल्ल्यात तो ठार झाला. त्यामुळे संपूर्ण अरब जगाताला मोठा धक्का बसला. हिजबुल्लाहचे अजून कंबरडे मोडण्याची घोषणा इस्त्रायलने केली आहे. तर दुसरीकडे नसरल्लाहाची लोकप्रियता वाढली आहे. नवीन जन्माला येणाऱ्या बालकांची नावं नसरल्लाह ठेवण्याची एकच लाट मध्य-पूर्वेतील मुस्लिम देशात आली आहे.

हे सुद्धा वाचा

नसरल्लाहचा अर्थ काय?

अरब राष्ट्रात नसरल्लाह हा खास शब्द मानण्यात येतो. त्याचे खास महत्त्व आहे. त्याचा अर्थ खुदा की जीत, देवाचा विजय असा होतो. सध्याच्या इस्त्रायलसोबतच्या संघर्षात या नावाने अजून लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळेच नवीन जन्माला येणारे बाळ अरब जगतात नसरल्लाह म्हणून पुढे येत आहे. इराकमध्ये 100 हून अधिक मुलांची नसरल्लाह असं नाव ठेवण्यात आलं आहे. इराणच्या आरोग्य खात्याने याविषयीची माहिती दिली आहे. जवळपास 100 हून अधिक नवजात बालकांचं नाव नसरल्लाह ठेवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजात हे नाव संघर्षाचे प्रतिक आहे.

कोण होता नसरल्लाह?

हसन नसरल्लाह याने 1992 मध्ये हिजबुल्लाहची कमान सांभाळली. या संघटनेचे लोक त्याला करिष्माई नेता मानतात. इस्त्रायल विरोध हा एकमेव अजेंडा असलेल्या या संघटनेला अनेक राष्ट्र दहशतवादी संघटना मानतात. हिजबुल्लाह एक मजबूत सैन्य राजकीय शक्ती म्हणून लेबनॉनमध्ये पुढे आली आहे. नसरल्लाहकडे भाषणाची हतोटी होती. तो प्रभावशाली वक्त्यांपैकी एक होता. त्याचा अरब जगतात मोठा प्रभाव होता. मृत्यूनंतर तो आता त्यांचा हिरो ठरला आहे.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.