Israel-Hezbollah War : हिजबुल्लाहचा थेट घरात घुसून नेतन्याहू यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, किती नुकसान झालं?

Israel-Hezbollah War : इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घरावर आज ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न झाला. इस्रायलने हिजबुल्लाहची जवळपास सर्व टॉप लीडरशिप संपवली आहे. पण, आता इस्रायलच्या हल्ल्यांमुळे हिज्बुल्लाह अजून आक्रमक झाला आहे.

Israel-Hezbollah War : हिजबुल्लाहचा थेट घरात घुसून नेतन्याहू यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, किती नुकसान झालं?
Isarel PM netanyahu
Follow us
| Updated on: Oct 19, 2024 | 1:59 PM

हिजबुल्लाहने नेतन्याहू यांच्यावर घरावर ड्रोन हल्ला केल्याचा दावा केला आहे. इस्रायलच्या कैसरिया भागात हिजबुल्लाहने तीन ड्रोन्सच्या माध्यमातून हा हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामागे हिजबुल्लाहच खरं टार्गेट या भागातील इस्रायली पंतप्रधानांच निवासस्थान होतं. इस्रायलने हिजबुल्लाहचे दोन ड्रोन्स पाडले. पण एक ड्रोन कैसरियामधील एका इमारतीवर आदळलं. IDF नुसार, या हल्ल्यात कोणीही जखमी झालेलं नाहीय. इस्रायली सैन्याने दोन ड्रोन्स पाडले असून चौकशी सुरु आहे.

कैसरिया ड्रोन हल्ल्याबद्दल इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाकडून स्टेटमेंट जारी करण्यात आलं आहे. हल्ल्याच्यावेळी बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांची पत्नी कैसरिया येथील निवासस्थानी नव्हते. हिजबुल्लाहने ड्रोन हल्ल्याद्वारे इस्रायली पंतप्रधानांच्या निवासस्थानाला लक्ष्य करण्याच प्रयत्न केला. हिजबुल्लाहच ड्रोन परिसरात घुसताच सायरन वाजू लागले. यानंतर इस्रायली सैन्याने हेलीकॉप्टरद्वारे ड्रोनला टार्गेट केलं.

संपूर्ण इस्रायल टार्गेटमध्ये असल्याचा दिलेला इशारा

23 सप्टेंबरला इस्रायलने लेबनानमध्ये हिजबुल्लाह विरुद्ध सैन्य अभियान सुरु केलं होतं. या दरम्यान 27 सप्टेंबरला बेरुत येथे झालेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाहचा मृत्यू झाला. ऑक्टोंबरच्या सुरुवातीला इस्रायलने नसरल्लाहचा उत्तराधिकारी सफीद्दीनला मारल्याचा दावा केला. त्यानंतर हिजबुल्लाहने इस्रायलवरील हल्ले वाढवले आहेत. काही दिवसांपूर्वी हिजबुल्लाहचा डेप्युटी चीफ नईम कासिमने इस्रायलचे सर्व भाग त्याच्या टार्गेटमध्ये आहेत, असं म्हटलं होतं.

किती हजार ज्यूंना घर सोडावं लागलं?

हिजबुल्लाह विरुद्ध लेबनानमध्ये इस्रायली हल्ले सुरु आहेत. 23 सप्टेंबरपासून सुरु असलेल्या या हल्ल्यात आतापर्यंत जवळपास 2000 लोकांचा मृत्यू झाला आहे. 12 लाखापेक्षा जास्त लोक विस्थापित झाले आहेत. हिजबुल्लाहकडून उत्तर इस्रायलवर हल्ले सुरु होते, त्यामुळे 60 हजार ज्यूंना आपल घर सोडावं लागलं आहे.

सर्व टॉप लीडरशिप संपवली

इस्रायलने या सर्व ज्यूंना पुन्हा आपल्या घरी उत्तर इस्रायलमध्ये आणण्याचा संकल्प करुन हिजबुल्लाह विरोधात मोठी सैन्य करावाई सुरु केली. इस्रायलने हिजबुल्लाहची जवळपास सर्व टॉप लीडरशिप संपवली आहे. आता इस्रायलच्या हल्ल्यांमुळे हिज्बुल्लाह अजून आक्रमक झाला आहे. आता नेतन्याहू यांच्या घराला टार्गेट करण्याचा प्रयत्न झालाय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.