18 व्या दशकात ख्रिश्चन धर्म स्वीकारणारे हिंदू देवसहायम यांना संत उपाधी, पहिल्यांदाच एका भारतीयाचा पोपकडून मोठा सन्मान

देवसहायम पिल्लाई यांचा जन्म २३ एप्रिल १७१२ रोजी कन्याकुमारीत एका हिंदू नायर परिवारात झाला होता. त्यावेळी हा भाग त्रावणकोर साम्राज्याचा भाग होता. त्यांचे वडील हे हिंदू मंदिरात पुजारी होते.

18 व्या दशकात ख्रिश्चन धर्म स्वीकारणारे हिंदू देवसहायम यांना संत उपाधी, पहिल्यांदाच एका भारतीयाचा पोपकडून मोठा सन्मान
Indian saint DevsahayamImage Credit source: social media
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 5:16 PM

नवी दिल्ली अठराव्या दशकात ख्रिश्चन धर्म स्वीकारणारे (converted to Christianity )हिंदू देवसहायम (Hiudu Devsahayam) यांच्या जन्मानंतर ३०० वर्षांनी त्यांना संतत्वाची (new saint)पदवी बहाल करण्यात आली आहे. व्हटिकन सिटीत पोप यांनी त्यांना संतत्वाची उपाधी दिली आहे. संताची उपाधी मिळणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत. देवसहायम पिल्लाई यांचा जन्म २३ एप्रिल १७१२ रोजी कन्याकुमारीत एका हिंदू नायर परिवारात झाला होता. त्यावेळी हा भाग त्रावणकोर साम्राज्याचा भाग होता. त्यांचे वडील हे हिंदू मंदिरात पुजारी होते. देवसहायम यांनमा संस्कृत, तामीळ आणि मल्याळम या भाषा येत होत्या.Pope Francis has recognized 10 new saints of the Catholic Church in a canonization Mass at the Vatican https://t.co/k35yZ1Q9Wv

— Catholic News Agency (@cnalive) May 15, 2022

हे सुद्धा वाचा

एका डच कमांडरमुळे ख्रिश्चन धर्माच्या संपर्कात

डच नेव्ही कमांडर कॅप्टन युस्टाचियस डी लॅनॉय यांना इस्ट इंडिया कंपनीच्या वतीने १७४१ साली कन्याकुमारीत पाठवण्यात आले होते. इथे त्रावणकोरांच्या अख्यतारित असलेल्या बंदरावर कब्जा करण्यासाठी कॅप्टनची नेमणूक करण्यात आली होती. यावेळी युद्ध झाले. या युद्धात त्रावणकोरांच्या सैन्यासमोर, डच कमांडर आणि त्यांच्या सैन्याच्या तुकडीचा पराभव झाला. त्यानंतर कमांडर आणि त्यांच्या सैन्याला जेलमध्ये टाकण्यात आले. काही काळाने माफी मिळाल्यानंतर, डच कमांडरला त्रावणकोरच्या सैन्याचे सेनापती करण्यात आले. यानंतर या कमांडरने पराक्रम दाखवत, अनेक युद्ध जिंकली आणि त्रावणकोर राज्याची सीमा वाढवली. याच काळात या कमांडर आणि देवसहायम यांची भेट झाली. देवसहायम यांनी या कमांडरच्या सूचनेनुसार १७४५ साली ख्रिश्चन धर्म स्वीकारला.

धर्मासोबत नावही बदलले

देवसहायम यांचे नाव निळकंठ पिल्लई असे होते. खअरिश्चन धर्म स्वीकारण्यासाठीची बप्तिस्मा केल्यानंतर, त्यांचे नाव लेजारुस असे करण्यात आले. लेजारुसचा अर्थ आहे देवाची मदत, तामीळ आणि मल्याळम भाषेत याचा अनुवाद देवसहायम असा होतो. याच नावाने ते पुढे प्रसिद्धीला आले.

गोळी मारुन देवसहायम यांची हत्या

त्रावणकोर राज्य या धर्मांतराच्या विरोधात होते, त्याचा कोप देवसहायम यांना सहन करावा लागला. फएब्रुवारी २०२० मध्ये याबाबत व्हिटिकनमधून एक पत्रक काढण्यात आले होते., त्यात लिहिले होते कीदेवसहायम यांचे धर्मांतरण, त्यांचा मूळ धर्म असलेल्या हिंदू धर्मातील प्रमुखांना आवडले नाही. त्यांच्याविरोधात राजद्रोह, गुप्तहेर असल्याचे खोटेनाटे आरोप ठेवण्यात आले. त्यांना प्रशासनातील पदावरुन हटवण्यात आले आणि जेलमध्ये टाकण्यात आले. त्यानंतर १४ जानेवारी १७५२ रोजी त्यांना गोळी मारुन देवसहायम यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांना शहिदाचा दर्जा ख्रिश्चन धर्मात मिळाला

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.