कोहिनूर हिरा ज्यांनी घातला त्यांचा सत्यानाश झाला, ब्रिटिश घराण्यात पुरुषांनी का घातला नाही कोहिनूर?

फक्त हिऱ्यांचा व्यवसाय पाच लाख रोजगार देतो.. मात्र ज्या हिऱ्यासाठी इतिहासात राजवटी लुटल्या गेल्या, खून झाले., कपट-कारस्थानं रचली गेली. आणि जो आजही जगातला सर्वात मौल्यवान हिरा आहे, तो भारतात येणार का., हा प्रश्न अनुत्तरित आहे..

कोहिनूर हिरा ज्यांनी घातला त्यांचा सत्यानाश झाला, ब्रिटिश घराण्यात पुरुषांनी का घातला नाही कोहिनूर?
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 12:11 AM

मुंबई : हाच तोच मुकूट आहे, ज्याच्या सौंदर्याचा खरा ताज भारताचा कोहिनूर हिरा आहे. जवळपास 170 वर्षांपासून ब्रिटनच्या महाराण्या त्याच कोहिनूरला मुकूटात जडवून जगातली सर्वात मौल्यवान गोष्ट मिरवतात. सध्या कोहिनूर(Kohinoor Diamond) हिरा नेमका कुठं आहे? कोहिनूरला शापित हिरा का म्हटलं जातं? आत्ताचे 5 देश आणि 7 राजवटींच्या हातून गेलेला कोहिनूर फक्त ब्रिटीश राजघराण्यालाच कसा लाभला? आणि ब्रिटनच्या राणीच्या मृत्यूनंतर तरी कोहिनूरच्या भारत वापसीच्या चर्चा फळाला येतील का? या साऱ्या उत्तरांआधी कोहिनूर ब्रिटीश मुकूटात नेमका कुठं असतो., आणि सध्या कोहिनूर कुठं आहे.

ज्या हिऱ्यासाठी इतिहासात राजवटी लुटल्या गेल्या, खून झाले, कट-कारस्थानं रचली ती संपूर्ण कहाणी वाचा…

हा ब्रिटनच्या राणीचा मुकूट आहे…..आणि त्या मुकूटाच्या क्रॉसखाली मुख्यरत्न म्हणून लावण्यात आलेला हाच हिरा म्हणजे कोहिनूर आहे..

महाराणी अँलेक्झांड्रानं कोहिनूरला पहिल्यांदा परिधान केलं

1851 च्या दरम्यान महाराणी व्हिक्टोरियाच्या हाती कोहिनूर गेला, त्यानंतर असं म्हणतात की महाराणी अँलेक्झांड्रानं कोहिनूरला पहिल्यांदा परिधान केलं, नंतर महाराणी मैरीनं , त्यानंतर महाराणी एलिझाबेथ, नंतर आता निधन झालेल्या महाराणी इलिझाबेथ दुसऱ्या आणि त्यांच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स यांच्या पत्नी कैमिला पार्कर त्यांच्या मुकूटात कोहिनूर असणार आहे

ज्या हिऱ्याच्या किंमतीचा अंदाज आजवर कुणालाच आलेला नाही..

मात्र ब्रिटनच्या राणी सदैव कोहिनूरवाला मुकूट मिरवत नाहीत.. अतिशय खासप्रसंगीच कोहिनूर हिरा जडीत असलेला मुकूट वापरला जातो….सध्या कोहिनूर लंडनच्या राष्ट्रीय संग्रहालयात आहे… ज्या हिऱ्याच्या किंमतीचा अंदाज आजवर कुणालाच आलेला नाही, ज्याच्यावर भारतासहीत 5 देश दावे सांगतात, आणि जो जवळपास 1 हजार वर्षात 7 राजवटींचा ताज बनला होता., तो भारताचा कोहिनूर म्हणजे हाच.

आता कोहिनूरला शाप असल्याची चर्चा

आता कोहिनूरला शाप असल्याची चर्चा का होते, आणि कोहिनूर भारत, इराण, अफगाणिस्तान, त्यानंतर पुन्हा भारत आणि भारतातून सातासमुद्रापार ब्रिटनला कसा पोहोचला, ते

समजून घेण्यासाठी कोहिनूरची कहाणी पाहूयात

अशी धारणा आहे की कोहिनूर महाभारताच्या काळापासून अस्तित्वात आहे…तेव्हा त्याला श्यामंतक नावानं ओळखलं जायचं..पण काही म्हणतात की श्यामंतक हिरा आणि कोहिनूर हे दोन्ही वेगवेगळे आहेत…. मात्र जी थीअरी सर्वाधिक प्रचलित आहे.

कोल्लूरच्या गोवळकोंडा नावाच्या खदानीतून

कोहिनूर सर्वात आधी कोल्लूरच्या गोवळकोंडा नावाच्या खदानीतून मिळाला… जे सध्या आंध्र प्रदेशात आहे..गोवळकोंडाच्या कृष्णा नदीच्या काठावर अनेक मौल्यवान हिरे मिळाल्याचा इतिहास आहे.

मात्र हा हिरा खानीतून पहिल्यांदा कोणत्या राजाच्या हाती गेला, यावरुन दावे-प्रतिदावे आहेत. काही जण म्हणतात की १३ व्या शतकात काकतीय वंशाच्या राजघराण्याकडे कोहिनूर होता…तर काहींच्या मते ग्वाल्हैरच्या एका राजाकडे सर्वात आधी कोहिनूर पोहोचला.

अल्लाउदीन खिलजीनं कोहिनूर मिळवला

प्रचलित दाव्यांनुसार काकतिय साम्राज्याचा पराभव करुन अल्लाउदीन खिलजीनं कोहिनूर मिळवला. त्यानंतर नादिर शहानं युद्ध जिंकल्यानंतर कोहिनूरवर त्याची मालकी झाली… शहाच्या मृत्यूनंतर त्याचा सहकारी अहमद शहा दुरानीला कोहिनूर सांभाळण्याची जबाबदारी दिली गेली.

नंतरच्या युद्धात हाच कोहिनूर पंजाबचे राजे रणजिंतसिंहाकडे पोहोचला…..नंतर ब्रिटीशांनी पंजाबची सत्ता मिळवल्यानंतर रणजितसिंहांकडचा कोहिनूर ब्रिटनकडे गेला…

ज्या राजाच्या हाती कोहिनूर गेला…त्याचं अधपतनही झालं

आता कोहिनूर शापित हिरा असल्याची चर्चा का होते., ते सुद्धा पाहूयात… असं म्हणतात की 13 व्या शतकापासूनच कोहिनूर शापित हिरा असल्याच्या चर्चा होत्या….ज्या राजाच्या हाती कोहिनूर गेला, तो ज्या वेगानं शक्तिशाली झाला.

तितक्याच वेगानं त्याचं अधपतनही झालं. त्यासाठी कोहिनूर हिऱ्याच्या प्रवास आणि त्यानंतर घडलेल्या घटनाबद्दल अजून एक थिअरी मांडली जाते.

बाबरनाम्यात कोहिनूरबद्दल बरचं लिहून ठेवलं

ती म्हणजे मधल्या बऱ्याच काळात कोहिनूर मुगलांकडेही होता.. मुगलांचा संस्थापक बाबरनं त्याच्या बाबरनाम्यात कोहिनूरबद्दल बरचं लिहून ठेवलंय…..मुगलांमध्ये बाबरनंही स्वतःजवळ कोहिनूर ठेवला.

शहाँजहानचे वाईट दिवस सुरु

बाबरनंतर शहाँजहाननं मयुर सिंहासनात कोहिनूरला लावलं.आणि त्यानंतरच शहाँजहानचे वाईट दिवस सुरु झाल्याचं बोललं जातं….मुलगा औरंगजेबानंच वडिल शहाजहानला बंदी केलं.

औरंगजेबाच्या राजवटीत कोहिनूर आल्यानंतर इराणी राजवटीच्या नादीर शहानं मुगलांवर हल्ला केला… आणि लुटीत कोहिनूर हिसकावून घेतला…. बरोब्बर या यु्दधानंतर नादीर शाहाच्या राजवटीत यादवी माजली…

नादीर शहाची हत्या

अनेक स्वकीय लोकांनी बंड केलं.. आणि नादीर शहाची हत्या झाली… पुढे हा हिरा नादीर शहाकडून नातूकडे…त्या नातूकडून अफगाणिस्तानच्या अहमद अब्दालीकडे म्हणजे आत्ताच्या अफगाणिस्तानात पोहोचला..

अहमद अब्दालीकडून राजा अहमद शहा दुर्रांनीकडे गेला.. दुर्रानीकडे कोहिनूर गेल्यानंतर त्याचाही मृत्यू झाला….पुढे कोहिनूरची जबाबदारी उत्तराधिकारी शुजा दुर्रानीकडे गेले..

कोहिनूर जवळ आल्यानंतर दुर्रानीच्याच स्वकीयांनी पुन्हा सत्ता काबीज करत शुजा दुर्रानीला दूर केलं.

कोहिनूर ब्रिटिश राणीच्या मुकूटातला ताज बनला

त्यानंतर शुजा दुर्रानी कोहिनूर हिरा वाचवत लाहोरला आला…आणि लाहौरमध्ये दुर्रानीची सत्ता पुन्हा मिळवून देण्याच्या मोबदल्यात शुजा दुरार्नीनं कोहिनूर पंजाबचे राजे रणजितसिंगाकडे दिला..

पुढे पंजाबच्या राजांची सत्ताही ब्रिटीशांनी हिसकावली… आणि कोहिनूर ब्रिटिश राणीच्या मुकूटातला ताज बनला..

कोहिनूरचा प्रवास हा भारत, भारतहून इराण, इराणहून अफगाणिस्तान, अफगाणिस्तानहून आत्ताचा पाकिस्तान, पाकिस्तानहून पुन्हा भारत आणि भारतातून ब्रिटन असा झालाय

अकबरानं कधीच कोहिनूर स्वतःजवळ ठेवला नाही

ज्या सात राजांनी कोहिनूर बाळगला., त्यांची एकतर हत्या झाली., किंवा त्यांची सत्ता धुळीस मिळाली… असं म्हणतात की मुगलांमध्ये फक्त अकबरानं कधीच कोहिनूर स्वतःजवळ ठेवला नाही….म्हणून मुगलांच्या वंशात अकबराची कारकिर्दी सर्वात उजवी मानली जाते.

कोहिनूर शापित असल्याच्या चर्चा ब्रिटनपर्यंतही

दरम्यान, कोहिनूर शापित असल्याच्या चर्चा ब्रिटनपर्यंतही गेल्या होत्या….पण त्या चर्चांमध्येही एक मेख होती., ती म्हणजे जर कोहिनूरला महिला परिधान करेल., तर कोहिनूर शापमुक्त ठरेल… योगायोगानं ब्रिटनच्या राजघराण्यात कोहिनूरला कधीच राजानं परिधान केलं नाही.

हा हिरा शापित असल्याचं लिहिलं गेलं

फक्त ब्रिटनच्या राण्यांच्या मुकुटातच कोहिनूर जडला गेला. ब्रिटिश लोक शाप-उशाप सारख्या गोष्टी मानतात का, असा प्रश्न पडला असेल. तर लंडनच्या संग्रहालयात ठेवलेला हा एक हिरा बघा… ज्याच्यापुढे हा हिरा शापित असल्याचं लिहिलं गेलंय.

ज्याची जगावर सत्ता आहे, त्याच्याच हाती कोहिनूर

कोहिनूरची किंमत नेमकी किती आहे., याचा जगात कुणालाच अंदाज नाही. कारण कोहिनूर एक तर भेट दिला गेला., किंवा तो जिंकला गेला. त्याची कधीच बोली लागली नाही., आणि कधीच कुणी खरेदीही केली नाही…. पण बाबरनाम्यानुसार ज्याची जगावर सत्ता आहे, त्याच्याच हाती कोहिनूर असेल., असं या हिऱ्याबद्दल लिहिलं गेलंय.

वास्तविक कोहिनूर आधी 700 कॅरेटहून जास्त

वास्तविक कोहिनूर आधी 700 कॅरेटहून जास्त होता.. औरंगजेबानं एका अफगाणी कारागिराकडून त्याला धार दिली..मात्र नवख्या कारागिरानं कोहिनूरचा मोठा हिस्सा तोडला… आणि कोहिनूर 700 कॅरेटहून 186 कॅरेट झाला…म्हणजे कोहिनूरचा 600 कॅरेटचा भाग वाया गेला.

राणीच्या काळात कोहिनूरला पुन्हा धार

यावर चिडलेल्या औरंगजेबानं कारागिराला दंडही ठोठावला होता. नंतर व्हिक्टोरिया राणीच्या काळात कोहिनूरला पुन्हा धार देण्यात आली, त्यामुळे कोहिनूर 186 कॅरेटवरुन 105 कॅरेट झाला…

भारतानं कोहिनूर हिरा परत देण्याची मागणी केली

स्वातंत्रानंतर सर्वात आधी भारतानं कोहिनूर हिरा परत देण्याची मागणी केली होती., मात्र ब्रिटननं ती नाकारली. त्यानंतर पाकिस्तान, अफगाणिस्ताननं सुद्दा कोहिनूरवर दावा सांगितला.

कोहिनूर ब्रिटनच्या वैभवाचं प्रतिक म्हणून पार्थिवावर कसा

जेव्हा 2002 ब्रिटनच्या राणीचा मृत्यू झाला., तेव्हा कोहिनूरवाल्या मुकूटाला त्यांच्या पार्थिवावर ठेवण्यात आलं. त्यावरुन ब्रिटनमधल्या शिखांनी मोठा विरोधही केला होता. आमच्याच देशातून चोरी झालेला कोहिनूर ब्रिटनच्या वैभवाचं प्रतिक म्हणून पार्थिवावर कसा काय ठेवला जाऊ शकतो, म्हणून आक्षेप घेण्यात आला.

हिरा हे सदा के लिए

500 वर्षांपूर्वीचे जगभरात जे मौल्यवान हिरे आहेत., त्यापैकी असंख्य हिरे भारतातलेच आहेत. खुद्द ब्रिटन सुद्दा हे मान्य करतो. त्यासाठी लंडनच्या संग्रहालयात लिहिलेली ही पाटी वाचा…

आज अवस्था ही आहे की 2013 साली संपूर्ण भारताल्या खदानींमधून फक्त 40 हजार कॅरेट हिऱ्यांचं उत्खनन्न झालं होतं. ज्याचा जागतिक उत्पादनातला वाटा १ टक्क्यांहूनही कमी होता.. पण आजही जगातले 90 टक्के हिऱ्यांचं कटिंग आणि पॉलिशिंगचं काम सुरतमध्ये होतं.

ज्या हिऱ्यासाठी इतिहासात राजवटी लुटल्या गेल्या, खून झाले., कपट-कारस्थानं रचली

फक्त हिऱ्यांचा व्यवसाय पाच लाख रोजगार देतो.. मात्र ज्या हिऱ्यासाठी इतिहासात राजवटी लुटल्या गेल्या, खून झाले., कपट-कारस्थानं रचली गेली. आणि जो आजही जगातला सर्वात मौल्यवान हिरा आहे, तो भारतात येणार का., हा प्रश्न अनुत्तरित आहे..

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.