Los Angeles Fire : आगीने अमेरिका हादरली, संसार उद्धवस्त, लोक रस्त्यावर आले, महाप्रचंड नुकसान
Los Angeles Fire : अमेरिकी राज्य कैलिफोर्नियाच्या लॉस एंजिलिसमध्ये भीषण अग्नितांडव सुरु आहे. जंगलात पेटलेल्या या वणव्याने अनेक घरांचा, इमारतींचा घास घेतला. त्यामुळे भरले संसार उद्धवस्त झाले आहेत. आधी जिथे श्रीमंती दिसायची, तिथे आता भकास, राख दिसत आहे. अमेरिकेच अत्यंत महाप्रचंड अस नुकसान या वणव्यामुळे झालं आहे.
अमेरिकेतील राज्य कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजिलिसमध्ये अग्नितांडव सुरु आहे. या अग्नितांडवाने सुपरपॉवर अमेरिकेला अक्षरक्ष: हादरवून सोडलय. महाप्रचंड नुकसान झालय. रस्त्यावर रात्र काढण्यासाठी लोक मजबूर झाले आहेत. हजारो घरं आगीत जळून खाक झाली आहेत. लोकांना रस्त्यावर व मदत शिबीरांचा आधारा घ्यावा लागतोय. या आगीमुळे आतापर्यंत 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. मागच्या चार दिवसांपासून लागलेली ही आग 40 हजार एकरमध्ये पसरली आहे. यात 29 हजार एकरचा परिसर पूर्णपणे जळून खाक झाला आहे. कॅलिफोर्नियाच्या जंगलापासून ते घरापर्यंत बरच काही या आगीत जळून खाक झालय. पाण्याची फवारणी हाच या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा एकमेव मार्ग निवडण्यात आला आहे. कॅलिफोर्नियातील अनेक बँका या आगीत जळून खाक झाल्या आहेत.
हॉलिवूड हिल्समध्ये राहणाऱ्या अनेक हॉलिवूड कलाकारांना नाईलाजाने आपलं घर सोडावं लागलं आहे. त्याशिवाय अनेक कलाकारांची कोट्यवधींची घर जळून खाक झाली आहेत. सेंटा एना हवेचा वेग जितका वाढतोय, तितकीच दिशा सुद्धा बदलतेय. लॉस एंजेलिसचा सनसेट बुलेवार्डला आगीच्या ज्वाळांनी घेरलय. आगीने इतकं विक्राळ रुप धारण करण्याला हवा कारणीभूत आहे.
सर्वसामान्यच नाही, सेलिब्रिटींच सुद्धा प्रचंड नुकसान
कॅलिफोर्नियाच्या या आगीत पॅरिस हिल्टन, टॉम हँक्स, स्टीवन स्पिलबर्गसारख्या हॉलिवूड सेलिब्रिटीज घर जळून खाक झालय. उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचं घर रिकाम करण्यात आलय. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडने यांचे सुपूत्र हंटर बायडेन यांचं आलिशान घर आगीत जळून खाक झालय. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इटलीचा दौरा रद्द केलाय.
किती अब्ज डॉलर्सच नुकसान?
या आगीमध्ये अमेरिकेच मोठ नुकसान झालय. वीमा कंपन्यांच सुद्धा नुकसान झालय. कारण या क्षेत्रातील घरांची किंमत 60 लाख डॉलर ते 21 कोटी डॉलरपर्यंत आहे. माहितीनुसार, आतापर्यंत विमा कंपन्यांचं 20 अब्ज डॉलर्सच नुकसान झालय. हे नुकसान 200 अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
अजूनही किती हजार इमारतींना धोका
कॅलिफोर्नियात लागलेल्या या आगीत कमीत कमी 10 हजार इमारती जळून खाक झाल्या आहेत. एकट्या लॉस एंजेलिसच्या पॅलिसेड्समध्ये 5,300 पेक्षा अधिक इमारती नष्ट झाल्या आहेत. 60 हजारपेक्षा अधिक इमारतींना अजूनही धोका आहे.