हाँगकाँगला लायनरॉक चक्रीवादळ धडकलं, 60 किमीच्या वेगाने वादळी वारे आणि मुसळधार पाऊस, महापूराचा इशारा
Hong Kong Storm: या वादळामुळे हाँगकाँगच्या सीमेपलिकडे (China Hong Kong Storm) असणाऱ्या ग्वांगडोंग प्रांतात मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे पूर येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हाँगकाँग: लायनरॉक नावाचं (Tropical Storm Lionrock)चक्रीवादळ हाँगकाँगला धडकलं आहे, ज्यामुळे ताशी 65 किमी वेगाने वारे वाहत आहेत. हाँगकाँग वेधशाळेने ही माहिती दिली आहे. दरम्यान आधी हे चक्रीवादळ आधी नैऋत्येला होते, जे आता हॉंगकॉंगला धडकलं आहे. इथली लोकसंख्या 75 लाखांच्या जवळपास आहे. या वादळाने पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढवला आहे. (hong kong tropical storm lionrock killed one person after scaffolding collapses)
इमारत दुर्घटना, काही लोक अडकले
जोरदार वाऱ्यांमुळे, इथल्या एका सुरु असलेल्या बांधकामाचा काही भाग (Scaffolding Collapse) पडला आहे. ज्यात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. अजूनही काही लोक यात अडकले असल्याचं सांगितलं जात आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी असे वृत्त दिले की, या दुर्घटनेनंतर काही कामगार जवळील 2 कारमध्ये शिरले, त्यातून त्यांना नंतर सुखरुप बाहेर काढण्यात आलं. या वादळामुळे चीनमध्येही नैसर्गिक आपत्तीचा धोका वाढला आहे. चीनमध्ये, नैसर्गिक संसाधन मंत्रालय आणि चिनी हवामानशास्त्र प्रशासनाने शांक्सी, सिचुआन आणि गांसु प्रांतांसह उत्तर आणि पश्चिम भागात संभाव्य भूस्खलन आणि पूराचा इशारा जारी केला आहे.
चीनच्या या भागांमध्ये पूराचा इशारा
दरम्यान, या वादळामुळे हाँगकाँगच्या सीमेपलिकडे (China Hong Kong Storm) असणाऱ्या ग्वांगडोंग प्रांतात मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे पूर येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हाँगकाँगच्या दक्षिणेकडील हेनान प्रांत आणि दक्षिण किनारपट्टीच्या इतर भागात वादळाची शक्यता आहे. चीनच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या असलेल्या येलो नदीच्या मधल्या आणि खालच्या भागातही पुराचा इशारा देण्यात आला आहे.
चीनसाठी हे वर्ष नैसर्गिक आपत्तींचं
चीनमध्ये या वर्षी पूर आणि मुसळधार (Floods in China) पावसामुळे कहर माजवला आहे. जुलैमध्ये मुसळधार पावसाने हेनान प्रांताचे मुख्य शहर झेंग्झौ इथं 292 लोकांचा बळी घेतला. चीनमध्ये दरवर्षी खराब हवामानामुळे पूर येतो, विशेषत: त्याच्या मध्य आणि दक्षिणेकडील प्रदेशांमध्ये. चीनमध्ये सर्वात भयंकर पूर 1998 मध्ये आला, जेव्हा 2,000 हून अधिक लोक मारले गेले आणि जवळजवळ 30 लाख घरं उद्ध्वस्त झाली, त्यातील बहुतेक घरं ही चीनची सर्वात आक्रमक नदी यांग्त्झीच्या काठावर होती.
हेही वाचा: