हॉस्पिटल तुडूंब, महिला, मुलांचा आक्रोश, जमिनीवर मृतदेहांची रास… हे चित्रं पाहून संपूर्ण जग हादरलंय…
माझे वडील खूप आजारी होते. त्यांना घेऊन आम्ही तीन रुग्णालयात गेलो. पण बेड मिळाला नाही. त्यांच्यावर उपचारही झाला नाही. त्यानंतर त्यांना सिव्हिल एव्हिएशन रुग्णालयात घेऊन गेलो.
बीजिंग: तब्बल दोन वर्ष संपूर्ण जगाला हादरवून सोडल्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाने चीनमध्ये हाहाकार माजवला आहे. चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने अनेकांचे बळी घेतले आहेत. चीनमध्ये कोरोनामुळे रोज हजारो लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. मात्र, रोज किती लोकांना कोरोनाची लागण होतेय याचा आकडा देण्यात आलेला नाहीये. मात्र, चीनच्या रुग्णालयातील फोटो आणि व्हिडीओ पाहून चीनमध्ये कोरोनाचा कहर झाल्याचं पाहायला मिळत आहे. चीनमधील सर्वच रुग्णालये तुडूंब भरली आहेत. मृतदेह ठेवण्यासाठी जागा नाहीये, त्यामुळे मृतदेहांना जमिनीवर ठेवण्यात आले आहे. सगळीकडे मृतदेहांची रास दिसत असून मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. या दृश्यामुळे चीनच नव्हे तर अख्ख जग हादरून गेलं आहे.
हॉस्पिटल खचाखच, जमीन पर लाशें… कोई मरेगा तो पापा को बेड मिलेगा- बोली चीनी लड़की#Covid19 https://t.co/qaAAZaa88M
हे सुद्धा वाचा— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) December 21, 2022
चीनमध्ये ओमिक्रॉनच्या बीए.5.2 आणि बीएफ.7 या व्हेरिएंटचा सर्वाधिक कहर झाला आहे. अनेकांना या व्हेरिएंटची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. रोज हजारो लोक रुग्णालयात दाखल होत आहेत. सर्वांना रुग्णालयात बेड उपलब्ध करून देणं शक्य नाहीये. त्यामुळे रुग्णांना जमिनीवरच झोपवलं जात आहे.
चीनमधील एका तरुणीच्या वडिलांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना कोरोना झाला होता. पण त्यांना अजूनही बेड मिळालं नाही. तिने एक व्हिडीओ शेअर करत आपल्या वेदना ऐकवल्या आहेत.
माझे वडील खूप आजारी होते. त्यांना घेऊन आम्ही तीन रुग्णालयात गेलो. पण बेड मिळाला नाही. त्यांच्यावर उपचारही झाला नाही. त्यानंतर त्यांना सिव्हिल एव्हिएशन रुग्णालयात घेऊन गेलो. पण तिथे ऑक्सिजन संपलं होतं. डॉक्टर म्हणाले तुझे वडील खूप आजारी आहेत. पण आमच्याकडे बेड रिकामे नाहीत.
आज दहा लोक मेल्यानंतर दहा बेड खाली झाले. पण ते दहा बेड इतर रुग्णांना दिले आहेत. आता या ठिकाणी एकही बेड नाही. कोणी तरी मेल्यावरच सर्वात आधी ज्या रुग्णांनी बेडसाठी नंबर लावला आहे, त्यांना बेड मिळेल. त्यानंतर तुझ्या वडिलांना बेड मिळेल, असं डॉक्टर सांगत असल्याचं ही तरुणी व्हिडीओमध्ये म्हणत आहे.
चीनमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावण्यात आला होता. काही निर्बंधही लादण्यात आले होते. मात्र, चिनी नागरिकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे चिनी सरकारने क्वॉरंटाईन आणि आयसोलेशनचे प्रोटोकॉल हटवले. त्यानंतर चीनमध्ये कोरोनाचा वेगाने प्रसार झाल्याची माहिती समोर आली आहे.