3 हजार देऊन हॉटेलची बुकिंग, पण भरावे लागले 7 लाख; असं झालं तरी काय ?

एक चीनी महिलेने ऑनलाइन हॉटेल बुकिंग करताना मोठी चूक केली आणि तिला 7 लाख रुपयांचा फटका बसला. तिने Airbnb वरून जेजू बेटावरील हॉटेल बुक केले, पण चलनात गोंधळ झाल्याने अवाढव्य बिल आले. हॉटेलच्या भाड्याची किंमत कोरियन वॉनमध्ये 3100 रुपये होती, पण चायनीज युआनमध्ये ती 7 लाखांपर्यंत पोहोचली. ही घटना हॉटेल बुकिंग करताना सावधगिरी बाळगण्याचे महत्व दाखवते. चलन आणि किमतींची बारकाईने तपासणी करणे आवश्यक आहे.

3 हजार देऊन हॉटेलची बुकिंग, पण भरावे लागले 7 लाख; असं झालं तरी काय ?
हॉटेल बूकिंग करताना गोंधळ टाळा
Follow us
| Updated on: Nov 22, 2024 | 4:28 PM

जेव्हा आपण फिरायला जातो किंवा कामानिमित्ताने दुसऱ्या शहरात जातो तेव्हा राहण्यासाठी हॉटेल बुक करतो. पण हॉटेल बुक करण्यासाठी अनेक अडचणींवर मात करावी लागते. बरं हॉटेल मिळाल्यानंतर आपण घाईत असतो, इतके घाईत असतो की हॉटेल्स बुक करताना डिटेल्स वाचत नाही. हॉटेलची नियमावली वाचत नाही. त्यामुळे मग नंतर वादावादी होते. जी गोष्ट अत्यंत कमी किंमतीत येते, त्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते. त्यामुळे पश्चात्ताप होतो. संताप येतो. एका चीनी महिलेच्या बाबत असंच काही घडलंय. त्यामुळे या महिलेने ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नका.

या चीनी महिलेने तिच्यासाठी एक चांगलं हॉटेल बुक केलं. या हॉटेलचं एका रात्रीचं भाडं 3100 रुपये होतं. या महिलेने तेवढ्या पैशात हे हॉटेल बुकही केलं. पण तिच्या अकाऊंटमधून 7 लाख रुपयांचं बिल कापण्यात आलं. अकाऊंटमधून सात लाख रुपये गेल्याने या महिलेच्या पायाखालची वाळूच सरकली. एवढी मोठी रक्कम कापल्या गेल्याने या महिलेची बोबडीच वळाली. असं काय घडलं? या महिलेला एवढे पैसे का मोजावे लागले? तिने अशी कोणती चूक केली? तिने केलेली ही चूक तुम्ही करू नये म्हणून आम्ही तुम्हाला विस्ताराने सांगणार आहोत.

काळजात धस्स झालं

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने हे वृत्तं दिलंय. जियांगसू प्रांतात राहणारी शाओ नावाच्या महिलेने तिच्यासाठी हॉटेल बुक केलं होतं. तिने Airbnbच्या माध्यमातून ऑनलाइन हॉटेल बुकिंग केली. तिने हॉटेल बुकिंगसाठीचं पेमेंटही ऑनलाइनच केलं. तिला Jeju Island वर सुट्टी घालवण्यासाठी जायचं होतं. तिथे ती एका मित्रासोबत थांबणार होती. हॉटेल्सच्या डिटेल्स वाचल्यानंतर तिने हॉटेल बुक करण्याचा निर्णय घेतला. पण जेव्हा तिच्या अकाऊंटमधून 3100 रुपये कापण्याऐवजी 7 लाख रुपये कापल्या गेल्याने तिच्या तोंडचं पाणीच पळालं. तिच्या काळजात धस्सच झालं.

काय झालं असं?

महिलेने जे हॉटेल पाहिले होते, त्याचं भाडं चायनीज चलन युआनमध्ये दिलं होतं. बुकिंग करताना तिला ते कोरियन चलन वॉनचं साइन असल्याचं वाटलं. कोरिअन चलनात पैसे भरायचे म्हणून तिने ऑनलाइन पेमेंट केला. त्यामुळे तिचं मोठं नुकसान झालं. कोरियन वॉननुसार या हॉटेलचं बिल 3100 रुपये होतं. पण चायनीज चलनात त्याचं रुपांतर केलं तर ते 7 लाख रुपये होतं. सात लाख रुपये कापल्या गेल्यानंतर ही महिला घाबरली. तिने तात्काळ हॉटेलशी संपर्क साधला आणि आपला फूल पेमेंट मिळावा म्हणून गयावया केली. पण सुरुवातीला हॉटेलने तिला पेमेंट रिफंड करण्यास स्पष्ट नकार दिला. पण नंतर गुडविल जेस्चर म्हणून तिला तिचे पैसे परत केले. त्यामुळे तुम्हीही असा निष्काळजीपणा करू नका. तुम्ही ज्या हॉटेलात जात आहात, त्याची मुद्रा कशात आहे ते पाहा. म्हणजे किंमत रुपयात आहे, डॉलरमध्ये आहे की युआनमध्ये आहे ते चेक करा आणि मगच हॉटेल बुक करा.

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.