Starliner Landed : शंका, भिती निर्माण करणाऱ्या बोईंगच्या स्टारलायनरच सुरक्षित लँडिंग कसं झालं? पाहा VIDEO
Starliner Landed : बोईंगच स्टारलायनर सुरक्षित पृथ्वीवर परतणार का? या बद्दल अनेकांच्या मनात संशय, शंका होती. पण स्टारलायनरने एक अवघड टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. स्टारलायनरच्या लँडिंगचा हा जो संपूर्ण प्रवास आहे, तो या व्हिडिओद्वारे पाहा.
विमान निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी बोईंगने आता अवकाश संशोधन, व्यवसाय क्षेत्रात प्रवेश केला आहे. पण अवकाश व्यवसायात या कंपनीला सुरुवातीपासून अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतोय. सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर घेऊन गेलेल्या स्टारलायनर स्पेसक्राफ्टमुळे बोईंगची प्रतिष्ठा पणाला लागली होती. स्टारलायनर 5 जूनला सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर घेऊन गेलं. 13 जूनला दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर परतणार होते. पण थ्रस्टरमध्ये बिघाड आणि हीलियम लीकेजमुळे ठरलेल्या वेळेत हे यान पृथ्वीवर परतू शकलं नाही. 8 दिवसाच्या टेस्ट मिशनवर गेलेले विलियम्स आणि विल्मोर आता दीर्घकाळानंतर पृथ्वीवर परतणार आहेत. दोघेही अंतराळवीर आता नासाच्या क्रू9 मिशनचा भाग आहेत.
नासाने दिलेल्या माहितीनुसार, स्टारलायनर भारतीय वेळेनुसार सकाळी 3.30 वाजता स्पेस स्टेशनपासून वेगळं झालं. 9 वाजून 32 मिनिटांनी अमेरिकेच्या न्यू मेक्सिको व्हाइट सँड स्पेस हॉर्बरमध्ये लँड झालं. हा वाळवंटी प्रदेश आहे. स्टारलाइनरच्या लँडिंग वीडियोमध्ये स्पष्टपणे दिसतय की, लँड होण्याआधी स्पेसक्राफ्टचे 3 पॅराशूट ओपन झाले. त्याद्वारे पृथ्वीवर सुरक्षित लँडिंग झालं.
The uncrewed #Starliner spacecraft is backing away from the @Space_Station after undocking from the Harmony module’s forward port at 6:04pm ET (2204 UTC). pic.twitter.com/uAE38ApiJw
— NASA (@NASA) September 6, 2024
LIVE: The uncrewed @BoeingSpace #Starliner spacecraft continues its return to Earth. Landing is targeted for 12:00am ET on Sept. 7. https://t.co/jjqCiNuHhG
— NASA’s Johnson Space Center (@NASA_Johnson) September 7, 2024
समजून घ्या लँडिंगची प्रोसेस
स्टारलायनरने 8.58 मिनिटांनी डीऑर्बिट बर्न पूर्ण केलं. या बर्ननंतर जमिनीवर लँड होण्यासाठी 44 मिनिट लागली. लँडिग करताना वातावरणात हीटशिल्ड एक्टिव होतं. त्यानंतर ड्रोग पॅराशूट डिप्लॉय करण्यात आलं. तीन पॅराशूट तैनात झाल्यानंतर रोटेशन हँडल रिलीज करण्यात आलं. जेणेकरुन स्पेसक्राफ्टने गोल फिरणं बंद करावं. सरळ, एका स्थितीत लँड केलं पाहिजे. खालच्या बाजूला अससेलं हिट शील्ड काढण्यात आलं. त्यानंतर एयरबॅग ओपन झाले. एयरबॅगने कुशंड लँडिंग होते. त्यानंतर रिकवरी टीम येऊन स्पेसक्राफ्टला रिकवर करते.