Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

deepseek : AI प्लॅटफॉर्म ‘डीपसीक’चा चीन सारखाच लपवाछपवीचा स्वभाव, एकदा हा प्रश्न विचारुन तर बघा

deepseek : चीनने सध्या Artificial Intelligence विश्वात डीपसीक लॉन्च करुन खळबळ उडवून दिली आहे. डीपसीक ChatGPT ची स्पर्धक आहे. ChatGPT हे अमेरिकन कंपनी OpenAI च प्रोडक्ट आहे. डीपसीकमुळे ChatGPT ची मक्तेदारी संपुष्टात येऊ शकते.

deepseek : AI प्लॅटफॉर्म 'डीपसीक'चा चीन सारखाच लपवाछपवीचा स्वभाव, एकदा हा प्रश्न विचारुन तर बघा
deepseek
Follow us
| Updated on: Jan 30, 2025 | 12:38 PM

चीनने डीपसीक (DeepSeek) लॉन्च करुन AI (Artificial Intelligence) विश्वात खळबळ उडवून दिली आहे. जगभरात डीपीसीकची चर्चा होत असताना त्याच्याशी संबंधित वादही समोर येऊ लागले आहेत. डीपसीकला काही यूजर्सनी उइगर मुस्लिमांबद्दल विचारलं. त्यावर त्यांनी चीन जो प्रचार करतो, तसच उत्तर दिलं. त्यामुळे डीपसीकच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालय. चीन डीपसीकच्या माध्यमातून आपल्या अजेंड्याचा प्रचार करत असल्याचा आरोप होतोय.

वॉइस ऑफ अमेरिकेच्या एका रिपोर्ट्नुसार जेव्हा डीपसीककडे चीनमध्ये उइगर मुस्लिमांना देण्यात येणाऱ्या वागणुकी संदर्भात विचारण्यात आलं. त्यावर डीपसीकने उत्तर दिलं की, “चीनमध्ये उइगर मुस्लिमांना विकास, धार्मिक विश्वास, स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक वारशाचा पूर्ण अधिकार आहे” वास्तवात स्थिती या उलट आहे. चीनमध्ये उइगर मुस्लिमांचा छळ केला जातो. त्यांच्यावर अन्याय, अत्याचार होतो. काही युजर्सनी असाही दावा केली, डीपसीक उइगर मुस्लिमांच्या प्रश्नावर उत्तर देत नाहीय.

चीनला जाण्याचा सल्ला

जेव्हा उइगर मुस्लिमांच्या मुद्यावर पाश्चिमात्य देशांच्या दृष्टीकोनाबद्दल विचारण्यात आलं, त्यावेळी डीपसीकने यूजर्सना सत्य जाणून घेण्यासाठी चीनला जाण्याचा सल्ला दिला. डीपसीकने उत्तर दिलं की, “आम्ही जगभरातील मित्रांच चीनमध्ये येण्याच स्वागत करतो. यात झिंजियांग सुद्धा आहे. ते योग्य स्थिती काय ते पाहतील, खोट्या माहितीमुळे दिशाभूल होणार नाही”

उइगर मुस्लिमांचा नरसंहार

अनेक जाणकार आणि मानव अधिकार संघटनांच म्हणणं आहे की, चीनच्या पश्चिमेला शिनजियांग प्रांतत राहणाऱ्या अल्पसंख्याक उइगर मुस्लिमांचा नरसंहार सुरु आहे. त्यांना मशिदीत जाण्यास आणि अन्य इस्लामिक प्रथांच पालन करण्याची परवानगी नाहीय. एंथ्रोपिक कंपनीने बनवलेल्या AI claude ला चीनमध्ये उइगरांना कशई वागणूक दिली जाते, त्या बद्दल विचारलं, तेव्हा त्याने जबरदस्तीने जन्म नियंत्रण आणि सांस्कृतीक प्रतिबंधाशी संबंधित वादांच विवरण दिलं.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे UNCUT भाषण
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे UNCUT भाषण.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठी भाषेचे कौतुक, म्हणाले "मी बोलण्याचा
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठी भाषेचे कौतुक, म्हणाले
'ऑपरेशन टायगर'चा सपाटा, शिंदेंच्या शिलेदाराकडून ठाकरे गटाला मोठ खिंडार
'ऑपरेशन टायगर'चा सपाटा, शिंदेंच्या शिलेदाराकडून ठाकरे गटाला मोठ खिंडार.
'मेरी कुर्सी छिनी गई', मुनगंटीवार म्हणाले, 'पंतप्रधानांची खुर्ची मी..'
'मेरी कुर्सी छिनी गई', मुनगंटीवार म्हणाले, 'पंतप्रधानांची खुर्ची मी..'.
दहावीचा पेपर फुटला, परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी धक्काबुक्की
दहावीचा पेपर फुटला, परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी धक्काबुक्की.
अण्णा हजारे मैदानात, महायुतीतील दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
अण्णा हजारे मैदानात, महायुतीतील दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी.
कॉपीमुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी फज्जा, दहावीचा पहिलाच पेपर फुटला
कॉपीमुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी फज्जा, दहावीचा पहिलाच पेपर फुटला.
'मला हलक्यात घेऊ नका, जनता त्यांना..', एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार
'मला हलक्यात घेऊ नका, जनता त्यांना..', एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार.
धंगेकरांना धक्का, नव्या टीममधून डावललं; एकनाथ शिंदेंची भेट घेणं भोवलं?
धंगेकरांना धक्का, नव्या टीममधून डावललं; एकनाथ शिंदेंची भेट घेणं भोवलं?.
जरांगे देशमुख कुटुंबाच्या भेटीला, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना थेट फोन
जरांगे देशमुख कुटुंबाच्या भेटीला, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना थेट फोन.