यूएईच्या वाळवंटात अचानक कसा पडला एका वर्षाचा पाऊस, काय आहे कारण

दुबई सारख्या स्मार्टसिटीत झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. इतका मुसळधार पाऊस होईस असा कोणी विचार देखील केला नव्हता. त्यामुळे रस्त्यांना नदीचे स्वरुप आले होते. पण यूएईच्या वाळवंटात असा अचानक पाऊस कशामुळे झाला जाणून घ्या कारण.

यूएईच्या वाळवंटात अचानक कसा पडला एका वर्षाचा पाऊस, काय आहे कारण
rain in uae
Follow us
| Updated on: Apr 19, 2024 | 6:36 PM

दुबई : 16 एप्रिल रोजी यूएईच्या अनेक भागांमध्ये वाळवंट असून ही जोरदार पाऊस झाला. एका दिवसात इतका पाऊस पडला की त्याने ७५ वर्षांचा रेकॉर्ड मोडला. एवढ्या पावसानंतर भयंकर परिस्थिती निर्माण झाली. प्रशासनाला परिस्थितीला तोंड देण्यासाठी कोणतीही उपाययोजना नव्हती. रस्त्यावर पाणीच पाणी होते. महागड्या गाड्या पाण्याखाली होत्या. जगातील सर्वात स्मार्ट शहर दुबईमध्येही ही परिस्थिती पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर देखील पाणी होते. त्यामुळे उडाणे बंद करावे लागले. शॉपिंग मॉल्स आणि मेट्रो स्टेशनवर पाणी साचले होते. या पावसाला क्लाऊड सीडिंगमधील त्रुटी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

अरब देशांमध्ये अत्यल्प पाऊस

गल्फ स्टेट नॅशनल सेंटर ऑफ मेटिऑरॉलॉजीच्या मते, 15 आणि 16 एप्रिल रोजी ऍलन विमानतळावरून क्लाउड सीडिंगसाठी विमानांनी उड्डाण केले होते. क्लाउड सीडिंग विमानांनी दोन दिवसांत एकूण 7 वेळा उड्डाण केले. कदाचित क्लाउड सीडिंगमधील काही अनियमिततेमुळे इतका पाऊस पडला असेल. यूएईमध्ये अतिवृष्टीसाठी क्लाउड सीडिंगमधील व्यत्यय कारणीभूत असेल, तर आसपासच्या देशांमध्येही जास्त पाऊस का? कारण आखाती अरब देशांमध्ये अत्यल्प पाऊस पडतो. अशा परिस्थितीत हवामान बदलामुळे यूएईमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याचेही मानले जात आहे.

ढगफुटीचे कारण काय

मंगळवारी इतका पाऊस झाला की, अनेक भागात पाणी साचले होते. मेघगर्जनेसह पाऊस पडत होता. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, वातावरणातील हवा स्वतःसोबत उष्णता आणते. दुबई आणि आसपास समुद्र असल्याने धुळीची वादळे येतात. धूळ देखील मेघ सीडरचे काम करते. विज्ञान त्याला कंडेन्सेशन न्यूक्ली म्हणतात. तज्ज्ञांच्या मते, धुळीच्या वादळामुळे क्लाउड सीडिंगमध्ये अडथळा निर्माण झाला होता.

क्लाउड सीडिंग का आवश्यक आहे?

दुबईत पाऊस कमी पडतो. त्यामुळे येथे पाण्याची टंचाई असते. पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी दुबईत विविध प्रयोग केले जातात. काही वर्षांपूर्वी अंटार्क्टिकामधून हिमनदीचा मोठा तुकडा समुद्रमार्गे दुबईत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावर मोठा खर्च झाला होता. दुबईमध्ये सर्व प्रयत्न करूनही पाणीटंचाई कायम आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी दुबई सरकारने क्लाउड सीडिंगद्वारे कृत्रिम पावसाचे नियोजन केले होते. यात चूक झाली. उरलेले काम वातावरणातील धुळीच्या कणांनी पूर्ण केले आणि पाऊस इतका पडला की परिस्थिती बिकट झाली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.