Sunita Williams : आंघोळ नाही, लघवी प्राशन, 90 मिनिटांत सूर्यास्त आणि… स्पेश स्टेशनमध्ये कसं जगतात सुनीता विल्यम्स?

अंतराळातलं आयुष्य वाटतं तितकं सोपं नाही. सध्या अंतराळात असलेल्या सुनीता विल्यम्स यांना पावलोपावली याचा अनुभव येतोय.सध्या त्यांना इतरांसोबत 2 बाथरूम्स शेअर करावी लागत आहेत, एवढंच नव्हे रिसायकल करून लघवी प्राशनही करावे लागते. अंतराळात भोजनाची व्यवस्था करणं हे तर वेगळंच आव्हान आहे.

Sunita Williams : आंघोळ नाही, लघवी प्राशन, 90 मिनिटांत सूर्यास्त आणि... स्पेश स्टेशनमध्ये कसं जगतात सुनीता विल्यम्स?
Follow us
| Updated on: Aug 22, 2024 | 4:22 PM

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर हे पृथ्वीपासून 320 किलोमीटर अंतरावर असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) अडकले आहेत. जूनच्या सुरुवातीला अवकाशात पाठवलेले हे दोघे अमेरिकन अंतराळवीर तेथे केवळ आठ दिवस घालवून परत येणार होते, मात्र बोईंग स्टारलाइनर या अवकाशयानात हेलियम गळती झाल्यामुळे त्यांना तेथे आणखी बराच काळ रहावे लागणार आहे. त्या दोघांना फेब्रुवारी 2025 मध्ये पृथ्वीवर परत आणले जाऊ शकते, असे नासाने नमूद केले. पण सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर यांना पृथ्वीपासून दूर असलेल्या स्पेस स्टेशनवर कोणत्या परिस्थितीत राहावे लागते हे तुम्हाला माहीत आहे का? अंतराळ स्थानकावर राहणाऱ्यांचे जीवन कसे असते? चला जाणून घेऊया.

रिसायकल करून लघवी प्राशन

ब्रिटीश अंतराळवीर मेगन ख्रिश्चन ही यूके स्पेस एजन्सीच्या स्पेस-गोइंग रिझर्व्ह टीमचा एक भाग आहे. त्यांनी द सनला सांगितले की सुनीता आणि बॅरी त्यांच्या अंतराळ स्थानकावर दीर्घ मुक्कामादरम्यान आंघोळ करणार नाहीत. 36 वर्षीय मेगनने सांगितले की, अंतराळवीरांना त्यांची लघवी रिसायकल करून ते प्यावी लागते. यासोबतच रेडिएशनचाही सामना करावा लागतो. ‘सुनीता आणि विल्मोर अशा दीर्घकालीन मिशनसाठी तयार होते. ही एक कठीण जागा आहे,असे त्यांनी नमूद केले.

स्पेस स्टेशनमध्ये राहणं सोपं नाही

सध्या स्पेस स्टेशनमध्ये 9 लोकं आहेत, जे दोन बाथरूम्स आणि सहा बेडरूम्स ते सामायिकपणे वापरतात. या स्पेस स्टेशनला पृथ्वीवरून अन्न आणि पाण्याचा पुरवठा केला जातो, पण त्या्याा वापर अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. शरीरातील द्रव, विशेषतः मूत्र, पाणी हे वॉटर रिकव्हरी सिस्टीमद्वार आणि रिसायकल करून परत प्राप्त केले जातात. घाम आणि श्वासोच्छ्वासातील ओलाव्या सोबतही हेच केले जाते. मेगनने सांगितले की तेथे शॉवर नसतो. तराळवीर एक प्रकारचा ओला टॉवेल वापरतात. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या बाहेर असल्याने किरणोत्सर्गाचा धोकाही असतो. कमी गुरुत्वाकर्षणामुळे, स्नायूंना जास्त काम करावे लागत नाही, ज्यामुळे शरीराला हानी पोहोचते. अंतराळात दर 90 मिनिटांनी सूर्यास्त आणि सूर्योदयाची सवय लावून घ्यावी लागते.

विशेष टॉयलेटचा वापर

‘तुम्हाला शक्य तितके पुनर्वापर आणि रिसायकल करावे लागेल,’ असे मेगन स्प यांनी नमूद केले. कालची कॉफी आजची कॉफी आहे. ते किळसवाणे वाटते, पण जेव्हा ते तुमच्यापर्यंत पोहोचते तेव्हा ते शुद्ध पाणी होते.

टॉयलेटसाठी विशेष प्रकारचे सक्शन टॉयलेट आहे जे शरीरातील द्रव गोळा करते. पृथ्वीप्रमाणे अवकाशात शौचालये वापरता येत नाहीत. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामुळे हे पदार्थ अंतराळ स्थानकात तरंगत राहतात. अंतराळवीर एका नळीत लघवी करतात ज्यात कंटेनर समोर जोडलेला असतो. पॉटीसाठी प्रत्येक कंटेनरवर एक लहान शीट आहे. त्याला रबरयुक्त पिशवी जोडलेली असते.

जून महिन्यात अंतराळात गेल्या होत्या सुनीता विल्यम्स

सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर हे 5 जून रोजी बोइंग स्टारलाइनरमधून अंतराळात रवाना झाले. बोईंग स्टारलाइनरची ही उड्डाण चाचणी होती, ज्यामध्ये मानवांना प्रथमच पाठवण्यात आले होते. पण अवकाशात पोहोचल्यानंतर स्टारलाइनरमध्ये हेलियम गळती आणि थ्रस्टर खराबी झाल्याचे आढळून आले. ते आता फेब्रुवारी 2025 मध्ये परत येण्याची शक्यता आहे.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.