Iran Attacks Israel : इस्रायल इराणवर कशा प्रकारचा हल्ला करेल? इस्रायलकडे कुठली सर्वात मोठी संधी ?
Iran Attacks Israel : इराणने सर्वात मोठी चूक केलीय. कारण त्यांनी इस्रायलला आयती संधी दिलीय. इस्रायल ही संधी सोडणार नाही. कारण रणनितीक उद्दिष्टय पुर्तीच्या बाबतीत इस्रायलने आतापर्यंत कधीही कुचराई केलेली नाही. इस्रालय इराणवर कशा प्रकारचा हल्ला करेल, त्याचं उत्तर तुम्हाला यामध्ये मिळेल.
इराणने इस्रायलवर हल्ला तर केला. पण आता इस्रायल या हल्ल्याला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार? अनेकांच्या मनात हा प्रश्न आहे. इराणने मोठी चूक केलीय हे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आधीच म्हटलय. आता इस्रायलकडे हल्ल्याचा बदला घेण्याचे वेगवेगळे ऑप्शन आहेत. पण इस्रायल तीन वेगवेगळ्या टप्यांमध्ये कारवाई करु शकतो. कारण इस्रायल आधीच दोन आघाड्यांवर युद्ध लढत आहे. पहिल्या टप्प्यात इस्रायलकडून इराणचे महत्त्वाचे सैन्य तळ, पॉवर प्लांट, गॅस प्लांटवर आणि एअर डिफेन्स सिस्टिमवर हल्ला केला जाऊ शकतो. दुसऱ्या टप्प्यात इराणी सत्ता आणि सुरक्षा संघटनांच्या प्रमुख लोकांना लक्ष्य केलं जाऊ शकतं. तिसऱ्या टप्प्यात इराणची न्यूक्लियर साईट नष्ट केली जाऊ शकते.
खरंतर आता इराणने इस्रायलला कारवाई करण्यासाठी कारण दिलं आहे. इराण अण्वस्त्र संपन्न राष्ट्र होण्याआधी त्यांना रोखण्याची इस्रायलकडे आयती संधी चालून आली आहे. कारण इस्रायलने वेळोवेळी इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम रोखण्याचा प्रयत्न केला आहे. कारण इराणकडे उद्या अणूबॉम्ब आल्यास इस्रायलसह अमेरिकेसाठी तो सर्वात मोठा धोका आहे. इराणला या संकटाला कायमस्वरुपी संपवण्याची संधी आहे. इस्रायल त्यांच्या रणनितीक उद्दिष्टय पूर्ततेसाठी कधी मागे कचरत नाही हा इतिहास आहे. त्यामुळे इस्रायलकडून इराणला कायमची अद्दल घडेल असा वार केला जाण्याची शक्यता आहे.
एक मोठी चूक केलीय
इस्रायलचे माजी पंतप्रधान आणि कट्टरपंथी नेता नेफ्टाली बेनेट यांनी X वर पोस्ट केली आहे. इस्रायलकडे मिडिल ईस्टचा चेहरा बदलण्याची 50 वर्षातील मोठी संधी आहे असं त्यांनी X वर म्हटलं आहे.
Israel has now its greatest opportunity in 50 years, to change the face of the Middle East.
The leadership of Iran, which used to be good at chess, made a terrible mistake this evening.
We must act *now* to destroy Iran’s nuclear program, its central energy facilities, and to…
— Naftali Bennett נפתלי בנט (@naftalibennett) October 1, 2024
इस्रायलने आता इराणच्या न्यूक्लियर फॅसिलिटीवर हल्ला केला पाहिजे. इराणला ट्रॅप करण्यासाठी इस्रायल जाणीवपूर्वक मिडिल ईस्टमध्ये संघर्ष वाढवतोय हा दावा आता पटू लागलाय. चेसच्या या खेळात इराणच नेतृत्व जे माहीर वाटत होतं, त्याने एक मोठी चूक केलीय असं नेफ्टाली बेनेट यांनी म्हटलं आहे.