10 हजार दहशतवादी…बांगलादेशातील हिंदूवर हल्ले करणारी जमात-उल-मुजाहिदीन संघटना, जाणून घ्या A to Z माहिती

Bangladesh Jamaat-e-Islami: जेएमबीजवळ 10 हजार दहशतवादी आहेत. तसेच एका लाखापेक्षा जास्त कट्टरपंथी या संघटनेसोबत आहेत. या संघटनेने 10 लाखांपेक्षा जास्त मुलांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण दिले आहे. या संघटनेत विद्यापीठ आणि मदरसामधील शिक्षकांपासून सामान्य नागरिकांपर्यंत अनेक जण सहभागी आहेत.

10 हजार दहशतवादी...बांगलादेशातील हिंदूवर हल्ले करणारी जमात-उल-मुजाहिदीन संघटना, जाणून घ्या A to Z माहिती
जमात-उल-मुजाहिदीन (फाईल फोटो)
Follow us
| Updated on: Dec 05, 2024 | 1:42 PM

Attacks on Hindus In Bangladesh : बांगलादेशात शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन चार महिने झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात शेख हसीना यांना देश सोडावा लागला होता. त्यानंतर बांगलादेशातील कट्टरपथींनी उपद्रव माजवला आहे. त्या देशातील अल्पसंख्याकांना लक्ष केले जात आहे. हिंदूंवर हल्ले वाढत आहेत. हिंदू सरकारी कर्मचाऱ्यांची जबरदस्तीने राजीनामे घेतले गेले आहेत. मंदिरांवर हल्ले होत आहे. हंगामी पंतप्रधान मोहम्मद यूनुस हे सर्व मुकाट्याने पाहत आहेत. कट्टरपथी शक्तीपुढे ते पूर्ण हतबल झाले आहेत किंवा त्यांच्या त्यांना पाठिंबा आहे. इस्कॉन मंदिराचे चिन्मय दास प्रभु यांच्यासह अनेक हिंदू नेत्यांना तुरुंगात डांबले गेले आहे. चिन्मय दास प्रभु यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावण्यात आला आहे. इस्कॉन मंदिराशी संबंधित सर्व बँक खाती सील करण्यात आली आहे. दुसरीकडे बांगलादेशातील हिंदूंवर हल्ले वाढले आहे. हे हल्ले जमात-उल-मुजाहिदीन (JMB) ही बांगलादेशातील दहशतवादी संघटना घडवून आणत असल्याचा अहवाल इंटेलिजेन्सकडून देण्यात आला आहे. या सर्व प्रकरणात भारत सरकारने गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

बांगलादेशात हिंदूंची संख्या घटली

1971 मध्ये बांगलादेश भारताच्या मदतीमुळे स्वतंत्र राष्ट्र झाला. त्यावेळी बांगलादेशात हिंदूंची लोकसंख्या 22 टक्के होती. परंतु मागील पाच दशकांपासून हिंदूंवर अत्याचार वाढत आहेत. त्यामुळे त्यांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. बांगलादेशात आता केवळ 8 टक्के हिंदू आहेत. शेख हसीना सरकार गेल्यानंतर हे सर्व असुरक्षित बनले आहे. त्यांच्यावर हल्ले वाढत आहे. इंटेलिजेन्सकडून मिळालेल्या रिपोर्टनुसार जमात-उल-मुजाहिदीन या संघटनेचे अतिरेकी हिंदूंना शोधून त्यांच्यावर हल्ले करत आहेत. अगदी बांगलादेशातील कारागृहात असलेले हिंदूसुद्धा सुरुक्षित राहिले नाही. कारागृहातसुद्धा त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. बांगलादेशात शेख हसीना सरकार गेल्यानंतर कारागृहातून 700 कैदी पळून गेले होते. त्यातील अनेक जण जेएमबी संघटनेचे अतिरेकी आहेत. आता हे अतिरेकी रस्त्यांवर हिंदूंवर हल्ले करत आहेत. तसेच कारागृहात असलेले हजारो दहशतवादी कारागृहात येणाऱ्या हिंदूंवर हल्ले करत आहेत.

हे सुद्धा वाचा

काय आहे जेएमबी

1998 मध्ये पालमपूरमधील अब्दुल रहमान याने या दशतवादी संघटनेची सुरुवात केली. ही संघटना 2001मध्ये चर्चेत आली. त्यावेळी दिनाजपूर जिल्ह्यात बॉम्ब आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. या संघटनेच्या आठ दहशतवाद्यांनाही अटक करण्यात आली. फेब्रुवारी 2003 मध्ये या संघटनेने दिनाजपूर जिल्ह्यातील छोटो गुरगोला भागात सात बॉम्बस्फोट केल्याचे उघड झाले होते. बांगलादेश सरकारने 2005 मध्ये या संघटनेवर बंदी आणली. त्यामुळे त्यावर्षी ऑगस्ट महिन्यात या संघटनेने 300 ठिकाणांवर 500 बॉम्बस्फोट घडवून आणले. 2016 मध्ये या संघटनेने अनेक ठिकाणी सार्वजनिक हत्याकांड घडवून आणले. भारताने या संघटनेवर 2019 मध्ये बंदी आणली. भारतासोबत मलेशिया, इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलियासह इतर काही देशांनी या संघटनेस दहशतवादी संघटनेच्या यादीत टाकले आहे.

इस्लामी राज्याच्या निर्मितीचे उद्दिष्ट

बांगलादेशमध्ये शरियाच्या आधारावर इस्लामी राज्य स्थापन करण्याचे उद्दिष्ट जेएमबी संघटनेने ठेवले होते. लोकशाहीला या संघटनेचा विरोध आहे. शरिया कायदा संपूर्ण देशात लागू करण्याचे उद्दिष्ट संघटनेने ठेवले आहे. ही संघटना इस्लाम आणि शरिया कायद्याला प्रोत्साहन देते. महिलांनी घराच्या बाहेर निघू नये, चित्रपट आणि सांस्कृतिक कार्यक्रम करु नये, अशी मागणी या संघटनेची आहे. ऑगस्ट 2005 मध्ये या संघटनेने केलेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली होती. त्यावेळी जेएमबी संघटनेने म्हटले होते, ‘आम्ही अल्लाहचे शिपाई आहोत. आम्ही मोर्चा सांभाळला आहे. अल्लाहचा कायदा अंमलात आणण्यासाठी आम्ही शस्त्रे उचलली आहे. आता बांगलादेशात इस्लामी कायदा लागू करण्याची वेळ आली आहे. मानवाने बनवलेल्या कायद्याला काहीच भविष्य नाही.’

कसे आहे जमात-उल-मुजाहिदीनचे नेटवर्क

जमात-उल-मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे नेटवर्क संपूर्ण बांगलादेशात पसरले आहे. साउथ एशिया टेररिज्म पोर्टलनुसार, जेएमबीजवळ 10 हजार दहशतवादी आहेत. तसेच एका लाखापेक्षा जास्त कट्टरपंथी या संघटनेसोबत आहेत. या संघटनेने 10 लाखांपेक्षा जास्त मुलांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण दिले आहे. या संघटनेत विद्यापीठ आणि मदरसामधील शिक्षकांपासून सामान्य नागरिकांपर्यंत अनेक जण सहभागी आहेत. या संघटनेने वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या विंग तयार केल्या आहेत. दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यासाठी एक स्वतंत्र विभाग आहे. या संघटनेतील अतिरेकी राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांमध्येही आहेत.

संघटनेस पैसा कुठून येतो?

जमात-उल-मुजाहिदीन या संघटनेस सर्व कारभार चालवण्यासाठी पैसा कुठून येतो? हा प्रश्न आहे. त्यावर साउथ एशिया टेररिज्म पोर्टलच्या माहितीनुसार, जेएमबीला कुवैत, संयुक्त अरब अमीरात, बहरीन, पाकिस्तान, सऊदी अरब आणि लिबियामधून पैसा पुरवण्यात येतो. अनेक आंतरराष्ट्रीय एनजीओ या संघटनेस मदत करतात. 2015 मध्ये पाकिस्तानचे अधिकारी या संघटनेला फंडीग करत असल्याचे उघड झाले होते. व्हिसा अधिकारी मझहर खान याला एप्रिल 2015 मध्ये जेएमबी संघटनेसोबत बैठक घेताना पकडण्यात आले होते. मझहर खान याने पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर नकली भारतीय नोटा पाठवल्याचे मान्य केले होते. पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयात असणाऱ्या फरीना अरशद याला बांगलादेश सरकारने बरखास्त केले होते. त्याने जेएमबी नेत्यास 30 हजार टका (टका बांगलादेशचे चलन) दिल्याचे स्पष्ट झाले होते.

जेएमबीने बांगलादेशातील दक्षिण पश्चिम भागात काही झिंगा फार्म आणि कोल्ड स्टोरेजमध्ये गुंतवणूक केल्याचे एका रिपोर्टमधून स्पष्ट झाले आहे. या संघटनेवर मनी लॉन्ड्रिंगचा आरोपही आहे. तसेच संघटनेचे अतिरेकी रस्त्यांवर टोल वसूल करुन पैसे जमवतात. पाकिस्तान, म्यानमार, थायलँड आणि चीन या देशांमधून या संघटनेस दहशतवादीसाठी शस्त्रे मिळतात. ही शस्त्रे जमीन आणि समुद्राच्या मार्गाने पोहचवली जातात.

भारतात वर्चस्व निर्माण करण्याचे प्रयत्न

जमात-उल-मुजाहिदीन ही संघटना भारतात पाय रोवण्याचे प्रयत्न करत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. पूर्वोत्तर राज्यात मुस्लीम समाजात आपले स्थान निर्माण करण्याच्या हालचाली संघटनेच्या सुरु असतात. आसम आणि त्रिपुरामध्ये त्यांच्या हालचाली वाढवण्याचे प्रयत्न अनेक वेळा झाले. परंतु भारतीय इंटेलिजन्सकडून त्यांचे हे प्रयत्न हानून पाडण्यात आले. आसाम पोलिसांनी मागील वर्षी दहशतवादी मॉड्यूल असारुल्लाह बांगला टीम (एबीटी) आणि भारतीय उपमहाद्वीपमध्ये अल-कायदा (एक्यूआयएस) संबंध ठेवल्या प्रकरणी अटक केली होती.

सेंटर फॉर रिचर्स इन इंडो बांगलादेश रिलेशन्स कोलकाता द्वारा प्रकाशित पुस्तक हिंदू डिक्रेसेंट बांगलादेश अँड वेस्ट बंगालचे लेखक आणि बांगलादेशमधील परिस्थितीचा अभ्यास करणारे विशेषज्ञ बिमल प्रमाणिक म्हणतात, बांगलादेशमधील आंदोलन इस्लामिक कट्टरपंथीय लोकांच्या हातात गेले आहे. त्यांच्याकडून जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. बांगलादेशात इस्लामिक कंट्टरपंथी शक्ती मजबूत झाल्यामुळे भारताच्या सीमावर्ती भागात इस्लामिक कट्टरपंथींची शक्ती वाढणार आहे. भारत सरकार पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.