Pager Blast : पेजरमध्ये बॉम्बस्फोट, मोसादची टेक्निक की, कंपनीशी डील, इस्रायलच्या कारनाम्याने जग हैराण

Hezbollah Pager Blast : मागच्या काही दिवसात इस्रायल आणि हिज्बुल्लाहमध्ये अनेकदा संघर्ष झाला. हिज्बुल्लाने इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. प्रत्युत्तरात इस्रायलने हिज्बुल्लाहच्या ठिकाणांवर एअरस्ट्राइक केला. आता लेबनानमध्ये अशी एक घटना घडलीय, ज्यामुळे जग हैराण झालय. यामागे इस्रायलच असल्याचा सगळ्यांचा समज आहे.

Pager Blast : पेजरमध्ये बॉम्बस्फोट, मोसादची टेक्निक की, कंपनीशी डील, इस्रायलच्या कारनाम्याने जग हैराण
Hezbollah Pager Blast
Follow us
| Updated on: Sep 18, 2024 | 9:30 AM

इस्रायलने हिज्बुल्लाहला मोठा दणका दिला आहे. हिज्बुल्लाहच्या सदस्यांनी ज्याची कल्पना केली नव्हती, ते घडलं. लेबनानमधून कारवाया करणाऱ्या हिज्बुल्लाह सदस्यांच्या पेजर्समध्ये एकापाठोपाठ एक सीरियल ब्लास्ट झाले. यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये हिज्बुल्लाह खासदाराच्या मुलाचा सुद्धा समावेश आहे. एका सदस्याच्या 10 वर्षाच्या मुलीचा सुद्धा या घटनेत मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पेजर बॉम्बस्फोटांच्या मालिकेनंतर सर्वत्र एकच गोंधळ उडाला. आता प्रश्न निर्माण होतो की, ही घटना अखेर कशी घडली?. हिज्बुल्लाहच्या मेंबर्सना कसं टार्गेट केलं? यामागे मोसादची कुठली टेक्निक आहे की, कंपनीशी डील? असा प्रश्न निर्माण झालाय.

या सीरियल ब्लास्ट संदर्भात अनेक वेगवेगळे दावे केले जात आहेत. हिज्बुल्लाहने या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार ठरवलं आहे. डिवाइस हँकिंगसह इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसाद आणि पेजर बनवणाऱ्या कंपनीत डील झाल्याचा आरोप होतोय.

कुठल्या कंपनीने बनवलेले पेजर्स?

ज्या पेजर्समध्ये हे बॉम्बस्फोट झाले. ते काही दिवसांपूर्वी विकत घेण्यात आले होते. हिज्बुल्लाहचे सदस्य परस्परांशी समन्वय साधण्यासाठी हा पेजर्सचा वापर करतात. इस्रायलला फोन टॅपिंग करता येऊ नये, यासाठी ही टेक्निक वापरली जाते. रिपोर्टनुसार, हे पेजर्स तैवानची गोल्ड अपोलो कंपनी लिमिटेडने बनवले होते. ज्या पेजर्समध्ये हे ब्लास्ट झाले, त्यांचे लेबल तैवानी कंपनीचे आहेत.

इस्रायलने काय म्हटलय?

या स्फोटांसंदर्भात हिज्बुल्लाहने स्टेटमेंट दिलय. या स्फोटांसाठी थेट इस्रायलला जबाबदार ठरवलय. कारस्थान रचल्याचा आरोप सुद्धा इस्रायलयवर करण्यात आलाय. हिज्बुल्लाहला या आरोपांसाठी कुठलाही पुरावा देता आलेला नाहीय. इस्रायलने सुद्धा हिज्बुल्लाहचे आरोप खोडून काढलेले नाहीत.

पेजर्स तात्काळ फेकून देण्याचा आदेश

या हल्ल्यानंतर हिज्बुल्लाहने आपल्या सदस्यांना पेजर्सचा वापर बंद करण्याचा आदेश दिलाय. हिज्बुल्लाहने तात्काळ हे पेजर्स फेकून द्यायला सांगितलेत. या स्फोटांनंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेत. पेजरमध्ये ब्लास्ट घडवता येऊ शकतो का?. इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादने डिवाइस बनवणाऱ्या कंपनीशी कुठली डील करुन ही घटना घडवून आणली का?

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.