Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यास भारताचा काय फायदा होईल समजून घ्या

Donald Trump : अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. सध्या रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत. अमेरिकेच्या स्विंग स्टेट्समध्ये ट्रम्प आघाडीवर आहेत. अशा स्थितीत डोनाल्ड ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यास भारताला काय फायदा होणार? ते समजून घ्या.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यास भारताचा काय फायदा होईल समजून घ्या
donald trump VS Kamala harris
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 11:25 AM

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक झालीय. आता मतमोजणी सुरु आहे. रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस यांच्यात अटी-तटीचा सामना सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यास भारताचे काही फायदे सुद्धा आहेत.

– डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-अमेरिका संबंध अधिक भक्कम करण्यासाठी कटिबद्ध असल्याच म्हटलं आहे. दिवाळीच्या खास प्रसंगी डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया X वर पोस्ट केली. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपलं मित्र म्हटलं. आपलं सरकार आल्यास दोन्ही देशांची भागीदारी अधिक पुढे घेऊन जाण्याच आश्वासन दिलं आहे.

– डोनाल्ड ट्रम्प यांनी बांग्लादेशात सत्तापालट झाल्यानंतर तिथे हिंदु आणि अन्य अल्पसंख्यांकाविरुद्ध जो हिंसाचार झाला, त्याचा कठोर शब्दात निषेध नोंदवला. बांग्लादेशात हिंदुंवर अत्याचार अजूनही सुरुच आहेत. भारताने या मुद्याकडे अमेरिकेच लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण बायडेन प्रशासनाने फार लक्ष दिलं नाही. पण ट्रम्प सत्तेवर आल्यास स्थितीमध्ये नक्कीच फरक पडेल.

– डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चांगली केमिस्ट्री आहे. ती यापूर्वी सुद्धा दिसून आली आहे. दोन्ही नेत्यांमधील घनिष्ठ संबंध हाय-प्रोफाईल कार्यक्रमात दिसून आले. 2019 साली टेक्सासमध्ये में “हाउडी, मोदी!” रॅलीमध्ये हे दिसलं होतं. 50,000 लोकांसमोर मोदी-ट्रम्प यांची घनिष्ट मैत्री दिसून आली होती. परदेशी नेत्याची अमेरिकेतील ही मोठी सभा होती. ट्रम्प त्यात सहभागी झाले होते.

– डोनाल्ड ट्रम्प भारतात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडीयमवर त्यांचं आदिरातिथ्य केलं होतं. यावेळी 1 लाख 20 हजारपेक्षा जास्त लोक ट्रम्प यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. दोन्ही नेत्यांमधील हा समन्वय फक्त दाखवण्यापुरती नाही, तर राष्ट्रवादी विचार सुद्धा एकसारखेच आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इंडिया फर्स्ट विजन आहे, तर ट्रम्प यांचं अमेरिका फर्स्टला प्राधान्य आहे. दोन्ही नेते देशांतर्गत विकास, आर्थिक राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सीमा सुरक्षेवर भर देतात.

– चीनबद्दल भारताच्या ज्या चिंता आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांचं सुद्धा तेच मत आहे. ट्रम्प प्रशासनाच्या काळात भारत-अमेरिका सुरक्षा संबंध अधिक बळकट होतील. ट्रम्प यांच्या कार्यकाळातच इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चिनीचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी अमेरिका, भारत, जापान आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान क्वाड मजबूत करण्यात आलं. भारताला अमेरिकेकडून अजून अत्याधुनिक शस्त्रास्त्र मिळू शकतात.

– डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या मागच्या कार्यकाळात दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेतली होती. पाकिस्तान विरुद्ध भारताच्या भूमिकेच समर्थन केलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला दिली जाणारी सैन्य मदत कमी केली होती.

Non Stop LIVE Update
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा.
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर..
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर...
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी.
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?.
'...असं गाव दाखवा अन् 1 लाख मिळवा', तानाजी सावंतांचं मतदारांना चॅलेंज
'...असं गाव दाखवा अन् 1 लाख मिळवा', तानाजी सावंतांचं मतदारांना चॅलेंज.
शिंदेंच्या निवडणुकीपूर्वी10 घोषणा, लाडक्या बहिणींना 1500 च्या ऐवजी...
शिंदेंच्या निवडणुकीपूर्वी10 घोषणा, लाडक्या बहिणींना 1500 च्या ऐवजी....
बारामतीचं नेतृत्व बदला, बारामतीकरांना आवाहन; पवार दादांविरोधात मैदानात
बारामतीचं नेतृत्व बदला, बारामतीकरांना आवाहन; पवार दादांविरोधात मैदानात.
प्रचाराचा पहिला गेअर पडला, 'लाडकी बहीण'वरून ठाकरे-शिंदेंमध्ये जुंपली
प्रचाराचा पहिला गेअर पडला, 'लाडकी बहीण'वरून ठाकरे-शिंदेंमध्ये जुंपली.
शिंदे-राज यांच्यातील संबंधात तणाव,अमित ठाकरेंविरोधातील उमेदवारीन खटके?
शिंदे-राज यांच्यातील संबंधात तणाव,अमित ठाकरेंविरोधातील उमेदवारीन खटके?.
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार.