दणादण काचा फोडून पोलीस कोर्टरुममध्ये शिरले, इम्रान खान यांना दहशतवाद्यासारखे पकडून नेले
इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. इम्रान खान यांच्या अटकेविरोधात निदर्शनं सुरु आहेत. इम्रान खान यांना कशा प्रकारे अटक केली गेली याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
Imran Khan Arrest : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांना आज अटक करण्यात आली. पाकिस्तानी निमलष्करी दलाने इस्लामाबाद उच्च न्यायालयातून त्यांना अटक केली. ज्याप्रकारे त्यांना अटक करण्यात आली त्यावर कोर्टाने देखील नाराजी व्यक्त केलीये. इम्रान खानच्या अटकेचे व्हिडिओ आता समोर आले आहेत. पाकिस्तान रेंजर्सचे जवान माजी पंतप्रधान यांना एखाद्या दहशतवाद्यासारखे पकडून घेऊन जास असल्याचं दिसत आहे. या घटनेनंतर इस्लामानबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पीटीआय पक्षाच्या नेत्यांकडून याचा निषेध करण्यात येत आहे.
This is not a time for despondency. @ImranKhanPTI has no room for defeatism.
Get strength from the example of the great man. Look how calmly he sits through the mayhem created by the goons who’ve come to abduct him.
He stands taller as they fall lower.
#نکلو_خان_کی_زندگی_بچاؤ pic.twitter.com/EnEWsalZpg
— Javed Hassan (@javedhassan) May 9, 2023
पाकिस्तानी रेंजर्सचे जवान कोर्टरुमच्या काचा फोडून कोर्टरुममध्ये शिरले. यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत असलेल्या लोकांना आणि वकिलांना बाजुला केले आणि इम्रान खान यांना पकडून नेले. यामध्ये वकील देखील जखमी झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. पीटीआयच्या ट्विटर हँडलवरून काही व्हिडिओ शेअर करण्यात आले आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात NAB रावळपिंडीने अटक वॉरंट जारी केले होते. अटकपूर्व जामिनासाठी इम्रान खान कोर्टात आले होते. पण कोर्टात दाखल होण्याआधीच त्यांना पोलिसांनी अटक केली. पीटीआयचे म्हणणे आहे की, इम्रान यांना अटक करताना कोणतेही वॉरंट देखील दाखवले नाही. असा आरोप त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.
عمران خان کا غیر آئینی، جبری ریاستی اغوا نظامِ انصاف کے لئے ہی نہیں، پورے پاکستان کے لئے امتحان ہے۔ 75 سال سے ملک کے ساتھ جو مذاق ہورہا ہے، آج ملک کو تباہی گڑھے کی طرف دھکیل دیا گیا۔ pic.twitter.com/j5ZVkfAvDq
— Babar Awan (@BabarAwanPK) May 9, 2023
अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत.
Charsadda #ReleaseImranKhan pic.twitter.com/91LvtgkxLE
— PTI (@PTIofficial) May 9, 2023