Imran Khan: इम्रान खान यांना ड्रग्जचे व्यसन, कोकेनशिवाय दोन तासही राहू शकत नाहीत, पाकिस्तानच्या मंत्र्यांची माहिती
2020 सालीही इम्रान खानचे यांचा जवळचा मित्र आणि पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर सरफराज नवाबने खुलेआम टीव्हीवर हा आरोप केला होता. त्यानंतर इम्रान खान यांची घटस्फोटित दुसरी पत्नी रेहम यांनीही इम्रान खान हे व्यसनी असल्याचा आरोप केला होता.
इस्लामाबाद – पाकिस्तानचे (Pakistan)माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना सुरुवातीपासून ड्रग्जचे व्यसन (drugs addict)असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पाकिस्तानातील सर्वात मोठे राज्य असेलल्या पंजाबचे गृहमंत्री अता तरोडा यांनी हा आरोप केला आहे. इम्रान यांना सुरुवातीपासून याचे व्यसन आहे. त्यांचे अलिशान घर बनीगाला येथे ड्रग्ज कोम पोहचवते, हेही माहीत असल्याचे तरार यांनी सांगितले आहे. चरस किंवा कोकेनबिना इम्रान दोन तासही राहू शकत नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे. इम्रान यांच्यावर ड्रग्जच्या व्यसनाचा हा पहिलाच आरोप नाही. 2020 सालीही इम्रान खानचे यांचा जवळचा मित्र आणि पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर सरफराज नवाबने खुलेआम टीव्हीवर हा आरोप केला होता. त्यानंतर इम्रान खान यांची घटस्फोटित दुसरी पत्नी रेहम यांनीही इम्रान खान हे व्यसनी असल्याचा आरोप केला होता.
इम्रान यांना अटक करण्याची इच्छा नाही
ड्रग्ज घेण्याच्या आरोपावरुन कोणत्याही क्षणी इम्रान खान यांना अटक करता येऊ शकते, पण हे आपल्याला करायचे नाही असे अता यांनी लाहौरमधील एका पत्रकार परिषदेत सांगितले आहे. इम्रान तुरुंगात ड्रग्जशिवाय कसे राहू शकतील, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. शेकडो एकरमध्ये पसरलेल्या इम्रान यांच्या बनीगाला या निवासस्थानी कोण ड्रग्ज पोहचवतं, हेही आपल्याला माहित असल्याचेअता यांनी सांगितले आहे. इम्रान क्रिकेटर होते तेव्हापासून ते चरस घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. जेलमध्ये गेले तर तिथे त्यांना ड्रग्ज मिळणार नाही, म्हणून ते अटक होऊ इच्छित नसल्याचा दावाही त्यांनी केलाय. सध्या तरी त्यांनी केलेल्या अब्जावधींच्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे या मंत्र्यांनी सांगितले आहे.
इम्रान यांची पत्नी बुशरा यांनाही सोडणार नाही
इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी आणि त्यांची फरार मैत्रीण फराह खान यांनीही अब्जावधींचा भ्रष्टाचार केला आहे, त्यांनाही सोडणार नसल्याचे सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेत कायदामंत्री मलिक मोहम्मद खान हेही उपस्थित होते. त्यांनी हे सांगितले आहे. 60 कोटींची जमीन 8 कोटींना खरेदी केल्याच्या प्रकरणातही चौकशी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे. बुशरा या गृहिणी आहेत तर त्या राजकीय ऑडिओ व्हायरल का करीत आहेत, असा प्रश्नही मलिक यांनी उपस्थित केला आहे. या ऑडिओत त्या सर्व नेत्यांना गद्दार ठरवीत आहेत. जेव्हा इम्रान यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, सरकार पडणार होते, तेव्हा त्यामागे परकीय शक्ती असल्याचे नाटक रचण्यास त्यांनी सुरुवात केली होती, असा आरोपही मलिक यांनी केला आहे.