Pakistan election 2024 | इम्रान खान यांचा पक्ष निवडणूक जिंकतोय, पण आर्मीकडे त्यांचा गेम करण्याचा प्लान तयार
Pakistan election 2024 result | रात्री उशिरा मतमोजणीच्या कलामध्ये इम्रान खान यांच्या पक्षाच समर्थन असलेले अपक्ष उमेदवार 100 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर होते. त्यानंतर पाकिस्तान निवडणूक आयोगाने निकाल जाहीर करायला विलंब लावला.
Pakistan election 2024 result | पाकिस्तानात नॅशनल असेंबली आणि प्रांतीय निवडणुकीसाठी मतदान झालं. मतदानानंतर आता तिथे मतमोजणी सुरु आहे. हळूहळू आता निकाल समोर येऊ लागले आहेत. निवडणुकीचा कल पाहता यंदाचे निकाल सगळ्यांनाच धक्का देणारे आहेत. आतापर्यंत 34 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. इम्रान खान यांचे समर्थक मोठ्या विजयाच्या दिशेने चालले आहेत.
265 पैकी 154 जागांवर इम्रान समर्थक आघाडीवर आहेत. PTI च समर्थन असलेल्या अपक्ष उमेदवारांनी 19 जागांवर विजय मिळवलाय. नवाज शरीफ यांची पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज पार्टी दुसऱ्या नंबरवर आहे. पार्टीच्या 8 उमेदवारांनी विजय मिळवलाय. बिलावल भुट्टो यांची PPP पार्टी तिसऱ्या नंबरवर आहे. PPP च्या 6 उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
पाकिस्तानचा पंतप्रधान कोण बनणार?
आता प्रश्न हा आहे की, यावेळी पाकिस्तानचा पंतप्रधान कोण बनणार?. बऱ्याच काळापासून लंडनमध्ये राहणाऱ्या PML- N च्या नवाज शरीफ यांच्या अपेक्षांना धक्का बसू शकतो. नवाज आधीच म्हणाले आहेत की, जमवाजमव करुन सरकार बनवाव लागलं, तर पीएम होणार नाही. अशा परिस्थितीत त्यांचे भाऊ माजी पंतप्रधान शहबाज शरीफ यांना संधी मिळणार का?. हे सर्व किंतु-परंतुचे विषय आहेत. तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांची भूमिका महत्त्वाची आहे.
पाकिस्तानी सैन्याचा प्लान काय?
पण बातमी अशी आहे की, इम्रान यांचं नुकसान करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याचा प्लान तयार आहे. इम्रान समर्थक नेत्यांना भूमिका बदलायला लावून नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजमध्ये त्यांना सहभागी करुन घेणं ही रणनिती असेल. यासाठी पाकिस्तानी सैन्य अनेक इम्रान समर्थक उमेदवारांच्या संपर्कात आहे.
पीटीआयच्या कार्यकर्त्यांचा दावा काय?
रात्री उशिरा मतमोजणीच्या कलामध्ये इम्रान खान यांच्या पक्षाच समर्थन असलेले अपक्ष उमेदवार 100 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर होते. त्यानंतर पाकिस्तान निवडणूक आयोगाने निकाल जाहीर करायला विलंब लावला. आमच्या पक्षाचे उमेदवार जिंकतायत, त्यामुळे निकाल जाहीर करायला विलंब लावला जातोय, असं पीटीआयच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे.