पतीच्या सुटकेसाठी कोर्टात ढसाढसा रडली इम्रान खान यांची पत्नी

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी अजूनही कमी झालेल्या नाहीत. त्यांच्यावर वेगवेगळ्या आरोपाच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून ते तुरुंगातच आहेत. त्यांची पत्नी जरी जामिनावर बाहेर आल्या असल्या तरी आपल्या पतीला देखील बाहेर काढावे म्हणून कोर्टातच ढसाढसा रडल्या.

पतीच्या सुटकेसाठी कोर्टात ढसाढसा रडली इम्रान खान यांची पत्नी
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 7:23 PM

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी या पाकिस्तानच्या कोर्टात ढसाढसा रडू लागल्या. न्याय व्यवस्था आणि न्यायाधीशांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. न्याय व्यवस्था अक्षम असल्याचा आणि तुरुंगात टाकलेल्या पतीला अन्यायकारक शिक्षा केल्याचा आरोप केलाय. रडत रडत त्यांनी न्यायालयाला विचारले की, तुरुंगात असलेला व्यक्तीही माणूस आहे हे न्यायाधीशांना दिसत नाही का? मला आणि पतीला अन्यायकारक शिक्षा सुनावण्यात आली असून नऊ महिन्यांपासून तिच्यावर अन्याय होत आहे, त्यामुळे ती पुन्हा न्यायालयात येणार नाही, असेही बुशरा बीबी म्हणाल्या.

बुशरा बीबी इस्लामाबादच्या जिल्हा दंडाधिकारी अफझल माजोका यांच्या न्यायालयात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या सहा गुन्ह्यांमध्ये आणि स्वत:साठी दुसऱ्या एका प्रकरणात जामीन मागण्यासाठी हजर झाल्या होत्या. रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात झालेल्या सुनावणीदरम्यान इम्रान खान यांना कोर्टात हजर करण्यात आले नाही. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारेही त्यांना हजर होऊ दिले नाही.

न्यायालयीन कामकाजादरम्यान बुशरा बीबी भावूक झाल्या. त्या म्हणाल्या की, ‘गेल्या नऊ महिन्यांपासून न्यायाची जबाबदारी सांभाळणाऱ्यांकडून माझ्यावर अन्याय होत आहे. मला आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे संस्थापक (इमरान खान) यांना अन्यायकारक शिक्षा झाली आहे.

इम्रान खान यांचा उल्लेख करत बुशरा बीबी म्हणाल्या की, ‘जो व्यक्ती तुरुंगात बंद आहे, तो माणूस नाही का? हे कोणी न्यायाधीश पाहू शकत नाही का? मी पुन्हा या न्यायालयात येणार नाही, जिथे न्याय मिळत नाही. तोशाखाना प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर बुशराची गेल्या महिन्यात तुरुंगातून सुटका झाली होती, मात्र इम्रान खान अजूनही तुरुंगातच आहेत.

पाकिस्तानात इम्रान खान यांच्या पक्षावर ही बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या खासदारांनी अपक्ष निवडणूक लढवल्या होत्या. जवळपास ९० हून अधिक खासदार यामध्ये निवडून आले होते. पण बहुमताचा आकडा गाठता न आल्याने ते सत्तेपासून दूर राहिले. त्यामुशे इम्रान खान यांच्या अडचणी आणखी वाढल्या. वेगवेगळ्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.