शास्त्रज्ञांच्या हाती लागले डायनासोरचे अवशेष, पृथ्वीवर आतापर्यंतचा सगळ्यात मोठा जीव असल्याचा दावा

पेलियोन्टोलॉजिस्ट्स (Paleontologists) ने अर्जेटिनाच्या वायव्याला असलेल्या पॅटागोनियामधील न्युक्वेनमध्ये 98 दशलक्ष वर्ष जुने टायटानोसॉरसचे जीवाश्म (Fossil) अवशेष सापडले आहेत.

शास्त्रज्ञांच्या हाती लागले डायनासोरचे अवशेष, पृथ्वीवर आतापर्यंतचा सगळ्यात मोठा जीव असल्याचा दावा
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 8:43 AM

अर्जेंटिना : अर्जेंटिनामध्ये (Argentina) तज्ज्ञांना एका विशाल डायनासोरचे अवशेष सापडले असल्याची माहिती समोर आली आहे. हा पृथ्वीवरील सर्वात मोठ्या प्राण्यांपैकी एक असू शकतं असाही अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पेलियोन्टोलॉजिस्ट्स (Paleontologists) ने अर्जेटिनाच्या वायव्याला असलेल्या पॅटागोनियामधील न्युक्वेनमध्ये 98 दशलक्ष वर्ष जुने टायटानोसॉरसचे जीवाश्म (Fossil) अवशेष सापडले आहेत. यामध्ये 24 लांब हाडे सापडली असून ती मोठ्या शेपटीचा भाग असल्याचं म्हटलं जातं आहे. इतकंच नाहीतर, हिप आणि छातीच्या हाडांचे काही अवशेषही सापडले आहेत. (in argentina scientist discovered dinosaur fossil says largest creature on earth)

संशोधकांच्या अभ्यासात समोर आलेल्या माहितीनुसार, हा जीवाश्म टायटानोसॉरसचा असू शकतो. टायटनोसॉरस हा सॉरोपोडा या गटाचे असतात. ज्यामध्ये त्यांचा आकार मोठा असतो, लांब मान, शेपटी आणि चार पाय अशी त्यांची ओळख असते. क्रेटासियस रिसर्च जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आढळलेला हा प्राणी आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सॉरोपॉड्सपैकी एक आहे. जो आकारात पॅपेटागोटिटान पेक्षा खूप मोठा असतो. पेटागोटिटान प्रजाती 95-100 दशलक्ष वर्षांपूर्वी आढळली होती. त्यांची लांबी 37.2 मीटर (122 फूट) पर्यंत होती.

अर्जेटिनाच्या म्युझिओ दे ला पेल्टा यांनी ईमेलद्वारे सीएनएनला दिलेल्या माहितीनुसार, हा एक मोठा डायनासोर आहे. पण भविष्यात याचे आणखी सांगाडे सापडेल अशी आमची अपेक्षा आहे. जेणेकरून ते किती मोठे होते याचा शोध लावता येईल. टायटानोसॉर जीवाश्म अंटार्क्टिका वगळता सर्वच खंडांवर आढळले. पण 40 टनांपेक्षा जास्त टायटॅनोसॉरसह प्रजातीतील सर्वात मोठी ‘मल्टी-टोन’ प्रजाती बहुतेक पॅटागोनियाममध्येच सापडली आहेत.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, डायनासोरच्या ह्यूमरस किंवा फीमरची तपासणी केल्याशिवाय त्याच्याविषयी आणखी माहिती देता येणार नाही. सध्या हाती आलेले अवशेष हे सर्वात मोठे टायटानोसॉरस असल्याचं समजलं जात आहे. तर यावर सध्या अधिक अभ्यास आणि संशोधन सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी हे अवशेष सापडले तिथे आणखी काही हाती लागतं का? याचाही शोध सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

पृथ्वीवरून कसे गायब झाले डायनासोर?

असं म्हणतात की, तब्बल 60 दशलक्ष वर्षांआधी पृथ्वीवर एक लघुग्रह आदळला होता. ही टक्कर इतकी जोरात होती की यामुळे निर्माण होणारी उर्जा हीरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बपेक्षा 10 अब्ज पट जास्त होती. हा लघुग्रह कोसळल्यानंतर शेकडो मैलांच्या अंतरावर सगळीचे आगीचा तांडव सुरू होता. या धक्क्यामुळे समुद्रात त्सुनामीच्या विनाशकारी लाटा आल्या. ज्यामुळे निम्म्या जगात विनाश झाला. पृथ्वीच्या वातावरणामध्ये वारंवार भयानक बदल झाले. ज्यामुळे अनेक प्राणी नष्ट झाले. या आपत्तीमुळे डायनासोरच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या. (in argentina scientist discovered dinosaur fossil says largest creature on earth)

संबंधित बातम्या – 

68 वर्षीय व्लादिमीर पुतीन यांची 37 वर्षाची गर्लफ्रेन्ड! पुतीन यांच्या शत्रूचा दावा

बगदाद हादरलं!, आत्मघातकी अतिरेकी हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू

एका क्षणात झाला करोडपती! मच्छिमाराच्या हाती काय लागलं हे पाहून तुम्हीही थक्क व्हाल

(in argentina scientist discovered dinosaur fossil says largest creature on earth)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.