‘या’ कट्टर मुस्लिम देशात उघडणार दारुच पहिलं दुकान
एका कट्टर मुस्लिम देशाने एक मोठ पाऊल उचलल आहे. त्याची चर्चा होण स्वाभाविक आहे. कारण इस्लाममध्ये दारु पिण्यास मनाई आहे. आता त्याच देशात दारुच एक दुकान उघडल जाणार आहे. हा बदल खूप मोठ आहे. अर्थव्यवस्थेत येणाऱ्या वर्षात बदल होतील. पर्यटन आणि व्यवसायाला चालना देण हा या निर्णयामागचा उद्देश आहे.
नवी दिल्ली : जगातील काही देशांमध्ये इस्लामच्या रितीरिवाजाच कट्टरपणे पालन होतं. आता त्यातल्याच एका मुस्लिम देशामध्ये बदलाची प्रक्रिया सुरु झाली आहे. या देशाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जगभरातील कट्टरपंथीय नक्कीच हैराण झाले असतील. पण मागच्या काही वर्षांपासून या देशामध्ये असेच हळहळू बदल सुरु आहेत. सौदी अरेबिया हा आखातामधील मोठा देश. आता सौदी अरेबियाची राजधानी रियादमध्ये पहिल्यांदा दारुच दुकान उघडण्याची तयारी सुरु झाली आहे. गैर मुस्लिमांना इथे दारु मिळेल. डॉक्युमेंटमध्ये म्हटलय की, ग्राहकांना एका मोबाइला App च्या माध्यमातून नोंदणी करावी लागेल.
परराष्ट्र मंत्रालयाकडून क्लीयरेंस कोड घ्यावा लागेल. महिन्याभराचा एक कोटा ठरवून दिला जाईल. तितकीच दारु मिळेल. सौदी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमानच्या प्रयत्नाचा हा एक भाग आहे. सौदी अरेबियात पर्यटन आणि व्यवसायाला चालना देण हा या निर्णयामागचा उद्देश आहे. इस्लाममध्ये दारु पिण्यास मनाई आहे. तेलानंतर सौदीची अर्थव्यवस्था कशी असेल? सौदीची विजन 2030 ची जी योजना आहे, त्या दृष्टीने उचलेलं हे पाऊल आहे.
दारुच हे दुकान कुठे उघडणार?
दारुच हे दुकान रियादच्या डिप्लोमॅटिक क्वार्टरमध्ये असेल. तिथे दूतावास आणि राजनैतिक अधिकारी राहतात. सौदी अरेबियात दुसऱ्या देशातून आलेले लाखो लोक वास्तव्याला आहेत. त्यात बहुतांश आशियाई आणि इजिप्तवरुन आलेले आहेत. यात मुस्लिम कामगारांची संख्या जास्त आहे. योजनेशी संबंधित सूत्राने सांगितलं की, ‘पुढच्या काही आठवड्यात हे स्टोर सुरु होईल’
सौदी अरेबियात दारु पिण्याची शिक्षा काय?
सौदी अरेबियात दारु पिण्याविरोधात कठोर कायदे आहेत. फटके, दंड आणि कारावासाची शिक्षा होऊ शकते. प्रवाशांना देशाबाहेर सुद्धा काढल जाईल. कायद्यात आता बदल झाला असून फटक्यांची शिक्षा आता तुरुंगवासात बदलली आहे. आधी दारु फक्त काळ्या बाजारात मिळायची.