Red Sea Attack | लाल सागरात अमेरिकन नौदलाची मोठी Action, तीन बोटी बुडवल्या, किती दहशतवादी मारले?
Red Sea Attack | लाल सागरात अमेरिकन नौदलाने दहशतवादी गटाला अद्दल घडवणारी मोठी कारवाई केली आहे. USS आयझेनहॉवर आणि USS ग्रेव्हली या युद्धनौकांवरील हेलिकॉप्टर्स कॉल येताच लगेच हवेत झेपावली. हल्ला केला. हल्ल्याच्या इराद्याने आलेल्या दहशतवाद्यांना अमेरिकन नौसेनच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
Red Sea Attack | सध्या लाल सागरात तणाव आहे. तिथे समुद्री चाचे व्यापारी जहाजांना लक्ष्य करत आहेत. नुकताच भारताच्या हद्दीत अरबी सागरातही एका जहाजावर ड्रोन हल्ला झाला होता. रविवारी लाल सागरात कंटेनर असलेल्या व्यापारी जहाजावर हल्ल्याचा प्रयत्न अमेरिकन नौदलाने उधळून लावला. लाल सागरात अमेरिकन नौदलाने दहशतवादी गटाला अद्दल घडवणारी मोठी कारवाई केली. इराण समर्थित हौथी बंडखोरांनी हा हल्ला केला होता. व्यापारी जहाजाच्या सुरक्षेसाठी असलेल्या अमेरिकन हेलिकॉप्टर्सनी हा हल्ला परतवून लावला. अमेरिकेने अशी कारवाई केली, की त्यात शत्रूच्या तीन बोटी बुडवल्या आणि 10 दहशतवाद्यांचा खात्मा केला. सध्या इस्रायलच्या मदतीसाठी अमेरिकन नौदल भूमध्य सागरात तैनात आहे.
रविवारी ही लढाई झाली. व्यापारी जहाज सिंगापूरला चालल होतं, अशी माहिती अमेरिकन सेंट्रल कमांडने दिली. USS आयझेनहॉवर आणि USS ग्रेव्हली या युद्धनौकांवरील हेलिकॉप्टर्सनी हल्ला केला. एक कॉल आला होता. त्यानंतर या युद्धनौकांवरील हेलिकॉप्टर्स जहाजाच्या सुरक्षेसाठी हवेत झेपावली. हल्ल्याच्या इराद्याने आलेल्या दहशतवाद्यांना अमेरिकन नौसेनच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
लाल सागरात जहाजांवर हल्ले का होतायत?
“जहाजाच्या क्रू ने वॉर्निंग मानण्यास नकार दिला, त्यामुळे आम्ही हल्ला केला” असं हौथीच्या प्रवक्त्याने सांगितलं. “10 हौथींचा मृत्यू झालाय आणि काही बेपत्ता आहेत. लाल सागरात अमेरिकन फोर्सेसनी आमच्यावर हल्ला केला” असं या प्रवक्त्याने सांगितलं. सध्या गाजा पट्टीत इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरु आहे. इस्रायलकडून हमासच्या दहशतवाद्यांवर जोरदार हल्ले सुरु आहेत. हौथीने हमासला पाठिंबा देताना इस्रायलला इशारा दिला होता. लाल सागरात व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले हा त्याच संघर्षाचा एक भाग आहे.
Iranian-backed Houthi small boats attack merchant vessel and U.S. Navy helicopters in Southern Red Sea
On Dec. 31 at 6:30am (Sanaa time) the container ship MAERSK HANGZHOU issued a second distress call in less than 24 hours reporting being under attack by four Iranian-backed… pic.twitter.com/pj8NAzjbVF
— U.S. Central Command (@CENTCOM) December 31, 2023
व्यापारी जहाज कंपन्यांकडे पर्याय काय?
हमासचे दहशतवादी 7 ऑक्टोबरला दक्षिण इस्रायलमध्ये घुसले. त्यांनी अक्षरक्ष: हैदोस घातला. लहान मुलं, बायका कोणाला सोडलं नाही. 1200 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर इस्रायलने हमास विरोधात थेट युद्धाची घोषणा केली. हमासला पाठिंबा देण्यासाठी येमेनमधील हौथी संघटना लाल सागरात जहाजांवर हल्ले करत आहे. जेणेकरुन मोठ्या जहाज कंपन्या सुएझ कालव्याऐवजी लांबच्या महागड्या मार्गावरुन प्रवास करतील.