Shahtoot Dam : भारत-अफगाणिस्तान मैत्रीने पाकिस्तानची नाचक्की, पाण्यासाठीही तरसणार?

भारत आणि अफगाणिस्तान मैत्रीने शेजारी राष्ट्र पाकिस्तानची झोप उडालीय. 9 फेब्रुवारी रोजी भारत आणि अफगाणिस्‍तानमध्ये महत्त्वाचा करार झालाय.

Shahtoot Dam : भारत-अफगाणिस्तान मैत्रीने पाकिस्तानची नाचक्की, पाण्यासाठीही तरसणार?
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 4:40 PM

काबुल : भारत आणि अफगाणिस्तान मैत्रीने शेजारी राष्ट्र पाकिस्तानची झोप उडालीय. 9 फेब्रुवारी रोजी भारत आणि अफगाणिस्‍तानमध्ये महत्त्वाचा करार झालाय. यानुसार अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये शहतूत नावाचं धरण बांधण्यात येणार आहे. त्यामुळे भारताच्या कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला पाण्यासाठी देखील तरसावं लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्रपती मोहम्मद अशरफ गणी यांच्या उपस्थितीत एका ऑनलाईन कार्यक्रमात भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर आणि अफगानिस्तानचे पराष्ट्र मंत्री हनीफ अतमार यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या (India Afghanistan going to build Shahtoot dam in Kabul project worries Pakistan).

हा महत्वकांक्षी प्रकल्पाचा खर्च 120 ते 305 बिलियन डॉलर (म्हणजे अंदाजे 9 ते 23 लाख कोटी रुपये) इतका आहे. इराणच्या पोयाब या कंपनीसोबत धरणाबाबत करार झालाय. त्या कंपनीकडून धरणाच्या डिझाईनला मंजुरी मिळालीय. या धरण प्रकल्पात इराणचीही महत्त्वाची भूमिका असणार आहे. हे धरण बांधून पूर्ण झाल्यानंतर काबुलमधील 20 लाख लोकांची पाण्याची गरज पूर्ण होणार आहे, अशी माहिती अफगाणिस्तान सरकारने दिलीय. याशिवाय छारासाइब आणि खैराबाद जिल्ह्यांमध्ये 4000 हेक्‍टर जमीन सिंचनाखाली येईल. तसेच वीज निर्मिती देखील केली जाईल.

पाकिस्तानची गोची कशी होणार?

पाकिस्‍तानने काबुलमध्ये तयार होणाऱ्या या धरणाबद्दल अनेक शंका उपस्थित केल्यात. काबुल नदीवर शहतूत धरणाशिवाय आणखी 12 पूर्वनियोजित छोटी धरणंही बांधली जाणार आहेत. यामुळे पाकिस्तानला मिळणारं 16 ते 17 टक्के पाणी कमी होणार आहे. त्यामुळेच पाकिस्तानने आक्षेप घेण्यास सुरुवात केलीय. भारताचा हा अफगाणिस्तानमधील धरणाचा दुसरा प्रकल्प आहे. याआधी अफगाणिस्तानमध्ये सलमा धरणाची निर्मिती करण्यात आली होती. त्यामुळे 40,000 घरांना वीज मिळाली. तसेच 80,000 हेक्‍टर जमीन सिंचनाखाली आली.

पाकिस्‍तानचा अफगाणिस्तानसोबत अद्याप कोणताही पाणी करार झालेला नाही. त्यामुळे पाकिस्तान अधिक चिंतेत आहे. या धरणानंतर पाकिस्तानला कायदेशीरही आक्षेप घेण्यासाठी हातात कोणताही करार किंवा तरतुदही नाही. त्यातच आपल्या सैन्य कारवायांनी पाकिस्तानची कोंडी करणाऱ्या इराणने यात भारताची साथ दिल्याने पाकिस्तानवरील दबाव वाढलाय.

हेही वाचा :

भारतीय कोरोना व्हॅक्सीनला अफगानिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्याचा धोका, अलकायदा आणि तालिबानकडून कुरापती का?

पाकिस्तानच्या फरार दहशतवाद्यावर अमेरिकेकडून 21 कोटींचं इनाम, अफगाणिस्तानात असा झाला शेवट

अफगाणिस्तान : काबूल विद्यापीठावर दहशतवाद्यांचा हल्ला, 25 जणांचा मृत्यू, चकमक जारी

व्हिडीओ पाहा :

India Afghanistan going to build Shahtoot dam in Kabul project worries Pakistan

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.