कॅनडाच्या आरोपानंतर भारताने उचललं मोठं पाऊल, अशी लगावली चपराक

हरदीपसिंग निज्जर हत्येप्रकरणी कॅनडाने केलेल्या आरोपांनंतर आद भारताने कठोर निर्णय घेतला आहे. भारताने आपले उच्चायुक्त आणि इतर मुत्सद्दींवर केलेल्या आरोपामुळे भारताने कॅनडाला उत्तर देत चांगलेच सुनावले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने नुकतेच कॅनडाच्या मुत्सद्द्याला बोलावले होते, त्यांनी भारतावर केलेल्या आरोपांबाबत पुरावे मागितले होते.

कॅनडाच्या आरोपानंतर भारताने उचललं मोठं पाऊल, अशी लगावली चपराक
Follow us
| Updated on: Oct 14, 2024 | 8:13 PM

हरदीपसिंग निज्जर हत्या प्रकरणात भारताने कॅनडाला चपकार लगावली आहे. कॅनडाने केलेल्या कारवाईवर भारताने तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आजच कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना भारतात परत बोलावले आहे. ट्रूडो राजवटीने आपल्या नुकत्याच केलेल्या तपासात भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांना ‘पर्सन ऑफ इंटरेस्ट’  म्हणून लिंक केले होते. भारताने यावर कठोर कारवाई केलीये.

गेल्या वर्षी देखील कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर असेत बिनबुडाचे आरोप केले होते. कॅनडाने कोणतेही पुरावे न देता हा आरोप केला होता. निज्जरची हत्या भारतानेच केल्याचं दावा ते करत होते. पण भारताने याआधीही त्यांना चोख प्रत्यूत्तर दिले होते. भारताने या प्रकरणात आरोप करणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांकडून पुरावे देखील मागितले होते. पण त्यांनी कोणताही पुरावा सादर केला नव्हता. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर एका निवेदनात म्हटले होते की, कॅनडाकडून वारंवार पुरावे मागवूनही पुरावे सादर केले गेले नाहीत.

या प्रकरणाबाबत, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी संध्याकाळी कॅनडाच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, कोणत्याही पुराव्याशिवाय भारतीय उच्चायुक्त आणि इतर अधिकाऱ्यांवर आरोप करणे आम्हाला मान्य नाही. भारत सरकारने हे देखील स्पष्ट केलंय की अशा आरोपांमुळे हिंसाचाराचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आमच्या अधिकाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

भारत सरकारच्या एका निवेदनात म्हटले आहे की, “आमच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी सध्याच्या कॅनडाच्या सरकारच्या वचनबद्धतेवर आम्हाला विश्वास नाही. त्यामुळे भारत सरकारने उच्चायुक्त आणि इतर मुत्सद्दी आणि अधिकाऱ्यांना परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.”

'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?.
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन.
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ.
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ.
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....