नवी दिल्ली : एकीकडे चीन (China) -भारत (India) असा वाद अद्यापही कायम असताना दुसरीकडे अमेरिकेने (America) भारताला मदतीचा हात दिला आहे. अमेरिकेने त्यांच्या नौदलाच्या शस्त्रांमधील तीन 127 मीडियम कॅलिबर बंदूका भारताला देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने भारतासोबत केलेल्या 3800 कोटींच्या कराराअंतर्गत या बंदुका देण्यात येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत नेहमी अमेरिकेशी आपले सैन्य संबंध मजबूत करत आहे. हल्लीच भारताने अमेरिकेकडून दोन ड्रोनही लीजवर घेतले आहेत. (india china faceoff america will give 3 medium guns to indian navy)
अधिक माहितीनुसार, या बंदुकांना समुद्रात तैनात केलेल्या युद्धनौकांवर पाठवण्यात येणार आहे. यासंबंधी भारताने अमेरिकन सरकारला निवेदन पत्रही पाठवले होतं. या पत्राद्वारे भारताने 117 मिमीच्या मध्यम कॅलिबर गनची मागणी केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पत्राची दखल घेत अमेरिका त्यांची तीन शस्त्रं भारतीय नौदलाकडे सोपवणार आहेत. जेणेकरून शस्त्रे लवकरात लवकर भारतीय युद्धनौकांवर पाठलता येतील.
अमेरिकेने सध्या नव्या बंदुकांच्या उत्पादनाला सुरुवात केलेली नाही. नव्या बंदुका बनवण्याचं काम सुरू झाल्यानंतर त्यांना तात्काळ भारतात पाठवण्यासाठी प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर अमेरिकी नौदलाच्या या बंदुका पुन्हा त्यांच्याकडे पाठवण्यात येतील. त्यावेळी मध्यम कॅलिबर गन या भारताकडे नसणार.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय नौदलाने अमेरिकेसोबत चांगले संबंध तयार केले आहेत. अशात गेल्या काही दिवसांमध्ये भारताने अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा घेतला होता. यामध्ये शत्रूवर करडी नजर ठेवण्यासाठी हवाई जहाजांच्या जागी P-8I जहाजही अमेरिकेकडून घेण्यात आलं होतं. त्यातच सीकिंग चॉपर्सच्या जागी अमेरिकेकडून मिळणाऱ्या MH-60 रोमियोज हॅलिकॉप्टर्स तैनात करण्यात येणार आहेत.
भारतीय नौदल आपल्या युद्धनौकांना आधुनिक आणि शक्तिशाली करण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांआधीच सरकारने सैन्यासा 10 जहाजी ड्रोन विकत घेण्याचा निर्णय दिला आहे. चीनसोबत सुरू असलेल्या तणावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तर हे ड्रोन्स शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी आणि पाण्यात सुरू असलेल्या कामांवर नजर ठेवण्यासाठी हिंद महासागरात तैनात केले जाणार आहेत. (india china faceoff america will give 3 medium guns to indian navy)
संबंधित बातम्या –
अमेरिकेचे 46 वे राष्ट्रपती जो बायडेन यांना किती पगार मिळणार? जाणून घ्या
चीनचा कुबेर अचानक बेपत्ता, सरकारसोबतचा वाद भोवला? प्रकरण काय?
(india china faceoff america will give 3 medium guns to indian navy)