भारताने मोठा झटका देताच पीएम मोदींना भेटण्यासाठी बांगलादेशच्या प्रमुखांचा खटाटोप

बांगलादेशमध्ये लोकांचा उद्रेक झाल्यानंतर शेख हसीना यांना देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला होता. लोकांनी पंतप्रधानांंच्या घरावर हल्ला करत घरातील वस्तूंची तोडफोड केली आणि अनेकांनी तर सामानही चोरुन नेलं. पण बांगलादेशमधील नवं अंतरिम सरकार भारताच्या विरोधात वक्तव्य करत आहेत. त्यामुळेच भारताने बांगलादेशला मोठा झटका दिला आहे.

भारताने मोठा झटका देताच पीएम मोदींना भेटण्यासाठी बांगलादेशच्या प्रमुखांचा खटाटोप
Follow us
| Updated on: Oct 03, 2024 | 6:50 PM

माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार गेल्यानंतर बांगलादेशात सध्या अंतरिम सरकार काम करत आहे. बांगलादेशात हिंदूविरोधात तणावाचे वातावरण आहे. या नव्या सरकारकडून सतत भारतविरोधी वक्तव्य येत आहेत. स्थानिकांचा उद्रेक टाळण्यासाठी ते भारताविरोधात प्रतिक्रिया देत आहेत. पण असं असलं तरी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या पंतप्रधानांना भारताच्या पंतप्रधानांनी भेटण्याची इच्छा आहे. बांगलादेशच्या तिन्ही बाजुंनी तो वेढला आहे. त्यामुळे भारतविरोधी वक्तव्य बांगलादेशला भारी पडू शकतात. हेच कारण आहे की देशात एकीकडे ते भारतविरोधी असल्याचं दाखवून दुसरीकडे भारताच्या पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण त्यांना पंतप्रधान मोदींचे मन वळवायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत असताना युनूस यांनी त्यांना भेटण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण ही भेट होऊ शकली नाही. बांगलादेशच्या परराष्ट्र सल्लागारानेच ही माहिती दिली आहे.

ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, बांगलादेशचे परराष्ट्र सल्लागार मोहम्मद तौहीद हुसैन यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, न्यूयॉर्कमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली, परंतु पंतप्रधान मोदी आणि डॉ. युनूस यांची भेट झाली नाही. खरं तर, ज्या दिवशी पंतप्रधान मोदी UN मध्ये भाषण देऊन परतण्यासाठी उड्डाण करत होते, त्याच दिवशी बांगलादेश सरकारचे प्रमुख UN मध्ये पोहोचले होते. अंतरिम सरकारने भारतीय परराष्ट्र मंत्र्यांच्या माध्यमातून भेटण्याचा प्रयत्न केला, पण तसे झाले नाही.

भारताने बांगलादेशातील सर्व प्रकल्प केले बंद

तौहीद हुसैन यांनी सांगितले की, पीएम नरेंद्र मोदी आणि मोहम्मद युनूस यांची पुढील महिन्यात बिमस्टेक शिखर परिषदेदरम्यान भेट होऊ शकते. मात्र, अद्याप कोणतीही औपचारिक माहिती नाही. सध्या आम्ही विविध पातळ्यांवर चर्चेद्वारे एकमेकांच्या देशांच्या परस्पर समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहोत. द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, शेख हसीना यांचे सरकार गेल्यानंतर भारताने बांगलादेशमधील सर्व प्रायोजित प्रकल्पांचे काम थांबवले होते. दोन्ही देशांमधील व्यापार सुरू झाला असला तरी भारताने प्रकल्प थांबवून बांगलादेशला मोठा झटका दिलाय.

बांगलादेशला भारताकडून गुंतवणुकीची अपेक्षा

बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या अर्थ सल्लागाराने एका चर्चासत्रात आपल्या देशात शक्य तितकी गुंतवणूक करण्याची विनंती भारताला केली होती. ते म्हणाले होते की, सध्या बांगलादेशमध्ये अनेक भारतीय प्रकल्प सुरू आहेत, परंतु हे आमच्यासाठी पुरेसे नाही. आम्हाला भारताकडून आणखी गुंतवणूक हवी आहे.

'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच.
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?.
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा.
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'.
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ.
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ.
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्...
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्....
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?.
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार.