चिन्यांना विमानात पाय ठेवू देऊ नका, भारताने का उचललंय हे मोठं पाऊलं, वाचा सविस्तर…

पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमधील सुरू असलेल्या संघर्षामुळे परिस्थिती बदलत आहे.

चिन्यांना विमानात पाय ठेवू देऊ नका, भारताने का उचललंय हे मोठं पाऊलं, वाचा सविस्तर...
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 5:53 PM

दिल्ली : पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमधील सुरू असलेल्या संघर्षामुळे परिस्थिती बदलत आहे. ताज्या माहितीनुसार, विमान कंपन्यांना नागरी विमान उड्डाण मंत्रालयाने चीनी नागरिकांना भारतात येणार्‍या विमानात चढू न देण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, यासंदर्भात औपचारिकरित्या कोणताही आदेश देण्यात आलेला नाही आणि केवळ अनौपचारिक आदेशानुसार एअरलाइन्सना तसे करण्यास सांगितले गेले आहे. (India has taken a big step against China)

कोरोनामुळे चीनची उड्डाणे रद्द यापूर्वी भारताच्या वतीने कोरोना विषाणूच्या साथीमुळे चीनकडे जाणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली होती. पण चीनचे नागरिक खास व्हिसाद्वारे इतर देशांतून भारतात येत होते. हे चिनी नागरिक भारताशी असलेल्या एअर बबल कराराशी संबंधित आहेत. एअर बबल हा द्विपक्षीय करार आहे जो भारत आणि काही देशांदरम्यान करार झाला आहे. या करारानंतर या देशांच्या राष्ट्रीय विमान कंपन्यांना भारतात आणि येथून त्या देशात जाण्याची परवानगी आहे. या करारानुसार ज्या चिनी नागरिकांनी भारतात वास्तव्य केले होते त्यांना विशेष व्हिसाअंतर्गत भारतात येण्यास मान्यता होती.

चीनमध्ये प्रवेश बंदी नोव्हेंबरपासून चीनने भारतातून येणार्‍या प्रवाशांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. नोव्हेंबरला चीनी दूतावासाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या साथीमुळे चीनने भारतात स्थायिक झालेल्या परदेशी नागरिकांचे प्रवेश तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. दूतावासाचे निवेदन त्या नागरिकांविषयी होते ज्यांचेकडे वैध चिनी व्हिसा किंवा रहिवासी परवाने होते.

भारताचे दोन जहाज अडकले चीनमध्ये

चीनच्या कोफिडियन समुद्रकिनाऱ्यावर दोन भारतीय जहाजे अडकून पडली आहेत. MV Anastasia आणि MV Jag Anand ही जहाजे ऑस्ट्रेलियन कोळसा घेऊन चीनमध्ये गेली होती. मात्र, चीन सरकार हा कोळसा उतरवून देण्यास परवानगी दिली नाही.  त्यामुळे MV Jag Anand जहाज सप्टेंबर महिन्यापासून हे जहाज आणि कर्मचारी चीनच्या समुद्रात अडकून पडले आहेत. तर MV Anastasia हे जहाज गेल्यावर्षीपासून चीनच्या समुद्रकिनाऱ्यावर उभे आहे.

कोविड 19 केसेसमध्ये वाढ झाल्याच्या चिंतेमुळे चीनने हा निर्णय घेतला असावा, असे भारताकडून सांगण्यात आले होते. या विषयावर ते चीनशी सतत संपर्कात असल्याचे भारताने म्हटले होते. परंतु अलीकडेच चीनमध्ये अडकलेल्या दोन मालवाहू जहाजांच्या मुद्दयानंतर या संपूर्ण प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे. या दोन्ही जहाजांवर 39 भारतीय आहेत. जहाजाच्या वस्तूही उतरावयास परवानगी नाही. यामुळे भारतीय 39 नागरिक चीनमध्ये अडकले आहेत.

24 डिसेंबर रोजी यासर्व प्रकरणावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत देखील घेतली होती. यासर्व परिस्थितीला काही लोकांनी मात्र, चीन आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या व्यापार संघर्षाला जबाबदार धरले आहे.

संबंधित बातम्या : 

चीनची गुंतवणूक महाराष्ट्रात यायला हवी: देवेंद्र फडणवीस

जनरल मोटर्स भारतातील शेवटचा प्लांट बंद करुन चीनला 2000 कोटींना विकणार, कारण काय?

(India has taken a big step against China)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.