रशिया-पाकिस्तानच्या चालीमुळे भारताला टेन्शन, भारताच्या शत्रूला पुतीन यांनी दिले आमंत्रण
पाकिस्तान रशियाकडून 10 लाख टन कच्चा तेल आयात करत आहेत. ही आयात पाकिस्तान चालू ठेवणार आहे. नवीन कॅरिडोरमुळे पाकिस्तानला नवीन बाजारपेठ मिळणार आहे. तसेच रशिया आणि पाकिस्तानचे संबंध अधिक चांगले होतील.
भारत आणि रशिया दरम्यान इंटरनॅशनल नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडोर (INSTC) बनवले जात आहे. या प्रकल्पात रशिया पाकिस्तानचा समावेश करत आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी पाकिस्तानला या प्रकल्पाशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. रशियातील पाकिस्तानी राजदूत खालिद जमाली यांनी या बातमीला दुजोरा दिला. 7200 किमी लंबा मल्टी मॉडल ट्रान्सपोर्टेशन नेटवर्कमध्ये उत्तरी युरोप, अजरबॅजान आणि ईराण या मार्गाने भारत आणि रशिया जोडले जाणार आहे. त्यामुळे वेळ आणि पैशांची मोठी बचत होणार आहे. रशिया हा प्रकल्प भारत आणि रशियासाठी गेम चेजिंग असल्याचे सांगत आहे. परंतु या प्रकल्पात चीन आणि पाकिस्तानचा प्रकल्प चीन पाकिस्तान इकनॉमिक कॉरिडोर (सीपीईसी) जोडला जाणार आहे. त्याला भारताकडून विरोध होत आहे.
पाकिस्तानी राजदूत म्हणतात…
पाकिस्तानी राजदूत जमाली यांनी सांगितले की, पाकिस्तान रशियाकडून 10 लाख टन कच्चा तेल आयात करत आहेत. ही आयात पाकिस्तान चालू ठेवणार आहे. नवीन कॅरिडोरमुळे पाकिस्तानला नवीन बाजारपेठ मिळणार आहे. तसेच रशिया आणि पाकिस्तानचे संबंध अधिक चांगले होतील. चीन पाकिस्तान इकनॉमिक कॉरिडोर हा प्रकल्प सुरु आहे. आता पाकिस्तानला इंटरनॅशनल नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडोर सोबत जोडले जाणार आहे.
दोन्ही कॅरिडोरचा फायदा पाकिस्तानला
विश्लेषक म्हणतात की, सीपीईसी आणि आयएनएसटीसी जोडले गेल्यास भारताच्या योजनेला मोठा झटका बसणार आहे. दुसरीकडे पाकिस्तानला मोठा फायदा होणार आहे. पाकिस्तान दोन्ही कॅरिडोरचा फायदा घेईल. तसेच पाकिस्तान भारताचा मित्र असलेला रशियासोबत जोडला जाईल. या प्रकल्पानंतर दोन्ही देशांची जवळकी वाढणार आहे. सीपीईसी पीओकेमधून जातो. त्यामुळेच भारताने या प्रकल्पाला उघडपणे विरोध केला आहे.
पाकिस्तानचा मार्ग सोपा नाही
विश्लेषकांनुसार, पाकिस्तानचा मार्ग सोपा नाही. पाकिस्तानने INSTC प्रकल्पात सहभाग घेतल्यास त्याला अमेरिकेची नाराजी ओढवून घ्यावी लागणार आहे. तसेच अफगाणिस्तान आणि इराणमधूनही पाकिस्तानला विरोध होणार आहे. रशिया आणि इराण दरम्यान रेल्वे प्रकल्प सुरु केला जात आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च तेहरानमध्ये रशियाने केला आहे.