भारतासोबत पंगा आणि चीनशी दोस्ती मालदीवला पडणार भारी, IMF ने केले अलर्ट

India maldive relation : मालदीवने भारतासोबतचे नाते बिघडवले आहे. त्याला चीन हा अधिक विश्वासू वाटू लागला आहे. पण चीनची मदत करण्यामागचा उद्देश हा मालदीवला अजूनही कळालेला नाही. श्रीलंकेची जशी अवस्था झाली आहे तीच अवस्था मालदीवची होऊ शकते.

भारतासोबत पंगा आणि चीनशी दोस्ती मालदीवला पडणार भारी, IMF ने केले अलर्ट
Follow us
| Updated on: Feb 07, 2024 | 9:35 PM

India maldive row :  मालदीवचे नवे राष्ट्राध्यक्ष हे चीनशी जवळीक वाढवत आहेत. पण मालदीव हळूहळू कर्जाच्या सापळ्यात कसा अडकणार हे सारे जग पाहणार आहे. याबाबत आधीच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) मालदीवरला इशारा दिला आहे. आयएमएफने मालदीवला कर्जाचा मोठा धोका असल्याचे म्हटले आहे. पण मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना मात्र तो धोका आता दिसत नाहीये. ते सत्तेवर आल्यापासून चीनला आपला मित्र समजू लागले आहेत. चीन देखील त्यांना मोठी मोठी आश्वासने देत आहेत. त्यामुळेच ते भारतविरोधी भूमिका घेत आहेत. मालदीवने चीनकडून मोठे कर्ज घेतले आहे. चीन कर्ज देऊन कसे छोट्या देशांना आपला गुलाम बनवतो हे जगाने आधी पाहिले आहे.

कर्जबाजारी होतोय मालदीव

मालदीव या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून आहे. आयएमएफने म्हटले, ‘महत्त्वपूर्ण धोरणात्मक बदलांशिवाय, एकूण वित्तीय तूट आणि सार्वजनिक कर्ज उच्च राहण्याची अपेक्षा आहे.’ राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना चीनने आणखी कर्ज देण्याची तयारी दाखवली आहे. पण याबाबत त्यांना आधीच सावध केले आहे. पण तरी देखील मालदीवचे राष्ट्राध्यक्ष यातून काही धडा घेतील असे दिसत नाही.

राष्ट्राध्यक्ष मुइझू यांनी गेल्या महिन्यात चीन दौरा केला होता. यानंतर त्यांनी विकास निधीसाठी चीनचे आभार मानले. पण मालदीवला हेच कर्ज एकदिवस डुबवणार आहे. मालदीव हे सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. मालदीव सध्या कोविड-19 महामारीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानातून बाहेर आला आहे. पण अजूनही त्यांची अर्थव्यवस्था बळकट झालेली नाही.

चीनकडून आणखी कर्ज

मालदीवला आता हॉटेल्स आणि विमानतळ विकसित करण्यासाठी पैसे हवे आहेत. त्यासाठी त्यांनी चीन मदत करणार आहे. पण चीन हा कधीच चांगल्या मनाने मदत करत नाही हे जगाला माहित आहे. श्रीलंकेला देखील त्यांनी अशाच प्रकारे अडचणीत आणले आहे. पण तरी देखील मालदीव यापासून कोणताही धडा घेताना दिसत नाहीये.

चीनसाठी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतासोबतचे तणाव खराब केले आहेत. भारत हा कधीच कुठल्या देशांवर पहिले आक्रमण करत नाही हे जगाला माहित आहे. त्यामुळेच अनेक देशांचा भारतावर विश्वास आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.