India-Maldives Row : मालदीवचा माज उतरला, डोळे उघडले, भारतात रोड शो का आयोजित करणार?
India-Maldives Row : नोव्हेंबर महिन्यात मालदीवच्या राष्ट्रप्रमुख पदाची शपथ घेतल्यानंतर काही तासात त्यांनी भारताच्या 88 सैनिकांना माघारी बोलवण्यास सांगितलं. भारतीय सैन्याची मालदीवमधील उपस्थिती त्यांच्या संप्रभुतेला धोका आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. मोहम्मद मुइज्जू यांचा कल चीनच्या बाजूला आहे.
भारताशी पंगा घेणं मालदीवला चांगलच महाग पडतय. मालदीवला त्याची किंमत चुकवावी लागतेय. वेळोवेळी त्यांना भारताची मदत लागतेय. भारताने मालदीवला असा काही दणका दिलाय की, ते विसरणार नाहीत. भारतामुळे मालदीवच्या पर्यटन उद्योगात तेजी होती. चांगले दिवस सुरु होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मालदीवच्या नेत्यांनी अपमान केला. त्यानंतर भारतीयांनी मालदीववर बहिष्कार घालून ‘चलो लक्षद्वीप’चा नारा दिला. भारतीय पर्यटकांनी पाठ फिरवल्याचा मालदीवला चांगलाच फटका बसला आहे. भारतीय पर्यटकांना पुन्हा मालदीवला आणण्यासाठी प्रमुख शहरात ‘रोड शो’ आयोजित करण्यात येणार आहे. मालदीवला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येमध्ये घसरण सुरु आहे. मालदीव एसोसिएशन ऑफ ट्रॅवल एजेंट्स टूर ऑपरेटर्स दोन्ही देशांमध्ये प्रवास आणि पर्यटन सहकार्य वाढवण्यासाठी भारताचे हाय कमिश्नर मुनु महावर यांच्यासोबत चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 जानेवारीला आपल्या एक्स हँडलवर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील प्राचीन लक्षद्वीपचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. त्यानंतर मालदीवकडून सोशल मीडियावर भारतीय पंतप्रधानांबद्दल अपमानास्पद टिप्पणी करण्यात आली. त्यानंतर या सगळ्या वादाने उचल खाल्ली. या वादानंतर देशातील अनेक सेलिब्रिटींसह कोट्यवधी भारतीयांनी मालदीवच बुकींग रद्द केलं. मालदीव ट्रिप रद्द झाल्या.
मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांमध्ये भारत कितव्या नंबरवर?
मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांच्या बाबतीत जानेवारीनंतर भारत आधी पाचव्या आणि आता सहाव्या स्थानावर आहे. मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाच्या आकड्यानुसार या वर्षी 10 एप्रिलपर्यंत एकूण 6,63,269 पर्यटकांमध्ये चीन 71,995 पर्यटक संख्येसह टॉपवर आहे. त्यानंतर युनायटेड किंगडम, रशिया, इटली, जर्मनी आणि भारताचा नंबर येतो.
रोड शो आयोजित करण्याची योजना
भारतीय पर्यटकांना मालदीवला आणण्यासाठी भारताच्या प्रमुख शहरात व्यापक रोड शो आयोजित करण्याची योजना आहे. मालदीवच्या दृष्टीने भारत महत्त्वपूर्ण टुरिस्ट मार्केट आहे. मालदीवचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू हे भारत विरोधी आहेत. नोव्हेंबर महिन्यात मालदीवच्या राष्ट्रप्रमुख पदाची शपथ घेतल्यानंतर काही तासात त्यांनी भारताच्या 88 सैनिकांना माघारी बोलवण्यास सांगितलं. भारतीय सैन्याची मालदीवमधील उपस्थिती त्यांच्या संप्रभुतेला धोका आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. मोहम्मद मुइज्जू यांचा कल चीनच्या बाजूला आहे. 10 मे पर्यंत त्यांनी सर्व भारतीय सैनिकांना मालदीवमधून माघारी बोलवून घ्यायला सांगितलं आहे.