‘या’ देशात भारतीय विद्यार्थी सापडले संकटात, परराष्ट्र मंत्रालय Action मध्ये एडवायजरी जारी
"कुठलीही अडचण असल्यास दूतावासाशी संपर्क साधावा. आमचा 24×7 संपर्क नंबर 0555710041 चालू आहे" असं भारतीय वाणिज्य दूतावासाने म्हटलय. जमावाने बिश्केकमधील मेडिकल विश्वविद्यालयाच्या हॉस्टेलला लक्ष्य केलं.
किर्गिस्तानमध्ये वातावरण बिघडलं आहे. भारताने किर्गिस्तानमध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना खबरदारी घेण्याची तसच घरात थांबण्याची सूचना केलीय. किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये 13 मे रोजी परदेशी विद्यार्थ्यांवर हल्ले झाले. त्यांना मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात चार पाकिस्तानी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये हा हल्ला झाला. तिथे भडकलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय विद्यार्थ्यांना हॉस्टेलच्या आतच थांबण्याचा सल्ला देण्यात आलाय. “आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहोत. सध्या वातावरण शांत आहे. पण विद्यार्थ्यांना घरातच थांबण्याची सूचना दिली आहे. कुठलीही अडचण असल्यास दूतावासाशी संपर्क साधावा. आमचा 24×7 संपर्क नंबर 0555710041 चालू आहे” असं भारतीय वाणिज्य दूतावासाने म्हटलय.
पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 मे रोजी इजिप्तच्या विद्यार्थ्यांनी लूटमार करणाऱ्या काही स्थानिक गुंडांना मारहाण केली. त्यानंतर तिथले स्थानिक लोक भडकले आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मारहाण सुरु आहे. किर्गिस्तानचे लोक आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये मारहाणीचा व्हिडिओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. जमावाने बिश्केकमधील मेडिकल विश्वविद्यालयाच्या हॉस्टेलला लक्ष्य केलं. यात भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेशचे विद्यार्थी राहतात.
Monitoring the welfare of Indian students in Bishkek. Situation is reportedly calm now. Strongly advise students to stay in regular touch with the Embassy. https://t.co/xjwjFotfeR
— Dr. S. Jaishankar (Modi Ka Parivar) (@DrSJaishankar) May 18, 2024
एस. जयशंकर यांनी काय सल्ला दिला?
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी विद्यार्थ्यांना दूतावासाच्या संपर्कात राहण्याचा सल्ला दिलाय. किर्गिस्तानमध्ये जवळपास 15 हजार विद्यार्थी आहेत. मेडीकलच्या शिक्षणासाठी भारत, पाकिस्तान, मिस्र, बांग्लादेश आणि अन्य देशांचे विद्यार्थी किर्गिस्तानमध्ये येतात. खासकरुन राजधानी बिश्केकमध्ये जास्त संख्येने विद्यार्थी राहतात.