India-Russia : व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी का महत्त्वाचा आहे PM मोदींचा रशिया दौरा

Modi-Putin Meet : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसाच्या रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा खास मानला जात आहे. तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदींचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. पुतिन यांच्यासाठी मोदी त्यांच्या देशात येणं किती महत्त्वाचे आहे जाणून घ्या.

India-Russia : व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी का महत्त्वाचा आहे PM मोदींचा रशिया दौरा
Follow us
| Updated on: Jul 06, 2024 | 7:07 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच 8 आणि 9 जुलै रोजी रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यात तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला विदेश दौरा असणार आहे. या दौऱ्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात भेट होणार आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धादरम्याचा हा पहिलाच महत्त्वाचा दौरा असणार आहे. दोन देशांनी 2000 साला पासून वार्षिक शिखर परिषद आयोजित केली आहे, परंतु युक्रेन युद्धानंतर ती थांबलेली आहे. अशा परिस्थितीत, पंतप्रधान मोदींनी आता याची सुरुवात का केली आहे आणि त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या द्विपक्षीय दौऱ्यासाठी मॉस्कोची निवड करण्याचे कारण काय आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. जगातील बहुतेक देशांनी पुतीन यांच्यापासून अंतर ठेवले आहे. कारण या युद्धानंतर रशियावर अनेक देशांनी बहिष्कार टाकले आहेत. आता पंतप्रधान मोदींचा मॉस्को दौरा रशियाचे नेते पुतिन यांच्यासाठी खूप अर्थपूर्ण आहे.

भारताचा जुना मित्र

भारत आणि रशिया या दोन देशांमधील मैत्री अनेक दशके जुनी आहे. इतिहासात जेव्हा जेव्हा भारत अडचणीत होता तेव्हा तेव्हा रशियाने नेहमीच भारताची मदत केली आहे. 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धादरम्यान रशियाने समर्थन दिले होते. या युद्धानंतर बांगलादेश पाकिस्तानपासून फारकत घेऊन नवा देश म्हणून उदयास आला. इतकेच नाही तर अलीकडच्या काळात भारत आपल्या संरक्षण गरजा, तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्रांचा मोठा हिस्सा रशियाकडून घेत आहे.

दोघांची 2022 मध्ये शेवटची भेट

पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांची शेवटची बैठक सप्टेंबर 2022 मध्ये SCO शिखर परिषदेदरम्यान समरकंदमध्ये झाली होती. मोदींच्या या दौऱ्यात त्यांचे एक विधान खूपच चर्चेत आले होते. ते म्हणाले होते की, आजचे युग हे युद्धाचे नाही. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशिवाय गेल्या दोन वर्षांत फार कमी जागतिक नेत्यांनी रशियाला भेट दिली आहे. इतकंच नाही तर आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाने मार्च 2023 मध्ये पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. त्याच्यानंतर रशियन नेत्याने स्वतःचे परदेश दौरे मर्यादित केले आहेत. दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या ब्रिक्स परिषदेपासून ते लांब राहिले होते.

युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. भारताने दोन्ही देशांना चर्चेतून मार्ग काढण्याचा आवाहन केले होते. पाश्चिमात्य देशांची युक्रेनला पाठिंबा दिला होता. त्यामुळे भारताने आता पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या राष्ट्रीय हितासाठी रशियाशी संबंध राखणे महत्त्वाचे आहे. रशिया हा देश त्याच्या आकारमानामुळे आणि संसाधनांमुळे एक मोठी जागतिक शक्ती आहे.

भारताची तटस्थ भूमिका

गेल्या दोन वर्षांत पाश्चिमात्य देशांनी दबाव टाकूनही भारताने रशियाचा विरोध केलेला नाही. भारताने रशियाबाबत स्वतंत्र धोरण स्वीकारले आहे. जेव्हा पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले तेव्हा भारताने रशियाकडून सवलतीच्या दरात मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केले. त्यामुळे जागतिक तेलाच्या किमती आणि पुरवठा स्थिर राहिली. अमेरिकेचा निर्बंध असताना देखील भारताने तेल खरेदी केले. याशिवाय S-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली देखील खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या मागे भारताचा भक्कम युक्तिवाद आहे.

पीएम मोदींचा मॉस्को दौरा हा पुतिन यांच्यासाठी देखील महत्त्वाचा आहे. यामुळे पुतिन यांच्याविरोधात असलेलं वातावरण कमी होईल. पीएम मोदींच्या या भेटीमुळे इतर देशांना देखील रशियासोबत व्यापाराचा मार्ग मोकळा होऊ शकतो. पुतिन यांच्यासाठी हा दौरा एक बदल असेल, कारण पुतिन यांना बहिष्कृत करण्यासाठी अमेरिकेने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे नेते पुतिन यांच्यात युक्रेनच्या मुद्द्यावर काही चर्चा होण्याची शक्यता देखील आहे. तसे झाले तर मोठी बाब ठरेल. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री या वर्षी मार्चमध्ये दिल्लीला आले होते. गेल्या महिन्यात इटलीमध्ये झालेल्या G7 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली होती. युक्रेनने भारताकडे आवाहन केले होते की, भारताने रशियासोबतच्या संबंधांचा वापर करून गतिरोध मोडायला हवा.’

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.