पाकिस्तानी नागरीक म्हणाले, मोदींना सॅल्यूट, काय आहे कारण पाहा व्हिडिओ
India underwater metro | पाण्याखालील मेट्रोवर पाकिस्तानी नागरिकांच्या प्रतिक्रियेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. यावर नेटिझन्सही जोरदार कमेंट करत आहेत. अनेकांनी X वर व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
कराची | 13 मार्च 2024 : भारत आणि पाकिस्तान एकाच वेळी स्वातंत्र झालेले दोन देश आहेत. भारताची वाटचाल विकसित राष्ट्र होण्याकडे सुरु आहे तर पाकिस्तानाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. पाकिस्तानात राजकीय स्थैर राहिले नाही. तसेच भारताशी शत्रूत्व घेण्याच्या नादात पाकिस्तानने विकास करण्याऐवजी अंतकवादाला खतपाणी घातले. आता भारताची प्रगती पाहून पाकिस्तानी नागरिकांना धक्के बसत आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ पाहून पाकिस्तानी नागरिका म्हणतात, मोदींना सॅल्यूट.
अंडरवॉटर मेट्रोचे कौतूक
भारताच्या अंडरवॉटर मेट्रोच्या यशानंतर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अंडरवॉटर मेट्रोशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर लोकप्रिय झाले आहे. पाकिस्तानमध्येही हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर पाहिले जात आहे. भारताच्या या प्रगतीवर पाकिस्तानातील लोकांचा विश्वास बसत नव्हता. लोक अंडरवॉटर मेट्रोला जपान, चीन आणि अमेरिकेसारख्या देशांचे काम म्हणू लागले. पण सत्य समोर आल्यावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सलाम करायला सुरुवात केली.
भारतातील मेट्रे पाहून पाकिस्तानी नागरीक म्हणाले, हा तर जापान किंवा अमेरिका…भारत म्हटल्यावर म्हणाले मोदींना सॅल्यूट#Metro #NarendraModi @Pakishtan pic.twitter.com/NWLGkjSz0Q
— jitendra (@jitendrazavar) March 13, 2024
पाकिस्तान सरकारवर टीका
पाण्याखालील मेट्रोवर पाकिस्तानी नागरिकांची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये अंडरवॉटर मेट्रोचा व्हिडिओ घेऊन एक वृत्तनिवेदक सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहेत. त्याने लोकांना व्हिडिओ दाखवला आणि त्यांचे मत जाणून घेतले. ही अंडरवॉटर मेट्रो कोणत्या देशाची असे विचारले. लोकांनी उत्तर म्हणून लोकांनी अमेरिका, जपान आणि चीनसारख्या देशांची नावे दिली. पण त्यांना भारताचे नाव सांगितल्यावर त्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही.
पाण्याखालील मेट्रोवर पाकिस्तानी नागरिकांच्या प्रतिक्रियेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. यावर नेटिझन्सही जोरदार कमेंट करत आहेत. अनेकांनी X वर व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्यावर भारताच्या विकासावर अनेक जण चर्चा करत आहेत. तसेच पाकिस्तानला दहशतवाद सोडण्याचे सल्ले देखील दिले जात आहेत.