india vs canada issue : कॅनडात संतापजनक प्रकार, या व्हिडिओमुळे तणाव आणखी वाढणार
India-Canada Row : भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव वाढत आहे. टोरंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाबाहेर खलिस्तान समर्थकांनी निदर्शने केली. यावेळी खलिस्तानचे समर्थन करणाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्यावर जोडे मारत आंदोलन केले. त्यांनी भारतीय तिरंगा ध्वजही जाळला. आंदोलकांनी प्रक्षोभक घोषणाही दिल्या. पण पोलीस पाहत राहिले. ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढू शकतो.
India vs canada tension : कॅनडात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येनंतर पीएम जस्टिन ट्रूडो यांच्या वक्तव्याने तणाव वाढला आहे. भारताने आधीच यावर प्रतिक्रिया देत हा पूर्णपणे राजकीय प्रेरित दावा असल्याचं म्हटले आहे. भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण टोरंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाबाहेर कॅनडियन-खलिस्तानी आंदोलकांनी निदर्शने केली आहेत. इतकंच नाहीतर त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याला जोडे मारत आंदोलन केले.भारतीय ध्वजही जाळला. कॅनडाचे पोलीस तेथे उपस्थित होते. पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तान समर्थक संघटनेच्या सदस्यांनी केलेल्या आंदोलनामुळे आता दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.
आगीत तेल टाकण्याचे काम
खलिस्तान समर्थकांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आंदोलकांनी उघडपणे पंतप्रधान मोदींच्या पुतळ्यावर थुंकून आपला राग व्यक्त केला आहे. भारतीय संस्कृतीत हे अत्यंत अपमानास्पद कृत्य आहे. यानंतर आंदोलक तिथेच थांबले नाहीत आणि तिरंगा ध्वजही जाळला, त्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली. कॅनडातील खलिस्तानींनी कॅनडातून सर्व भारतीय मुत्सद्यांची हकालपट्टी करण्याची मागणी सुरूच ठेवली.
JUST IN: Amidst deteriorating India-Canada diplomatic relations, Canadian-Khalistanis spit on effigy of Indian Prime Minister Narendra Modi and smack it with a shoe outside Indian consulate in Toronto, in front of Canadian Police.pic.twitter.com/GJPeppuEiO
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) September 25, 2023
श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री कॅनडाबद्दल काय म्हणाले?
भारत-कॅनडा वादावर श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी म्हणाले की, काही दहशतवाद्यांना कॅनडामध्ये सुरक्षित आश्रय मिळाला आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांकडे कोणतेही पुरावे नाहीत, तरीही अपमानजनक आरोप करण्याचा हा मार्ग चुकीचा आहे. श्रीलंकेसाठीही त्याने असेच केले आहे. श्रीलंकेत नरसंहार झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे भयंकर आणि उघड खोटे आहे. आपल्या देशात एकही नरसंहार झाला नाही हे सर्वांना माहीत आहे. मला आश्चर्य वाटत नाही की कधीकधी पीएम ट्रूडो अपमानजनक आणि सिद्ध न झालेले आरोप घेऊन येतात.