भारतीय समुद्री सुरक्षेला नवीन शक्ती, नरेंद्र मोदी यांचे मित्र पुतिन यांनी दिली मोठी भेट, डोनाल्ड ट्रम्प यांनाही टेन्शन
INS Tushil: आयएनएस तुशील मुंबईतील वेस्टर्न फ्लीटचा एक भाग असेल. तसेच भारतात पोहोचण्यापूर्वी आयएनएस तुशील पश्चिम आफ्रिकेच्या किनारपट्टीवरील गिनीच्या आखातामध्ये चाचेगिरी विरोधी गस्त देखील करेल.

INS Tushil: भारताची समुद्रात ताकद आणखी वाढणार आहे. नवीनतम स्टेल्थ मिसाईल फ्रिगेट आयएनएस (INS) तुशील लवकरच भारतात दाखल होत आहे. हे फ्रिगेट 17 डिसेंबर 2024 रोजी रशियाच्या कॅलिनिनग्राड येथून भारतासाठी रवाना झाले. तुशील रशियामध्ये तयार करण्यात आले आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत नौदलात कार्यान्वित करण्यात आले होते. आयएनएस तुशील बाल्टिक समुद्र, उत्तर समुद्र, अटलांटिक महासागर आणि शेवटी हिंदी महासागरातून पार पडेल आणि अनेक मित्र देशांच्या बंदरांवर थांबेल. भारताच्या या यशामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टेन्शन वाढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र असलेले व्लादिमीर पुतिन यांनी ही अनोखी भेट भारताला दिली आहे.
काय, काय आहे वैशिष्ट्ये
आयएनएस तुशील हा प्रकल्प 1135.6 चे प्रगत क्रिवाक III श्रेणीचे फ्रिगेट आहे. जे भारतीय नौदलात आधीच सेवेत असलेल्या इतर सहा जहाजांशी संबंधित आहे. या जहाजात 26% स्वदेशी सामग्री वापरली आहे. ते मागील टेग-क्लास फ्रिगेट्सपेक्षा दुप्पट आहे. त्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, ब्रह्मोस एरोस्पेस (भारत-रशियाचा संयुक्त उपक्रम) आणि नोव्हा इंटिग्रेटेड सिस्टम्स (टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेडची उपकंपनी) सारख्या 33 कंपन्यांनी यामध्ये योगदान दिले आहे.
INS तुशील हे युद्धाच्या संपूर्ण स्पेक्ट्रममध्ये चार आयामांमध्ये (हवा, पृथ्वी, पाणी आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक) ऑपरेट करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. युद्धनौका अनेक प्रगत शस्त्रांनी सुसज्ज आहे. यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे, ते पाहू या…




- ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र
- जमिनीवरून हवेत मारा करणारे प्रगत क्षेपणास्त्र
- ऑप्टिकली नियंत्रित क्लोज रेंज रॅपिड फायर गन सिस्टम
- टॉर्पेडो, रॉकेट आणि प्रगत इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि संप्रेषण सूट.
आयएनएस तुशीलबद्दल माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते मुंबईतील वेस्टर्न फ्लीटचा एक भाग असेल. तसेच भारतात पोहोचण्यापूर्वी आयएनएस तुशील पश्चिम आफ्रिकेच्या किनारपट्टीवरील गिनीच्या आखातामध्ये चाचेगिरी विरोधी गस्त देखील करेल.